हॉलीवूड सिंगर, अभिनेत्री जेनिफर लोपेजचं (Jennifer Lopez aka JLo) वय वाढतं की नाही, हा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो कारण वयाची पन्नाशी ओलांडून गेली तरी देखील ती अगदी विशी- पंचविशीतल्या तरुणीसारखी सुंदर आणि टवटवीत दिसते. व्यायाम करून फिगर मेंटेन करणं एकवेळ ठीक आहे. पण चेहऱ्यावर दिसून येणाऱ्या वाढत्या वयाच्या खाणाखुणा (wrinkles) या ही वयात अगदी कंट्रोलमध्ये ठेवणं तिला कसं जमतं, हे एक कोडचं. म्हणूनच तर या वयातही ती एवढी तरुण, सुंदर कशी दिसते, त्यासाठी नेमकं काय करते आणि काय करणं टाळते, याची माहिती boldsky या साईटवर देण्यात आली आहे.
जेनिफर लोपेजच्या साैंदर्याचे ५ सिक्रेट्स१. हायड्रेशन आणि खाण्याच्या सवयीत्वचेचं आतूनच पोषण व्हावं यासाठी तुम्ही त्वचेला किती हायड्रेटेड ठेवता आणि तुमचा आहार कसा आहे, या गोष्टीही महत्वाच्या ठरतात. याविषयी सांगताना हॉलीवूड सेलिब्रिटी जेनिफर म्हणाली, की ती नेहमी भरपूर पाणी पिणे आणि ताजी फळे- भाज्या पुरेशा प्रमाणात खाणे याला नेहमीच प्राधान्य देते. आणि हे तिच्या सुंदर त्वचेचं महत्वाचं कारण आहे.
2. नो स्मोकिंग, ड्रिंकींग आणि कॉफीजेनिफर लोपेजच्या सौंदर्याचं आणखी एक सिक्रेट म्हणजे तिला कोणतंही व्यसन नाही. US weekly यांच्या रिपोर्टनुसार तिने स्मोकिंग, ड्रिंकींग या सवयी सोडून दिलेल्या आहेत. एवढंच नाही तर रोज सकाळी तिला कॉफी प्यायला आवडत असले तरी सध्या ती decaf कॉफी घेते. Decaf कॉफीमध्ये कॅफेन चे प्रमाण 1 ते 2 टक्के एवढे कमी असते. हे तिन्ही विषारी पदार्थ सोडले तर त्याचा त्वचेवर खूप चांगला परिणाम दिसून येतो.
3. मेडिटेशनजेनिफर असं मानते की सौंदर्य हे फक्त बाहेरून उपचार करून मिळत नाही. त्यासाठी आतूनही प्रयत्न होणं गरजेचं आहे. मन आणि शरीर यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळेच मेडिटेशन करून जो आनंद, समाधान मिळतं त्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे ती नियमितपणे मेडिटेशन करते.
4. नाईट केअर रुटीनरात्री कितीही थकलेली असो, जेनिफर झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुणे आणि नंतर नाईट क्रिम लावणे कधीच टाळत नाही. यामुळे दिवसभर थकलेल्या त्वचेला पोषण आणि आराम मिळतो, असे ती मानते. याशिवाय वर्क आऊट केल्यानंतरही ती चेहरा धुते. यामुळे चेहऱ्यावरचे ओपन पोअर्स स्वच्छ होतात.
5. सनस्क्रिनएकतर जेनिफर उन्हात जाणे टाळते. कडक उन्हात ती फार काळ थांबतच नाही. शिवाय उन्हात जाण्याची वेळ आलीच तर सनस्क्रीन लावल्याशिवाय ती बाहेर पडत नाही