चेहरा हा आपल्या सौंदर्यातील महत्त्वाचा असल्याने आपण चेहऱ्याच्या सौंदर्याकडे पुरेसे लक्ष देतो. पण हात, पाय यांच्याकडे मात्र म्हणावे तितके लक्ष दिले जात नाही. अनेकदा धूळ, प्रदूषण, ऊन यांमुळे आपले हात आणि पाय काळे पडतात. नखंही खराब होतात. पण रोजच्या धावपळीत आपण पाय आणि हात यांचे सौंदर्य जपतोच असं नाही. मग एकाएकी पाय खराब झाल्याचं जाणवतं आणि आपण पार्लर गाठतो (Beauty Tips Easy Steps of Pedicure at Home).
मेनिक्यूअर आणि पेडीक्यूअरच्या ट्रिटमेंटसाठी आपण ५०० ते ७०० रुपये खर्च करतो. असे करण्यापेक्षा घरच्या घरी अगदी काही सोप्या स्टेप्समध्ये आपल्याला मेनिक्यूअर आणि पेडीक्यूअर करता येऊ शकते. पाहूया घरच्या घरी कमीत कमी वस्तूंचा वापर करुन झटपट पेडीक्यूअर कसे करायचे. यामुळे पाय स्वच्छ तर होतीलच पण ते छान गोरेपान दिसायलाही याची चांगली मदत होईल.
१. एका टबात गरम पाणी घ्या. त्यात मीठ, बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घाला. या पाण्यात १० मिनीटे पाय भिजवून ठेवा.
२. यामुळे पायाचा मळ आणि डेड स्कीन निघून जाण्यास मदत होईल. नंतर स्क्रबरने पाय घासा म्हणजे हे सगळे सहज निघून जाईल.
३. एका लहान बाऊलमध्ये इनो, टूथपेस्ट आणि लिंबाचा रस एकत्र करा. हे मिश्रण लिंबाच्या सालीला लावून त्याने पायाला सगळ्या बाजूने घासा.
४. त्यानंतर एखाद्या जुन्या मऊ झालेल्या टूथब्रशने नखे साफ करा. म्हणजे नखांत अडकलेली अडकलेली घाण, माती निघून जाण्यास मदत होईल.
५. त्यानंतर साय आणि लिंबू एकत्र करुन नैसर्गिक क्रिमने पायाला सगळीकडून छान मसाज करा. यामुळे पाय मॉईश्चराईज होण्यास मदत होईल. मग पाय पाण्याने स्वच्छ धुवा.
६. नखांना एकसारखा शेप देऊन त्यातील घाण काढून नखांवर तुमच्या आवडीची एखादी छान नेलपेंट लावा. आठवड्यातून एकदा किंवा पंधरवड्यातून एकदा अशा प्रकारे पेडीक्यूअर केल्यास पाय कायम स्वच्छ राहण्यास मदत होईल.