Lokmat Sakhi >Beauty > मेकअप करा स्टेप बाय स्टेप, 14 गोष्टी आणि मिळवा परफेक्ट सेलिब्रिटी मेकअप लूक  

मेकअप करा स्टेप बाय स्टेप, 14 गोष्टी आणि मिळवा परफेक्ट सेलिब्रिटी मेकअप लूक  

अनेकींना प्रश्न पडतो की, सेलिब्रिटी जेव्हा मेकअप करतात तेव्हा किती छान दिसतात. पण आपण मेकअप केला तर एकतर तो खूप भडक दिसतो नाहीतर लगेच उतरुन जातो. असं का? सौंदर्यतज्ज्ञ म्हणतात याला कारण मेकअप करताना मेकअपचा योग्य क्रम पाळलेला नसणं. योग्य क्रमानं मेकअप केल्यास आपलाही लूक प्रोफेशनल सेलिब्रिटींसारखाच दिसेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 05:09 PM2021-12-07T17:09:56+5:302021-12-07T17:25:40+5:30

अनेकींना प्रश्न पडतो की, सेलिब्रिटी जेव्हा मेकअप करतात तेव्हा किती छान दिसतात. पण आपण मेकअप केला तर एकतर तो खूप भडक दिसतो नाहीतर लगेच उतरुन जातो. असं का? सौंदर्यतज्ज्ञ म्हणतात याला कारण मेकअप करताना मेकअपचा योग्य क्रम पाळलेला नसणं. योग्य क्रमानं मेकअप केल्यास आपलाही लूक प्रोफेशनल सेलिब्रिटींसारखाच दिसेल.

Beauty Tips: Do Makeup Step by Step, 14 Things and Get the Perfect Celebrity Makeup Look | मेकअप करा स्टेप बाय स्टेप, 14 गोष्टी आणि मिळवा परफेक्ट सेलिब्रिटी मेकअप लूक  

मेकअप करा स्टेप बाय स्टेप, 14 गोष्टी आणि मिळवा परफेक्ट सेलिब्रिटी मेकअप लूक  

Highlightsउत्तम मेकअप करण्याच्या14 स्टेप्स आहेत, त्या ज्या क्रमाने दिलेल्या आहेत त्याच क्रमानं पाळाव्या लागतात. मेकअप आधी आपलं डेली स्किन केअर रुटीन आवश्यक आहे.मेकअप दीर्घकाळ टिकण्यासाठी मेकअप झाल्यावर सेंटिंग स्प्रेच्या सहाय्यानं मेकअप सेट करावा लागतो.

मेकअप हा आजच्या लाइफ स्टाइलचा एक भाग झाला आहे. वेगवेगळ्या प्रसंगासाठी वेगवेगळ्या प्रकारचा मेकअप लागतोच. अगदी वर्क फ्रॉम होम करतानाही ऑनलाइन मिटींग कराव्या लागतात, त्यासाठीही बेसिक मेकअप लागतोच. आपल्या व्यक्तिमत्त्वाला उठाव मिळण्यासाठी मेकअप हा गरजेचा झाला आहे हे खरं, पण मेकअप नीट दिसण्यासाठी तो योग्य तर्‍हेने करता यायला हवा.

Image: Google

अनेकींना प्रश्न पडतो की, सेलिब्रेटी जेव्हा मेकअप करतात तेव्हा किती छान दिसतात. पण आपण मेकअप केला तर एकतर तो खूप भडक दिसतो नाहीतर लगेच उतरुन जातो. असं का? सौंदर्यतज्ज्ञ म्हणतात याला कारण मेकअप करताना मेकअपचा योग्य क्रम पाळलेला नसणं. जर योग्य क्रमानं मेकअप केला तर आपणही मेकअप केल्यावर करिना कतरिना आलिया इतक्याचं सुंदर दिसू शकतो. सौंदर्य तज्ज्ञांनी मेकअप चेहर्‍यावर शोभून दिसण्यासाठी आणि टिकून राहाण्यासाठी मेकअप करण्याचा योग्य क्रम सांगितला आहे.

मेकअप करा क्रमाने!

1. क्लीन्जर: मेकअप करण्याची पहिली पायरी म्हणजे सर्वात आधी चांगल्या क्लीन्जरने चेहरा स्वच्छ करावा. क्लीन्जिंग करण्यासाठी नैसर्गिक अशा कच्च्या दुधाचाही वापर करता येतो.

2. टोनर: चेहरा क्लीन्जिंग झाल्यावर त्वचेचा पीएच स्तर नियंत्रित ठेवण्यासाठी टोनर गरजेचा असतो. टोनर म्हणून कोरफड जेलचा उपयोगही करता येतो. कोरफड जेल स्प्रे बॉटलमधे भरुन तो टोनर म्हणून वापरता येतो.

