Lokmat Sakhi >Beauty > गरबा खेळताना मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घालायचे पण? ३ सोपे उपाय, काळवंडलेली पाठ उजळेल

गरबा खेळताना मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घालायचे पण? ३ सोपे उपाय, काळवंडलेली पाठ उजळेल

3 Ways To Clean Back: गरबा खेळायला जायचं म्हणून फेशियल केलं असणारच, पण पाठीचं काय पाठ काळी पडली असेल तर हे काही उपाय लगेचच करून टाका....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2023 09:11 AM2023-10-14T09:11:19+5:302023-10-16T13:54:07+5:30

3 Ways To Clean Back: गरबा खेळायला जायचं म्हणून फेशियल केलं असणारच, पण पाठीचं काय पाठ काळी पडली असेल तर हे काही उपाय लगेचच करून टाका....

Beauty Tips: 3 Ways to clean back? How to remove tanning from back? | गरबा खेळताना मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घालायचे पण? ३ सोपे उपाय, काळवंडलेली पाठ उजळेल

गरबा खेळताना मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घालायचे पण? ३ सोपे उपाय, काळवंडलेली पाठ उजळेल

Highlightsचेहरा छान तुकतुकीत- चमकदार आणि पाठ मात्र काळी असं तर झालं नाही ना?

नवरात्रोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे प्रत्येकीची काही ना काही तयारी सुरूच आहे. आता गरबा खेळायला जायचं म्हणजे मग पार्लर, हेअरस्टाईल, मेकअप हे सगळं झालंच पाहिजे. म्हणूनच अनेकींचं आता फेशियल, क्लिनअप असं सगळं करून झालंच असेल. पण चेहरा चमकवत असताना पाठीकडे दुर्लक्ष तर होत नाही ना, चेहरा छान तुकतुकीत- चमकदार आणि पाठ मात्र काळी असं तर झालं नाही ना, हे एकदा तपासून घ्या (3 Ways to clean back?). कारण नवरात्रात साडी- घागरा असं घातल्या जातं आणि त्याचे ब्लाऊजही छान मोठ्या पाठीचेच असतात. म्हणूनच आता पाठ देखील चेहऱ्याप्रमाणेच छान चमकविण्यासाठी हे काही घरगुती उपाय करून पाहा (HOME REMEDIES TO CLEAN BACK)... बॉडी पॉलिशिंग केल्याप्रमाणे चमकेल तुमची पाठ. 

 

पाठ काळी पडली असेल तर उपाय

१. टॉवेलने घासा

हा एक सगळ्यात सोपा आणि अगदी झटपट होणारा उपाय आहे. पाठ खूप टॅन झाली नसेल तर हा उपाय अगदी उत्तम आहे. यासाठी एखादा जाडाभरडा किंवा खरखरीत टॉवेल एवढं एकच साहित्य तुम्हाला लागणार आहे.

कितीही प्रयत्न केला तरी वजन कमीच होत नाही? पाहा हमखास करताय या ३ चुका

पण काही दिवस दररोज न चुकता हा उपाय मात्र करावा लागतो. यासाठी जेव्हा आंघोळ होईल तेव्हा फक्त १ मिनिटाचा वेळ काढा आणि टॉवेलने पाठ स्वच्छ घासा. उभा- आडवा असा सगळीकडे टॉवेल फिरेल याची काळजी घ्या.

 

२. मुलतानी माती

मुलतानी मातीचा खरखरीतपणा पाठीला स्क्रब करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो.

दोन हजारांची महागडी साडी तुम्ही किती वेळा नेसता? - सुधा मुर्ती सांगतात बचतीचा सोपा मंत्र

यासाठी एका वाटीत मुलतानी माती घ्या. माती जेवढी असेल तेवढीच त्यात चंदन पावडर टाका. कच्चं दूध टाकून हे मिश्रण कालवून घ्या आणि हा लेप पाठीला लावून पाठ चोळून घ्या. नंतर पाठ स्वच्छ धुतली की तिला मॉईश्चरायझर लावा.

 

३. कॉफी स्क्रब

पाठीची त्वचा तुकतुकीत करण्यासाठी कॉफी खूप उपयुक्त आहे. यासाठी १ टेबलस्पून कॉफी घ्या. त्यात १ टेबलस्पून साखर आणि १ टेबलस्पून लिंबाचा रस तसेच मध टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित एकत्र केलं की त्या मिश्रणाने पाठ चोळून घ्या. पाठ एकदम स्वच्छ होईल. 

 

Web Title: Beauty Tips: 3 Ways to clean back? How to remove tanning from back?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.