Lokmat Sakhi >Beauty > एंजेलिना जोली ते आलिया भट... देखण्या अभिनेत्रींच्या ग्लोईंग त्वचेचं सिक्रेट आहे व्हिटॅमिन सी, वाचा त्याचे फायदे

एंजेलिना जोली ते आलिया भट... देखण्या अभिनेत्रींच्या ग्लोईंग त्वचेचं सिक्रेट आहे व्हिटॅमिन सी, वाचा त्याचे फायदे

Benefits of Vitamin C for Skin: कोणतीही अभिनेत्री सुंदर दिसते, त्यामागे अर्थातच तिचा मेकअप हे एक कारण असतंच. पण मेकअपही चेहऱ्यावर तेव्हाच व्यवस्थित बसतो, जेव्हा त्वचेचा पोत खरोखरंच उत्तम असतो.. त्याविषयीच तर वाचा हे खास सिक्रेट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 08:10 AM2022-07-28T08:10:10+5:302022-07-28T08:15:02+5:30

Benefits of Vitamin C for Skin: कोणतीही अभिनेत्री सुंदर दिसते, त्यामागे अर्थातच तिचा मेकअप हे एक कारण असतंच. पण मेकअपही चेहऱ्यावर तेव्हाच व्यवस्थित बसतो, जेव्हा त्वचेचा पोत खरोखरंच उत्तम असतो.. त्याविषयीच तर वाचा हे खास सिक्रेट.

Beauty Secret of Bollywood, Hollywood actress's glowing skin, Use of vitamin c for skin nourishment | एंजेलिना जोली ते आलिया भट... देखण्या अभिनेत्रींच्या ग्लोईंग त्वचेचं सिक्रेट आहे व्हिटॅमिन सी, वाचा त्याचे फायदे

एंजेलिना जोली ते आलिया भट... देखण्या अभिनेत्रींच्या ग्लोईंग त्वचेचं सिक्रेट आहे व्हिटॅमिन सी, वाचा त्याचे फायदे

Highlightsहॉलीवूडची एंजेलिना जोली असो किंवा मग आपल्या बाॅलीवूड अभिनेत्री. प्रत्येक जणींच्या सौंदर्यामागे एक कॉमन सिक्रेट आहे ....

अभिनेत्रींकडे बघताना एक प्रश्न नेहमीच जाणवतो की त्या नेहमीच एवढ्या छान कशा दिसतात. आता हेच बघा ना पन्नाशीपर्यंत पोहोचलेल्या माधुरी दिक्षित, शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, भाग्यश्री, काजोल या सगळ्या जणीच या ही वयात किती ग्रेसफूल (why actresses looks so young) दिसतात. अभिनेत्रींच्या या सौंदर्याविषयी आणि त्यांच्या तरुण त्वचेविषयी सांगताना ब्यूटी एक्सपर्ट सांगतात की हॉलीवूडची एंजेलिना जोली असो किंवा मग आपल्या बाॅलीवूड अभिनेत्री. प्रत्येक जणींच्या सौंदर्यामागे एक कॉमन सिक्रेट आहे आणि ते म्हणजे व्हिटॅमिन सी.(vitamin c for glowing skin)

 

व्हिटॅमिन सी
तुम्हाला तरुण ठेवणारं व्हिटॅमिन अशी व्हिटॅमिन सी ची ओळख आहे. त्यामध्ये नॉन टॉक्झिक ॲण्टीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. शिवाय त्यात असणारं कोलॅजिन त्वचेला सैलसर पडण्यापासून रोखतं. त्यामुळे त्वचा तरुण राहण्यास मदत होते. आपलं शरीर व्हिटॅमिन सी स्वत:हून तयार करू शकत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या अन्न पदार्थांमधूनच आपल्याला ते मिळवावं लागतं. त्यामुळे व्हिटॅमिन सी असणारे फळं, भाज्या किंवा इतर खाद्य पदार्थ तर आपण भरपूर प्रमाणात खायलाच हवेत. शिवाय त्वचेसाठी जे कोणते कॉस्मेटिक्स वापरतो, ते देखील व्हिटॅमिन सी युक्त असावेत. त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठीही व्हिटॅमिन सी ची खूप मदत होते.

 

त्वचेसाठी व्हिटॅमिन सी चे फायदे
१. त्वचेसाठी सुपरफूड (superfood for skin)

व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेसाठीच नाही तर आरोग्यासाठीही अतिशय आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात घेतलं नाही, तर त्यामुळे त्वचेचे, आरोग्याचे नुकसान होऊ शकते. व्हिटॅमिन सी मध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे त्वचेवर येणारा ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करतात. शिवाय त्यामध्ये असणारं collagen त्वचेचा टाईटनेस टिकवून ठेवण्यास मदत करतं. त्वचेला अधिक मुलायम आणि चमकदार बनवतं. त्यामुळे व्हिटॅमिन सी हे त्वचेसाठी एक प्रकारचं सुपरफूड आहे. 

 

२. त्वचेचं संरक्षण
त्वचेची इलॅस्टिसिटी वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सी उपयुक्त आहे. त्यामुळे आपोआपच त्वचा अधिक तरुण, तजेलदार दिसू लागते. व्हिटॅमिन सी ला नॅचरल ॲण्टी टॅनिंग एजंट म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे त्वचेचा काळवंडलेपणा दूर करण्यासाठी व्हिटॅमिन सी असणारे पदार्थ खाणे, हा सगळ्यात चांगला नैसर्गिक उपाय आहे. त्वचेवर पिगमेंटेशन असेल म्हणजेच काळे डाग येऊन त्वचा काळवंडली असेल, तरीही व्हिटॅमिन सी चे सेवन उपयुक्त ठरू शकते. 
 
 

Web Title: Beauty Secret of Bollywood, Hollywood actress's glowing skin, Use of vitamin c for skin nourishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.