Image: Google

3. सीरम: जर त्वचा कोरडी असेल तर सीरम वापरावं. सीरममुळे त्वचा मेकअपसाठी तयार होते. तसेच त्वचा चमकायला लागते. हिवाळ्यात त्वचेला ओलाव्याची जास्त गरज असते. त्यामुळे हिवाळ्यात मेकअप करताना कोरडी त्वचा असलेल्यांसाठीच सीरम महत्त्वाचं नसतं तर सर्व प्रकारच्या त्वचेसाठी मेकअप करताना सीरम गरजेचं असतं.

4. मॉश्चरायझर: मॉश्चरायझर लावणं ही त्वचेची नियमित काळजी घेण्यासाठी आवश्यक बाब आहे. मेकअप करताना चेहर्‍याला मॉश्चरायझर लावावं. आपल्या त्वचेच्या प्रकाराप्रमाणे मॉश्चरायझर निवडावं.सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सौम्य स्वरुपाचं मॉश्चरायझर चालतं.

5. सनस्क्रीन- आपण चेहर्‍यावर मेकअप केला तरी बाहेर गेल्यानंतर आपली सूर्यप्रकाशाच्या तीव्र किरणांपासून सुटका नाही. सुर्याच्या प्रखर किरणांपासून वाचण्यासाठी मेकअप करतानाही सनस्क्रीन लावावं. घरात सनस्क्रीन नसेल तर मग कोरफडीचं जेल टाकलं तरी चालतं.

Image: Google

6. प्रायमर: चेहर्‍यावर मेकअप नीट ंबसण्यासाठी आधी त्वचेला प्रायमर लावणं गरजेचं आहे. प्रायमर हे देखील आपल्या त्वचच्या स्वरुपानुसार उपलब्ध असतात. जर त्वचा कोरडी असेल तर ऑइल बेस्ड प्रायमर वापरायला हवं.

7. फाउंडेशन: प्रायमर लावल्यानंतर फाउंडेशन लावावं. फाउंडेशन हे ठिपक्या ठिपक्यांनी लावायचं असतं. एकदम जास्त फाउंडेशन लावाल तर मेकअप फसणार हे नक्की. फाउंडेशन निवडताना आपल्या स्किन टोनपेक्षा एक टोन लाइट शेट घ्यावी. डार्क फाउंडेशन लावल्यास मेकअप बिघडतो.

8. कंसीलर: चेहर्‍यावरील काळे डाग, खराब भाग झाकण्यासाठी कंसीलर वापरायचं असतं. डोळ्याखाली काळी वर्तुळं असल्यास तिथेही कंसीलर वापरावं लागतं. फक्त त्यासाठी आधी अंडर आय क्रीम लावावं आणि मग कंसीलर लावावं.

9. पावडर: कंसीलर लावून झालं की चेहर्‍याला थोडी पावडर लावावी लागतेच. त्यासाठी प्लेन किंव टिंटेड पावडर वापरु शकता. मेकअप करताना पावडर लावल्यानं चेहरा पांढरा फट पडत नाही. उलट पावडरमुळे त्वचेतील जास्तीचं तेल शोषून घेतलं जातं आणि मेकअप टिकून राहात्.

10 . ब्रॉन्जर: चेहर्‍याला फाउंडेशन लावलं की संपूर्ण चेहरा एक समान दिसतो. चेहर्‍याचा शेप दिसणं गरजेचं आहे. यासाठी पावडर लावल्यानंतर चेहर्‍याला ब्रॉन्जर लावावं.

Image: Google

11. ब्लश: ब्रॉन्जर नंतर ब्लश लावावं. गुलाबी गाल हवे असल्यास ब्लश करावं. पण ब्लश हे गालावर नव्हे तर चीकबोनवर म्हणजेच गालाच्या उंचवट्यावर अप्लाय करावं.

12. आय मेकअप: या क्रमानं मेकअप झाल्यावर डोळ्यांचा मेकअप करावा. डोळ्यांचा मेकअप करताना आयशॅडो, मग आयलायनर आणि शेवटी मस्कारा लावावा.

13. लिपस्टिक- मेकअपचा शेवट हा लिपस्टिकनं होतो. आपल्याला जी सूट होईल ती लिपस्टिक लावावी. लिपस्टिक लावण्याआधी लिप बाम लावावा. त्यावर लिपस्टिक लावावी.

Image: Google

14. सेटिंग स्प्रे: मेकअप खूप वेळ टिकून राहाण्यासाठी सेटिंग स्प्रे वापरावा. यामुळे मेकअप दीर्घकाळ टिकतो.
मेकअप करताना 14 गोष्टी क्रमानं केल्यास आपला लूक प्रोफेशनल सेलिब्रेटींसारखा दिसेल. आणि ‘काय जबरदस्त मेकअप सेन्स आहे ’ असं कौतुकही होईल.

Web Title: Beauty Tips: Do Makeup Step by Step, 14 Things and Get the Perfect Celebrity Makeup Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.