Lokmat Sakhi >Beauty > Beauty Tips : वाढतं वय चेहऱ्यावर दिसू नये म्हणून ३ सोपे उपाय; दिसा कायम तरुण आणि फ्रेश

Beauty Tips : वाढतं वय चेहऱ्यावर दिसू नये म्हणून ३ सोपे उपाय; दिसा कायम तरुण आणि फ्रेश

Beauty Tips : सहज-सोपे काही उपाय करुन आपले वय लपवता आले तर....(Antiaging tips) पाहूयात दिर्घकाळ तरुण आणि फ्रेश दिसण्यासाठी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ हंसाजी राजेंद्र काय उपाय सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2022 01:42 PM2022-02-28T13:42:05+5:302022-02-28T13:44:20+5:30

Beauty Tips : सहज-सोपे काही उपाय करुन आपले वय लपवता आले तर....(Antiaging tips) पाहूयात दिर्घकाळ तरुण आणि फ्रेश दिसण्यासाठी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ हंसाजी राजेंद्र काय उपाय सांगतात...

Beauty Tips: 3 Easy Ways to Avoid Aging on face; Looks always young and fresh | Beauty Tips : वाढतं वय चेहऱ्यावर दिसू नये म्हणून ३ सोपे उपाय; दिसा कायम तरुण आणि फ्रेश

Beauty Tips : वाढतं वय चेहऱ्यावर दिसू नये म्हणून ३ सोपे उपाय; दिसा कायम तरुण आणि फ्रेश

Highlightsपार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंटस करण्यापेक्षा आयुर्वेदिक उपायांना सुरकुत्या घालवता आल्या तर...वाढते वय लपवण्यासाठी घरच्या घरी करता येतील असे सोपे आणि सहज उपाय...

आपलं वाढलेलं वय चेहऱ्यावर दिसू नये आणि आपण कायम तरुण दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. हेमामालिनी, रेखा, माधुरी दिक्षित, काजोल इतकं वय होऊन पण आजही तितक्याच सुंदर दिसतात. यामागे नेमकं काय कारण असेल याबाबत आपण अनेकदा उत्सुक असतो. आपल्यातील प्रत्येक जण कधी ना कधी वयस्कर होणार आणि दिसणारही (Beauty Tips), त्याला कोणीही टाळू शकत नाही. पण हे वाढते वय दिसू नये यासाठी आपली जीवनशैली चांगली असणे आवश्यक असते. म्हणजेच आपला आहार-विहार उत्तम असेल तर आपले वय काही काळ लपले जाऊ शकते. हल्ली चेहऱ्यावरील सुरकुत्या लपल्या जाव्यात यासाठी असंख्य उपाय उपलब्ध असून पार्लरपासून ते कॉस्मॅटीक सर्जरीपर्यंतचे उपाय काही जण करताना दिसतात. पण आपल्यासारख्या सामान्यांना हे करणे शक्य असतेच असे नाही. तेव्हा सहज-सोपे काही उपाय करुन आपले वय लपवता आले तर....(Antiaging tips) पाहूयात दिर्घकाळ तरुण आणि फ्रेश दिसण्यासाठी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ हंसाजी राजेंद्र काय उपाय सांगतात...

(Image : Google)
(Image : Google)

१. त्रिफळा चूर्ण

आयुर्वेदातील एक अतिशय महत्त्वाचे औषध असलेले त्रिफळा त्वचेच्या समस्यांसाठीही उपयुक्त ठरते. आवळा, हरडा आणि बेहडा या तीन फळांचे मिश्रण असलेले त्रिफळा चूर्ण ज्याप्रमाणे आरोग्याच्या इतर तक्रारींवर उपयुक्त असते, त्याचप्रमाणे ते त्वचेसाठी गुणकारी ठरते. त्रिफळामध्ये त्वचेतील प्रोटीन वाढवण्याची क्षमता असते. तसेच यामध्ये असणारे ओमेगा ३ फॅटी अॅसिड त्वचेसाठी फायदेशीर ठरते. त्रिफळामध्ये व्हिटॅमिन सी सारखे अँटीऑक्सिडंटस असल्याने त्वचा तजेलदार होण्यास याची मदत होते. रात्री झोपताना ग्लासभर पाण्यात २ चमचे त्रिफळा चू्र्ण घालून ठेवावे. रात्रभर हा ग्लास तसाच ठेऊन सकाळी उठल्यावर हे पाणी प्यावे. त्यामुळे त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. यामध्ये मध, दालचिनी घातल्यास त्याची चव तर चांगली लागेलच पण हे मिश्रण अधिक आरोग्यदायी होईल.

२. आवळा

आवळा आपल्या एकूणच आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो हे आपल्या सगळ्यांना माहित असते. पण रोजच्या धावपळीत आपण आवळ्याचा म्हणावा तितका उपयोग करतोच असे नाही. आवळ्यामध्ये असणारे सी व्हिटॅमिन प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, पचनाचे विकार दूर होण्यासाठी आणि शरीर डीटॉक्स होण्यासाठी उपयुक्त असते. तसेच आवळा केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठीही अतिशय उपयुक्त असतो. आवळ्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस त्वचेवरील सुरकुत्या, डाग, काळेपणा, पिंपल्स कमी कऱण्यास उपयुक्त ठरतात. आवळ्याचे लोणचे, आवळ्याचे सरबत, आवळा कँडी, मोरावळा असे आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ आपण सहज खाऊ शकतो. 

(Image : Google)
(Image : Google)

३. गुळवेल 

गुळवेल ही एक औषधी वनस्पती असून आयुर्वेदात गुळवेलीला खूप महत्त्व आहे. विविध संसर्गांपासून आपला बचाव करण्यासाठी आपण गुळवेल काढा घेतो. त्याचप्रमाणे अँटीइन्फ्लमेटरी गुण असलेली ही गुळवेल त्वचेच्य़ा समस्यांसाठी अतिशय उत्तम उपाय आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम असणारी गुळवेल त्वचा चांगली राहण्यासाठीही फायदेशीर ठरते. यातील फ्लॅवोनाईड हा घटक शरीरातील पेशींशी लढण्यासाठी आणि नवीन पेशींची निर्मिती करण्यासाठी उपयुक्त असतो. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यासाठी आणि त्वचा चमकदार दिसण्यासाठी गुळवेल फायदेशीर ठरते. गुळवेल काढा किंवा गुळवेलच्या गोळ्या आयुर्वेदीक दुकानांमध्ये सहज उपलब्ध असतात. त्या औषधावर दिलेल्या सुचनांप्रमाणे आपण याचा डोस घ्यायला हवा. 
 

 

Web Title: Beauty Tips: 3 Easy Ways to Avoid Aging on face; Looks always young and fresh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.