तुरटी आपल्या प्रत्येकाच्या घरात असतेच (Alum). पांढरीशुभ्र दिसणाऱ्या तुरटीचे अनेक फायदे आहेत. तुरटीचा वापर अनेक कारणांसाठी होतो. पण आपण तुरटीचा वापर कधी चेहऱ्यासाठी करून पाहिलं आहे का? दिसायला एखाद्या पांढऱ्या दगडाप्रमाणे असणारी तुरटी खूपच गुणकारी असते (Skin Care Tips). जुन्या काळात सौंदर्यांसाठी तुरटीचा वापर केला जायचा.
तुरटीचा वापर करून चेहरा आणि केस या दोन्हींचे सौंदर्य वाढवता येते. तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे अनेक समस्यांवर फायदेशीर ठरतात. पण जर नितळ त्वचा हवी असेल तर, तुरटीचा वापर स्किनसाठी कसा करावा? तुरटीच्या वापराने चेहऱ्यावर कोणते सकारात्मक बदल दिसून येतात? पाहूयात(Beauty Secrets Of Alum: How It Benefits Your Skin).
त्वचेसाठी तुरटीचा वापर कसा करावा?
२ वेळा घासूनही दात पिवळेच दिसतात? चमचाभर मिठात मिसळा '१' तेल; चमकदार दातांचं सिक्रेट
लागणारं साहित्य
तुरटी
एलोवेरा जेल
मध
'या' पद्धतीने करा तुरटीचा वापर
सर्वप्रथम, खलबत्त्यात एक तुरटीचा खडा घ्या. त्याला ठेचून बारीक पावडर तयार करा. तुरटीची पावडर एका हवाबंद डब्यात भरून ठेवा. आता एका बाऊलमध्ये, एक चमचा एलोवेरा जेल घ्या. त्यात एक चमचा मध आणि चिमुटभर तुरटीची पावडर घालून मिक्स करा.
तयार पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. नंतर बोटांवर पेस्ट घेऊन चेहऱ्यावर लावा. २ मिनिटांसाठी मसाज करा. ५ मिनिटानंतर ओल्या सुती कापडाने चेहरा पुसून घ्या. या उपायामुळे चेहऱ्यावरचे मुरुमांचे डाग, सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणं गायब होतील.
चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावण्याचे फायदे
ना डाळ - ना सोडा, कपभर तांदुळ घ्या, करा मऊ जाळीदार नारळाचा डोसा! पौष्टिक आणि पोटभर
उन्हाळ्यात चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावण्याचे फायदे अनेक आहेत. त्यात व्हिटॅमिन A, C, E, फॉलिक ॲसिड, कोलीन, बी 1, बी 2, बी 3 आणि बी 6 व्हिटॅमिन बी 12 सारख्या अनेक गुणधर्मांचा भंडार आहे. हे फक्त त्वचेसाठी नसून, आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.
स्किनला उजळ करण्याचं काम मध करते
चेहऱ्यावर विविध प्रकारच्या क्रीम्सचा वापर करण्यापेक्षा, मधाचा वापर करून पाहा. मध नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते. रात्री चेहऱ्यावर लावल्याने त्वचा सुधारते आणि त्वचेचा रंग हळूहळू साफ होऊ लागतो. मध लावल्याने चेहऱ्यावर साचलेली घाण आणि तेल साफ होते.