Join us  

त्वचा सैल झाली? स्किन टाइटनिंगसाठी करा ३ व्यायाम... तरुण त्वचेचं सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2022 3:08 PM

Beauty tips: शरीरावर चरबीचे थर साचू नयेत, म्हणून शरीराला जशी व्यायामाची गरज असते ना, तशीच व्यायामाची गरज आहे तुमच्या चेहऱ्याला (importance of facial massage).. म्हणूनच करा हे ३ व्यायाम....

ठळक मुद्देचेहऱ्याला मसाज करण्यासाठी सिरम, शुद्ध तूप किंवा बदाम तेल, मसाज क्रिम यापैकी कशाचाही वापर करा. 

व्यायाम करणारी व्यक्ती आणि व्यायाम न करणारी व्यक्ती या त्यांच्या बॉडी पोश्चरवरून, अंगावर चढलेल्या चरबीवरून लगेच ओळखू येतात. नियमित व्यायाम करणाऱ्या लोकांचे शरीर एकदम टोन्ड आणि शेपमध्ये असते. याउलट जे लोक व्यायाम करत नाहीत त्यांच्या दंडावर, पोटऱ्यांवर, मांडीवर, पोटावर लगेचच चरबीचे थर दिसून येतात. अगदी सहज आपण ते थर बघू शकतो. असेच थर तुमच्या चेहऱ्यावरही (skin care tips) साचत जातात. 

 

यामुळे चेहरा एकतर सुजल्यासारखा दिसतो किंवा मग चेहरा सैल पडून त्यावर सुरकुत्या (wrinkles on face) येण्यास सुरुवात होते. या सुरकुत्या स्पेशली डोळ्यांच्या शेवटच्या टोकाजवळ, वरच्या पापण्यांच्या वरच्या भागात, कपाळावर दिसू लागतात. तसेच सुरकुत्यांचे प्रमाण वाढले तर त्या ओठांच्या टोकाजवळचा जो गालाचा भाग असतो, त्यावरही दिसायला लागतात. म्हणूनच अशा सुरकुत्या (skin tightning tips in Marathi) दिसू नयेत किंवा चेहरा सुजल्यासारखा वाटू नये, यासाठी चेहऱ्याला आठवड्यातून दोन- तीन वेळा मसाज करायला पाहिजे. याविषयीचा एक व्हिडियो इन्स्टागामच्या beautyfulyoutips या पेजवर शेअर करण्यात आल्या आहेत. चेहऱ्याला मसाज करण्यासाठी सिरम, शुद्ध तूप किंवा बदाम तेल, मसाज क्रिम यापैकी कशाचाही वापर करा. 

 

चेहरा तरुण ठेवण्यासाठी करा असा व्यायाम3 facial exercise for young and wrinkle free skin- सगळ्यात आधी तर डोळ्यांच्या भोवतीच्या सुरकुत्या घालविण्यासाठी डोळ्याच्या शेवटच्या टोकाकडच्या भागाला दोन्ही हातांनी खालून आणि वरतून अशा पद्धतीने पकडा. वरचा हात भुवयांच्या शेजारी तर खालचा हात गालाच्या वरच्या भागात असायला हवा. आता दोन्ही हातांच्या बोटांनी या भागाची मसाज करा. वरच्या हाताच्या बोटांनी तेथील त्वचा वर ओढण्याचा तर खालच्या हाताच्या बोटांनी त्वचा खाली ओढण्याचा प्रयत्न करा. १५ ते २० सेकंद अशा पद्धतीने मसाज करा.

 

२. आता हा दुसऱ्या पद्धतीचा व्यायाम आपल्याला स्किन टाईटनिंगसाठी करायचा आहे. यामध्ये एका हाताने गालाच्या वरच्या भागातली कानाजवळ असणारी त्वचा वरच्या बाजूने ओढून ठेवा. आता दुसऱ्या हाताने त्याच गालावर ओठांपासून कानाजवळ असा खालून वर या पद्धतीने मसाज करा. दोन्ही गालांवर प्रत्येकी १० ते १५ सेकंद अशा पद्धतीने मसाज करा.

 

३. वरच्या पापणीच्या जवळची त्वचा अनेकदा सुरकुतलेली, सैल पडलेली दिसते. त्यामुळे या त्वचेलाही व्यायाम देणं, मसाज देणं गरजेचं आहे. यासाठी उजव्या हाताचे मधले बोट उजव्या भुवयीच्या मध्यभागी आणि डाव्या हाताचे मधले बोट डाव्या भुवयीच्या मध्यभागी ठेवा. आता दोन्ही बोटांनी भुवया वर उचलून घ्या. १० ते १५ सेकंद अशा पद्धतीने दोन्ही भुवयांना ताण द्या. यामुळे डोळ्याच्या वरची त्वचाही छान टाईट आणि टवटवीत दिसू लागेल.

 

चेहऱ्याला मसाज करण्याचे फायदेBenefits of facial massage in Marathi- चेहऱ्याची त्वचा सैलसर न पडता टाईट राहण्यास मदत होते.- त्वचा सैल पडून त्यावर सुरकुत्या येत नाहीत.- चेहरा सुजल्यासारखा दिसत नाही.- चेहऱ्यावर अतिरिक्त चरबीचे थर साचत नाहीत.- चेहऱ्याला मसाज केल्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेचे व्यवस्थित रक्ताभिसरण होते. यामुळे चेहरा चमकदार, तजेलदार आणि तरुण दिसू लागतो.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी