Lokmat Sakhi >Beauty > दबंग गर्ल सोनाक्षी म्हणतेय, तुप खाऊन रूप येतं.... लॉकडाऊनमध्ये केले 'घी'वाले प्रयोग

दबंग गर्ल सोनाक्षी म्हणतेय, तुप खाऊन रूप येतं.... लॉकडाऊनमध्ये केले 'घी'वाले प्रयोग

साजूक तुप खाऊन रूप येतं.... हे वाक्य आपल्या आई, आजी आणि इतर अनेक जणींकडून आपण वारंवार ऐकलेलं आहे. पण आता मात्र बॉलीवुड अभिनेत्री दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सुद्धा हेच सांगू लागली आहे. 'घी'वाले अनेक घरगुती उपाय तिने लॉकडाऊन काळात केले असून तिला खूपच फायदा झाल्याचे ती सांगत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 03:06 PM2021-07-02T15:06:06+5:302021-07-02T15:13:01+5:30

साजूक तुप खाऊन रूप येतं.... हे वाक्य आपल्या आई, आजी आणि इतर अनेक जणींकडून आपण वारंवार ऐकलेलं आहे. पण आता मात्र बॉलीवुड अभिनेत्री दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सुद्धा हेच सांगू लागली आहे. 'घी'वाले अनेक घरगुती उपाय तिने लॉकडाऊन काळात केले असून तिला खूपच फायदा झाल्याचे ती सांगत आहे.

Beauty tips : Dabang girl bollywood actress Sonakshi Sinha shares the uses of Ghee for skin care treatment | दबंग गर्ल सोनाक्षी म्हणतेय, तुप खाऊन रूप येतं.... लॉकडाऊनमध्ये केले 'घी'वाले प्रयोग

दबंग गर्ल सोनाक्षी म्हणतेय, तुप खाऊन रूप येतं.... लॉकडाऊनमध्ये केले 'घी'वाले प्रयोग

Highlightsतुपामध्ये व्हिटॅमिन ए, डी आणि ई मोठ्या प्रमाणावर असते. तुपामुळे त्वचेचे उत्तमप्रकारे पोषण होते आणि डिहायड्रेशन होत नाही. केसांना जर तुप लावले, तर केसगळती कमी होते. तसेच केसांचे पोषण होऊन ते मजबूत होतात आणि चमकदार दिसू लागतात. 

तुप खायचे की नाही खायचे, मग खायचे तर किती खायचे असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. कधी आपण तुपाविषयी खूपच चांगले ऐकतो तर कधी तुप अगदी मोजून मापूनच खावे, असे आपल्या कानावर येते. तुपाविषयी अनेक समज- गैरसमज आपल्या मनात आहेत. पण आता मात्र बॉलीवुडची स्टनिंग ॲक्ट्रेस सोनाक्षी सिन्हानेच सौंदर्य वाढीसाठी तुप अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले आहे. एवढेच नव्हे तर तिने स्वत: या गोष्टीचा अनुभव घेतला असून तुपामुळे खरंच रूप येते, हा तिच्या आईने सांगितलेला मंत्र आता तिला बरोबर पटला आहे. 

 

तुपाने अशी कोणती बरं जादू केली ?
सोनाक्षी सिन्हाने तिचा एक फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती म्हणते की लॉकडाऊन काळात तिला तिच्या सौंदर्याची काळजी घेण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. सौंदर्य वाढविण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी तिने या काळात तिच्या आईने सांगितलेले काही घरगुती उपाय करून पाहिले. हे उपाय अत्यंत सोपे असून भारतातल्या कोणत्याही स्वयंपाक घरात अगदी सहज उपलब्ध होतील, असे काही पदार्थ वापरून तिने तिचे सौंदर्य खुलविले आहे. सोनाक्षीने शेअर केलेला तिचा सुंदर फोटोच या गोष्टीचा मोठा पुरावा आहे. या फोटोत अतिशय कमी मेकअप करूनही सोनाक्षीचे सौंदर्य खुलून आलेले दिसते आहे.

 

केसांसाठीही तुप उपयुक्त
आपल्या आहारात रोज तुप योग्य प्रमाणात घेतले पाहिजे. तुप केवळ त्वचेसाठीच नाही तर केसांसाठीही अतिशय उपयुक्त आहे. हा अस्सल 'घी'वाला प्रयोग सुरू केल्यापासून आपली त्वचा नेहमीच फ्रेश दिसत असल्याचेही सोनाक्षीने शेअर केले आहे. तुपामध्ये असलेले फॅटी ॲसिड संवेदनशील त्वचेसाठी उपयुक्त असल्याचेही काही अभ्यासातून समोर आले आहे. तुपामुळे त्वचा अतिशय मऊ, चमकदार होते आणि रंगही उजळतो असेही म्हटले जाते. 

 

तुप खाण्याचे 'हे' फायदेही जाणून घ्या
१. तुपाला ॲण्टीएजिंग म्हणून ओळखले जाते. त्यामुळे नियमितपणे तुप लावून चेहऱ्याला हळूवार मसाज केली तर त्वचा चमकदार होते आणि चेहरा अधिक काळ तरूण राहतो.
२. हिवाळ्यात त्वचेचे पोषण करण्यासाठी साजूक तुपाने चेहऱ्याची मसाज केली पाहिजे.
३. ओठ फुटण्याचा त्रासदेखील तुप लावल्याने लगेच कमी होताे आणि ओठ मुलायम होतात. 
४. डार्क सर्कल्सचा त्रास कमी करण्यासाठी डोळ्यांच्या भोवती रोज रात्री तुप लावा. काही दिवसातच फरक जाणवू लागेल. 

 

Web Title: Beauty tips : Dabang girl bollywood actress Sonakshi Sinha shares the uses of Ghee for skin care treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.