Lokmat Sakhi >Beauty > Beauty Tips: लिपबामचे हे भन्नाट उपयोग तुम्हाला माहिती आहेत का? असाही करू शकता वापर 

Beauty Tips: लिपबामचे हे भन्नाट उपयोग तुम्हाला माहिती आहेत का? असाही करू शकता वापर 

लिपबामचा उपयोग आतापर्यंत केवळ ओठांना लावण्यासाठीच करत होतात ना? आता लिपबामचे हे भन्नाट उपयोगही जाणून घ्या. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 06:49 PM2021-10-06T18:49:10+5:302021-10-06T18:49:59+5:30

लिपबामचा उपयोग आतापर्यंत केवळ ओठांना लावण्यासाठीच करत होतात ना? आता लिपबामचे हे भन्नाट उपयोगही जाणून घ्या. 

Beauty Tips: Are you aware of these abandoned uses of lip balm? | Beauty Tips: लिपबामचे हे भन्नाट उपयोग तुम्हाला माहिती आहेत का? असाही करू शकता वापर 

Beauty Tips: लिपबामचे हे भन्नाट उपयोग तुम्हाला माहिती आहेत का? असाही करू शकता वापर 

Highlightsलिपबाम वापरण्याचे अनेक फायदे आहेत, ज्याचा आपण विचारही केला नसेल.

आजकाल लिपबाम वापरत नाही, अशी क्वचितच एखादी तरूणी किंवा मुलगी आढळून येईल. एकवेळ आपण दररोज लिपस्टिक लावत नाही. पण लिपबाम मात्र आवर्जून लावतो. लिपबामची एवढी सवय झालेली असते की एखाद्या दिवशी जरी लिपबाम लावला नाही, तरी ओठ ओढल्यासारखे, कोरडे वाटू लागतात. त्यामुळे केवळ थंडीतच नाही तर उन्हाळा आणि पावसाळ्यात देखील लिपबामचा वापर दररोजच केला जातो. पण केवळ ओठांना मॉईश्चराईज करणे, एवढाच लिपबामचा उपयोग नाही. लिपबाम वापरण्याचे अनेक फायदे आहेत, ज्याचा आपण विचारही केला नसेल.

 

डोळ्यांच्या मेकअपसाठी वापरा लिपबाम
आयब्रो पेन्सिल आणि मस्कारा नसेल, तर त्याऐवजी तुम्ही लिपबाम वापरू शकता. आयब्रो सेट करण्यासाठी लिपबाम अतिशय उपयुक्त ठरतो. याशिवाय भुवयांना लिपबाम लावल्याने त्या अधिक डार्क आणि ग्लॉसी दिसू लागतात. याशिवाय मस्कारा नसेल तर लिपबाम लावून तुम्ही तुमच्या पापण्या सेट करू शकता. यासाठी तुमच्या बोटाला लिपबामचा पातळ थर लावा. हे बोट तुमच्या डोळ्यांच्या खालच्या आणि वरच्या पापण्यांच्या मधे धरा आणि दोन- तीन वेळा डोळ्यांची उघडझाप करा. असे करताना बोटावरचे लिपबाम पापण्यांना लागेल पण डोळ्यात जाणार नाही, याची काळजी घ्या. असे केल्यामुळे तुमच्या पापण्यांना ग्लॉसी लूक मिळतो.

 

लिपबाम करू शकते हायलायटरचे काम
अगदी सहजपणे लिपबामचा वापर हायलायटरप्रमाणे करता येतो. हाय लायटरप्रमाणे तुमचे चिकबोन आणि हनूवटीवर लिपबाम लावा. यामुळे चेहऱ्याचे पॉईंट्स, जॉ लाईन एकदम उठून दिसेल. यावर हायलायटर पावडर देखील लावता येते. 

हातातली अंगठी निघत नाहीये
अनेकदा आपण आपल्या मापापेक्षा लहान असणारी अंगठी घालतो आणि ती बोटात फसून बसते. अशी बोटात फसलेली अंगठी काढण्यासाठी साबणाचा फेस करावा असं आपण ऐकलेलं असतं. पण आता आपण घराबाहेर असून आणि साबण मिळणे शक्य नसेल, तर तुमच्या पर्समधून लिपबाम काढा. अंगठीच्या वर आणि खाली व्यवस्थित चाेळून घ्या. सगळ्या बोटाला लिपबाम लावा आणि अंगठी ओढून काढा. लगेच अंगठी बोटातून बाहेर येईल. 

 

बेबी हेअर्सला सेट करण्यासाठी
आपली हेअर लाईन जिथे असते, तिथे अनेक लहान- लहान केस असतात. या केसांना बेबी हेअर म्हणतात. जेव्हा आपण हेअरस्टाईल करतो, तेव्हा हे बेबी हेअर आकाराने लहान असल्याने सारखे सटकतात. या केसांना सेट करण्यासाठी लिपबामचा वापर अगदी योग्य प्रकारे केला जाऊ शकतो. लिपबाम या केसांना लावा आणि केस हवे तसे सेट करा. ३ ते ४ तास तुमचे केस जागेवरून हलणार नाहीत. 

 

हाताचे- पायाचे कोपरे उजळतील
अनेक जणींच्या हाताची कोपरं आणि पायाचे घोटे अगदी काळे पडलेले असतात. रोज अंघोळ झाल्यावर जर या काळवंडलेल्या कोपऱ्यांवर नियमितपणे लिपबाम चोळलं आणि हलक्या हाताने काही सेकंद मालिश केली तर महिन्याभरात या भागावरचा काळेपणा कमी होतो. 

 

Web Title: Beauty Tips: Are you aware of these abandoned uses of lip balm?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.