Join us  

नखांवर मेहेंदीचा रंग चढून ती लालेलाल दिसतात ? २ सोप्या ट्रिक्स, नखांवरचा मेहेंदीचा रंग उतरेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2023 7:28 PM

2 Best Ways To Get Rid Of Mehendi From Your Nails : हाताला-बोटांना मेहेंदी लावताना चुकून नखांनाही लागली तर नखं लालेलाल होतात, तो रंग काढण्यासाठी खास उपाय...

श्रावणात येणारे सणवार म्हटले की स्त्रिया, मुली यांच्या आनंदाला उधाण येत. येणारा प्रत्येक सण साजरा करायचा म्हटलं की, विशेष करुन स्त्रिया यात मोठ्या उत्साहात सहभाग घेतात. सणावाराच्या निमित्ताने आपल्याला एकमेकांच्या घरी भेट देण्यासाठी जावे लागते. या निमित्ताने एकमेकांकडे आरतीला आणि दर्शनाला जायचे असेल तर आपण छान दिसायलाच हवे, असे आपल्याला वाटते. सगळ्याजणींमध्ये आपणच उठून दिसावे अशी प्रत्येकीची इच्छा असते. यासाठी प्रत्येक स्त्रिया सणवार येण्याआधी पार्लर गाठतात. सणवार साजरा करण्याआधी एकूण सगळीच तयारी करावी लागते, या तयारी सोबतच आपण स्वतः सुंदर दिसण्यासाठी देखील तितकीच मेहेनत घेतो(Beauty Tips : 2 Easy Ways To Remove Mehndi On Nails).

प्रत्येक स्त्री कुठलाही खास प्रसंग, सणवार अशा खास दिवशी सुंदर दिसण्यासाठी पार्लरला आवर्जून जातात. पार्लरला जाऊन आपण फेशियल, क्लिनअप, आयब्रो, वॅक्सिंग, अप्पर लिप्स अशी काही बेसिक तयारी तर नक्कीच करतो. यासोबतच आजकाल छोट्या - मोठ्या खास प्रसंगांसाठी हातांवर मेहेंदी काढण्याची क्रेझ सगळीकडे पाहायला मिळते. हातावर मेहेंदी काढताना काहीवेळा ही मेहेंदी आपल्या नखांवर देखील (How do you remove Mehndi from hand nails?) लागते. मेहेंदी नखांवर लागल्याने नखांवर देखील मेहेंदीचा रंग चढतो. अशावेळी नखांवरील हा रंग (How do I remove black henna stains from my nails? ) जाण्यासाठी हातावरची मेहेंदी जाण्याची वाट पाहावी लागते. नखांवर लागलेल्या मेहेंदीच्या रंगामुळे आपली नखं देखील अस्वच्छ दिसतात. त्यामुळे मेहेंदीचा रंग नखांवर चढू नये यासाठी काही खास टिप्स लक्षात ठेवूयात(How to Remove Mehndi from nails instantly at Home).

हातांवर मेहेंदी काढताना त्याचा रंग नखांवर लागल्यास काय करावे ? 

बरेचदा मेहेंदी काढताना आपण बोटांवर मेहेंदीचे नक्षीकाम करताना काहीवेळा चुकून मेहेंदी ही नखांवर लागते. ही नखांवर लागलेली मेहेंदी जाण्यासाठी आपल्याला हातावरील संपूर्ण मेहेंदी जाण्याची वाट पहावी लागते. परंतु आपण काही घरगुती उपायांचा वापर करून नखांवर लागलेल्या मेहेंदीचा रंग झटपट काढू शकता. 

गोरं करण्याचा दावा करणाऱ्या फेअरनेस क्रिम्स रोज वापरल्या तर खरंच रंग उजळतो का ?

केस गळाल्याने कपाळ खूप मोठे दिसते ? कपाळावरची केस गळती थांबवण्यासाठी १ सोपा उपाय...

१. खोबरेल तेलाचा असा करा वापर :- खोबरेल तेलाच्या मदतीने आपण आपल्या नखांवर लागलेली मेहेंदी क्षणार्धात काढून टाकू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन ते हलकेच कोमट गरम करून घ्यावे. हे गरम पाणी आपल्या हाताला सोसवेल इतकेच गरम असावे. आता आपल्या नखांना खोबरेल तेल लावा त्यानंतर भांड्यात ठेवलेल्या कोमट पाण्यात हात बुडवून ठेवा. यानंतर, नखे आणि बोटे एकत्र घासून घ्या. थोड्याच वेळात आपल्याला दिसेल की नखांवर लागलेला मेहेंदीचा रंग हळुहळु नाहीसा होत आहे. यासोबतच हातही पूर्वीपेक्षा मऊ आणि उजळ दिसू लागतील. नखांवर जर हेअर कलर किंवा डायचा रंग देखील लागला असेल तर तो काढण्यासाठी देखील तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता. 

हनुवटीवरची चरबी खूप वाढल्यानं जॉ लाइन दिसतच नाही ? परफेक्ट जॉ लाइन मिळवण्यासाठी ८ सोपे उपाय...

स्टील वाटी मसाज थेरपी ऐकली आहे कधी ? महागडे फेशियल विसराल असा भारी फुकट फॉर्म्युला...

२. साखर व लिंबाचा वापर करावा :- साखर आणि लिंबाचा वापर करून आपण मेहेंदी लागलेली नखं अगदी सहज स्वच्छ करू शकता. यासाठी एका छोट्या भांड्यात साखर घ्या. आता त्यात लिंबाचा रस घालून द्रावण तयार करा. नंतर हे मिश्रण नखांवर लावा आणि स्क्रब करा. स्क्रब करताना फक्त हलक्या हातांनी नखे घासून घ्यावीत. काहीवेळा स्क्रब केल्यानंतर स्वच्छ पाण्याने हातधुवून घ्यावे, यामुळे नखांवरचे मेंदीचे डाग दूर होतील.

काखेत खूप डिओ मारल्यानं त्वचा काळी पडली आहे ? १ सोपा उपाय, काळेपणासह दुर्गंधीही होईल कमी...

अशाप्रकारे आपण या २ सोप्या घरगुती ट्रिक्सचा वापर करुन नखांवर लागलेल्या मेहेंदीचा रंग अगदी सहजरित्या काढू शकता.

टॅग्स :ब्यूटी टिप्स