Join us  

चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्सचं जंगल? लावा मोसंबीचा फेसपॅक, मिळवा फ्लॉलेस त्वचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 2:02 PM

Home remedies for pimples: मोसंबी खा आणि थोडी आपल्या चेहऱ्यासाठीही राखून ठेवा... कारण मोसंबीमध्ये आहे तुमचे सौंदर्य खुलविण्याची अजब जादू...

ठळक मुद्देवयापेक्षाही अधिक तरूण दिसायचं असेल, तर मोसंबीचा रस आणि फेसपॅक चेहऱ्याला नियमितपणे लावा. 

Beauty tips: चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या खूप जणींमध्ये जाणवते. एका ठिकाणावरचा पिंपल गेला नाही की लगेच दुसऱ्या जागेवर पिंपल्स तयार. बरं हे पिंपल्स पण असे असतात की जेव्हा चेहऱ्यावरून जातात, तेव्हा त्यांची निशाणी चेहऱ्यावर तशीच ठेवतात. पिंपल्सच्या जागी मग काही दिवस काळे डाग दिसू लागतात. यामुळे मग संपूर्ण चेहराच जणू पिंपल्स आणि डागांनी भरून गेलेला दिसतो. तुम्हालाही अशी समस्या जाणवत असेल तर कोणतेही महागडे उपचार करून बघण्याआधी हा सोपा उपाय नक्की करून बघा. मोसंबीचा छान फेसपॅक (sweet lemon facepack) बनवा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरचे डाग, पिंपल्स तर जातीलच पण चेहरा अधिक स्वच्छ आणि उजळ दिसू लागेल..

 

Benefits of Sweet lemon for skinमोसंबीचा रस किंवा फेसपॅक चेहऱ्याला लावल्यामुळे होणारे फायदे - मोसंबी हे लिंबूवर्गीय फळ आहे. त्यामुळे लिंबू हे जसे नॅचरल ब्लिचिंग एजंट natural bleaching agent म्हणून ओळखले जाते, तसेच मोसंबी देखील नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून उपयुक्त ठरते. मोसंबीमुळे चेहऱ्यावरचे डाग निघून जाण्यास आणि त्वचेचा काळवंडलेपणा दूर करण्यास मदत होते. - चेहऱ्यावर खूप जास्त पिंपल्स येत असल्यास मोसंबीचा फेसपॅक sweet lemon facepack त्यावरचा उत्तम इलाज आहे.- ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सच्या समस्येसाठीही मोसंबीचा रस उपयुक्त मानला जातो.- मोसंबीचा रस किंवा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने त्वचा चमकदार होते.

- मोसंबीच्या रसामध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स anti oxidants आणि व्हिटॅमिन सी vitamin c असते. त्यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या येत असतील, त्वचा डल, निस्तेज दिसत असेल, तर मोसंबीचा रस लावावा. त्वचा तुकतुकीत आणि टवटवीत दिसेल.- ॲण्टी एजिंग एजंट anti aging effect म्हणून मोसंबीचा रस खूपच परिणामकारक ठरतो. म्हणूनच वयापेक्षाही अधिक तरूण दिसायचं असेल, तर मोसंबीचा रस आणि फेसपॅक चेहऱ्याला नियमितपणे लावा. - काही जणींची मान, हाताचे कोपर आणि गुडघे खूपच जास्त काळे असतात. या भागांवरचा काळेपणा साफ करायचा असेल तर त्यावर नियमितपणे मोसंबीचा रस चोळा. या भागावरचा काळेपणा दूर होईल.

 

कसा बनवायचा मोसंबीचा फेसपॅक?- मोसंबीचा फेसपॅस बनविण्यासाठी मोसंबीच्या सालांचा वापर करावा लागतो. यासाठी मोसंबीच्या सालांचे बारीक बारीक तुकडे करा आणि ते पाण्यात भिजत ठेवा. यानंतर हे तुकडे मिक्सरमधून काढा आणि त्याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये मध टाकून तुम्ही हा फेसपॅक चेहऱ्याला लावू शकता.- मोसंबीचा रस आणि मध एकत्र करून चेहऱ्याला लावणेही फायद्याचे ठरते.- मोसंबीच्या रसात बेसन पीठ आणि थोडी हळद मिक्स करून हा फेसपॅक चेहऱ्याला लावावा. 

- मोसंबीच्या सालांची पेस्ट आणि त्यात थोडे मसूर डाळीचे पीठ असे मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला लावावे. नॅचरल स्क्रबर म्हणून हा एक चांगला उपाय आहे.- मोसंबीच्या सालांची पेस्ट दोन टेबलस्पून घ्या. त्यात दोन टी स्पून कॉफी पावडर टाका. हे फेसपॅक चेहऱ्याला लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. त्वचा तुकतुकीत होईल आणि त्वचेवरचा निस्तेजपणा निघून जाईल.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजी