Lokmat Sakhi >Beauty > प्रियांका चोप्राच्या सुंदर त्वचेचं सिक्रेट सांगतेय तिची आई- ७ दिवसांत त्वचा होईल चमकदार, करून पाहा

प्रियांका चोप्राच्या सुंदर त्वचेचं सिक्रेट सांगतेय तिची आई- ७ दिवसांत त्वचा होईल चमकदार, करून पाहा

Beauty Secret Of Priyanka Chopra's Glowing Skin: प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी चमकदार त्वचेसाठी काही खास टिप्स नुकत्याच शेअर केल्या आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2024 01:57 PM2024-02-19T13:57:31+5:302024-02-19T14:00:21+5:30

Beauty Secret Of Priyanka Chopra's Glowing Skin: प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी चमकदार त्वचेसाठी काही खास टिप्स नुकत्याच शेअर केल्या आहेत.

Beauty secret of Priyanka Chopra's glowing skin, madhu chopra reveals beauty tips for glass skin, How to get flawless young skin | प्रियांका चोप्राच्या सुंदर त्वचेचं सिक्रेट सांगतेय तिची आई- ७ दिवसांत त्वचा होईल चमकदार, करून पाहा

प्रियांका चोप्राच्या सुंदर त्वचेचं सिक्रेट सांगतेय तिची आई- ७ दिवसांत त्वचा होईल चमकदार, करून पाहा

Highlights७ दिवस जर हा उपाय नियमितपणे केला, तर नक्कीच त्वचा नितळ, चमकदार होईल. 

प्रियांका चोप्राच्या त्वचेमध्ये एक वेगळीच चमक आहे. तिच्या त्वचेवर एक खास ग्लो आहे. तुमचा रंग गव्हाळ असो, सावळा असो किंवा गोरा असो. त्वचेला चमक असेल तर ती त्वचा हेल्दी म्हणून ओळखली जाते. वयाच्या चाळिशीनंतरही प्रियांका चोप्राची त्वचा तरुण, चमकदार दिसते. त्वचेसाठी ती नेमकं काय करते, असा प्रश्न पडला असेल तर तिच्या सुंदर त्वचेचं गुपित कोणतं, याची माहिती तिच्या आईनेच दिली आहे. मधू चोप्रा (Madhu Chopra) यांनी चमकदार त्वचेसाठी एक सोपा उपाय सांगितला असून हा उपाय केल्यास अवघ्या ७ दिवसांतच त्वचा खूप छान होईल, असं त्या म्हणत आहेत. (Beauty secret of Priyanka Chopra's glowing skin)

 

चमकदार त्वचेसाठी काय उपाय करावा?

हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त पदार्थ लागणार आहेत.

वजन कमी होईना? वारंवार ॲसिडिटी- अपचन होते? गरम पाण्यात चिमूटभर 'हा' पदार्थ टाकून प्या...

सगळ्यात आधी तर एक भांड्यात थोडं राईस वॉटर घ्या. राईस वॉटर म्हणजे शिजवलेल्या भातातलं उरलेलं पाणी. हे पाणी खूप पातळही नसावं आणि खूप घट्ट ही नसावं.

या पाण्यामध्ये आता थोडं ॲलोव्हेरा जेल आणि कॅस्टर ऑईलचे काही थेंब टाका. 

 

ज्यांची त्वचा ऑईली असेल त्यांनी या मिश्रणात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकावेत. तर ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांनी या मिश्रणात ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब टाकावेत.

उन्हाळ्यात बहरून जाईल मोगरा, त्यासाठी आताच करा ३ गोष्टी- अंगणात पडेल फुलांचा सडा

यानंतर हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि रात्रभरासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी हा लेप चेहऱ्याला लावा. ७ दिवस जर हा उपाय नियमितपणे केला, तर नक्कीच त्वचा नितळ, चमकदार होईल. 

 

Web Title: Beauty secret of Priyanka Chopra's glowing skin, madhu chopra reveals beauty tips for glass skin, How to get flawless young skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.