आपल्या त्वचेवर कायमच गुलाबी चमक यावी असे प्रत्येकीलाच वाटत असते. असे असले तरीही सध्याच्या धकाधकीच्या लाईफस्टाइलमुळे त्वचेवरील ग्लो हरवला जाऊन त्वेचेच्या अनेक छोट्या - मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी बरेच लोक महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा देखील वापर करतात, परंतु या ब्यूटी प्रॉडक्ट्समुळे काहीवेळा विशेष फायदा होताना दिसत नाही. त्वचेवरील ग्लो कायम आहे तसाच मेंटेन करुन ठेवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. परंतु जर त्वेचेवरील ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही क्रिम, पावडर, लोशन पेक्षा नॅचरल पद्धतीने ग्लो आला तर कुणाला आवडणार नाही(Beauty secrets of actor Roshni Chopra).
त्वचेवरील नॅचरल ग्लो असाच कायम टिकवून ठेवण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री रोशनी चोप्रा (Roshni Chopra) हिने एका सिक्रेट ड्रिंकची रेसिपी शेअर केली आहे. रोशनी स्वतः आपल्या स्किनवरील ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी हे सिक्रेट ड्रिंक (Juice Your Way to a Glowing Skin – Beetroot Juice for Clear Skin) रोज सकाळी नाश्ता करण्याआधी पिते. प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ नेहा सहाय यांनी सांगितलेली ही खास रेसिपी अभिनेत्री रोशनी चोप्रा हिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वरुन शेअर केली आहे. त्वचेवर नॅचरल ग्लो (Drink For Glowing Skin) येण्यासाठी आणि तो कायम टिकवून ठेवण्यासाठी नक्की हे कोणते सिक्रेट ड्रिंक घेतले पाहिजे आणि त्याची रेसिपी काय आहे ते पाहूयात(Beetroot Juice for Clear & Glowing Skin).
रोशनी चोप्रा सांगते हे सिक्रेट ड्रिंक आहे फायदेशीर...
रोशनी चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर न्यूट्रिशनिस्ट नेहा सहाय यांनी सांगितलेली एक रेसिपी शेअर केली आहे, जी त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. अभिनेत्री रोशनीने स्वतः हा ज्यूस आठवडाभर प्यायला आणि स्वतःच्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम पाहिल्यानंतर तिने न्यूट्रिशनिस्टची रेसिपी सर्वांसोबत शेअर केली. हे पेय फक्त त्वचेसाठीच नाही तर केसांसाठीही खूप फायदेशीर असल्याचे रोशनीने सांगितले आहे.
हे सिक्रेट ड्रिंक करण्यासाठीचे साहित्य :-
१. बीटरूट - १/२ कापून घ्यावे.
२. आवळा - १
३. कडीपत्ता - ४ ते ५ पाने
४. आले - १ टेबलस्पून (किसून घेतलेले)
५. मीठ - चवीनुसार
बाटलीतील आयलायनर सुकले? ही घ्या तेच लायनर लावण्याची एक भन्नाट ट्रिक, झ्टपट सोल्यूशन...
कृती :-
१. सर्वप्रथम, एका पॅनमध्ये बीटरूटचे लहान तुकडे करुन ते ३ ते ५ मिनिटे उकळण्यासाठी ठेवा.
२. बीटरूट उकळत असताना आवळा बारीक चिरून घ्या.
३. यानंतर मिक्सरच्या भांड्यात उकडलेले बीटरूट, आवळा, कडीपत्ता आणि आले घालून त्याची पातळ पेस्ट तयार करुन घ्या.
४. आता त्यात अर्धा ग्लास पाणी घालून मिक्सर पुन्हा फिरवा.
५. रोज सकाळी नाश्त्याच्या १५ मिनिटे आधी हे पेय पिण्याची सवय लावा.
६. आठवडाभरात तुमच्या त्वचेवर याचा चांगला परिणाम दिसू लागेल.
हे सिक्रेट ड्रिंक पिण्याचे फायदे...
१. आवळा व्हिटॅमिन 'सी' ने समृद्ध आहे ज्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते आणि बीटरूट आपले रक्त शुद्ध करण्यास आणि मुरुम तसेच त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करते.
२. आल्यामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण खूप जास्त असते. त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा, एजिंगच्या खुणा कमी करण्याचे काम करते.
३. बीटरूट आणि आवळ्याचा रस पितो तेव्हा ते आपली पचनसंस्था सुधारण्याचे काम आपोआप केले जाते. जर तुमची पचनसंस्था व्यवस्थित असेल तर त्वचेशी संबंधित समस्याही कमी होतात.