उन्हाच्या कडाक्यातून त्वचेचं संरक्षण करायचं असेल तर दिवसभरातून कधीही घराबाहेर पडताना आठवणीने सनस्क्रिन लोशन लावणं खूप गरजेचं आहे, हे तर आपण जाणतोच.. त्यामुळे सनस्क्रिन लोशन घ्यायचं आणि ते चेहऱ्यावर लावायचं.. या गोष्टी आपल्याकडून अगदी सहज होऊन जातात आणि त्या आपण खूपच कॅज्युअली घेतो. नेमकं कसं, किती आणि केव्हा लावायचं याकडे आपण फार गांभीर्याने लक्षच देत नाही. त्यामुळेच तर मग सनस्क्रिन लोशन लावूनही त्याचा म्हणावा तसा फायदा आपल्या चेहऱ्यावर दिसून येत नाही. (common mistakes while applying sunscreen)
म्हणूनच सनस्क्रिन लोशन योग्य पद्धतीने कसं लावावं, याची अचूक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. अन्यथा महागडं सनस्क्रिन लोशन आणूनही काही उपयोग नाही. म्हणूनच डॉ. अंकूर सरीन यांनी सांगितलेल्या या ५ टिप्स फॉलो करा आणि अचूक पद्धतीने सनस्क्रिन कसं लावायचं ते बघा. हा उपाय त्यांनी इन्स्टाग्रामच्या drankursarin_sarinskin या पेजवर शेअर केला आहे..(instagram share)
सनस्क्रिन लोशन लावताना करू नका ५ चुका
१. सनस्क्रिन लोशन लावण्याचं योग्य प्रमाण कोणतं, याचा अंदाज अनेक जणांना नसतो. त्यामुळे साधारणपणे मॉईश्चरायझर जसं लावतो, त्याप्रमाणात सनस्क्रिन लोशन लावलं जातं. पण एवढं कमी सनस्क्रिन लोशन लावलं तर त्यामुळे त्वचेचं संरक्षण होऊ शकणार नाही. आपल्या हाताची पहिली दोन बोट आहेत, त्यावर सनस्क्रिन लोशनने उभ्या रेषा मारल्या तर जेवढं सनस्क्रिन लागेल, तेवढं आपण लावलं पाहिजे. ते योग्य प्रमाण आहे.
२. बाजारात अनेक प्रकारचे सनस्क्रिन लोशन उपलब्ध आहेत. त्यापैकी तुमचा स्किन टोन आणि स्किन टाईप याला मॅच होणारं सनस्क्रिन लोशन खरेदी करा. कारण ते तुमच्या त्वचेसाठी अधिक फायद्याचं ठरेल.
३. सनस्क्रिन लोशन लावल्यानंतर २० मिनिटे घराच्या बाहेर पडू नका. काही जणी लोशन लावतात आणि लगेच बाहेर जातात. यामुळे मग कितीही महागडं सनस्क्रिन असलं तरी त्याचा उपयोग शुन्य.
४. सनस्क्रिन लोशन म्हणजे फक्त उन्हाळ्यात लावायचं, असा अनेकांचा समज असतो. पण हे चूक आहे. जेव्हा ढगाळ वातावरण असेल तेव्हाही तुम्ही घराबाहेर पडताना सनस्क्रिन लावलं पाहिजे.
५. सनस्क्रिन लोशन निवडताना त्यावर spf किती आहे, हे लक्षात घ्या. spf 50 असणारे लोशन तुमच्या त्वचेसाठी उत्तम आहेत.