घराबाहेर पडताना कितीही काळजी घेतली, सनकोट, हॅण्ड ग्लोव्ह्ज असं सगळं घातलं तरी उन्हाळ्यात हात पाय काळवंडतात.. एरवीही हात- पाय यांचं टॅनिंग होतंच, पण उन्हाळ्यात हे प्रमाण खूप जास्त वाढतं.. चेहऱ्यासोबतच हात- पाय लगेचच रापलेले, काळवंडलेले दिसू लागतात. आता काळवंडलेल्या हात- पायांना (tanning of legs and hands) पुन्हा उजळ करायचे म्हटले तर त्यांचे ब्लिच करावे लागणार.. ब्लीच करायला पार्लरला जायचे म्हटले तर कमीत कमी हजार रुपयांचा खर्च तर नक्कीच.. आता एवढे पैसे वारंवार देणं खरोखरंच जीवावर येण्याचं काम.. म्हणूनच तर हा घ्या त्यावरचा एक बेस्ट उपाय... फक्त २० रुपयांत करा दोन्ही हातांचे आणि पायांचे ब्लीच.. (how to reduce tanning?)
२० रुपयांत दोन्ही हात आणि दोन्ही पाय यांचं ब्लीच होणं कसं शक्य आहे, असं वाटत असल्यास हा व्हिडिओ बघाच.. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या diy_queen_geetand_beauty_health_mantra या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या ४ गोष्टी वापरून ब्लीच कसं करायचं हे सांगितलं आहे... या सगळ्या वस्तूंचा हिशोब केला तर ब्लीच करण्यासाठी लागणारं सामान हे नक्कीच २० रुपयांपेक्षा अधिक नाही.. पण ब्लीच केल्यानंतर तुमच्या हात- पायांना येणारा ग्लो लाजवाब असेल, हे मात्र नक्की..
कसं करायचं घरच्याघरी ब्लीच?- ब्लीच करण्यासाठी १ टीस्पून कॉफी, १ टीस्पून साखर, अर्धा टीस्पून बेकींग सोडा एका बाऊलमध्ये घ्या.- यामध्ये अर्धे लिंबू पिळा आणि सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. हे झालं आपलं ब्लीच मिक्स.- आता हे मिश्रण लिंबाच्या सालाच्या साहाय्याने हातांवर चोळा. चोळण्यापुर्वी हात थोडेसे ओले करून घ्या.- या मिश्रणाने १० ते १५ मिनिटे मसाज केल्यानंतर हात स्वच्छ धुवून टाका.- हाताचं टॅनिंग निघून गेलेलं दिसेल आणि हात आधीपेक्षा कितीतरी जास्त फ्रेश, तजेलदार आणि उजळ झालेले दिसतील. - अशाच पद्धतीने तुम्ही पायाचंही ब्लीच करू शकता..- उन्हाळ्यात टॅनिंगचं प्रमाण वाढतं. त्यामुळे आठवड्यातून किंवा १५ दिवसांतून एकदा तरी हा उपाय करावाच.