Lokmat Sakhi >Beauty > फक्त हातच खूप काळवंडले? हात काळे पडण्याची कारणं आणि ३ सोपे उपाय

फक्त हातच खूप काळवंडले? हात काळे पडण्याची कारणं आणि ३ सोपे उपाय

Beauty Tips for Dark Hands : प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल हात काळवंडण्यामागची कारणं काही सोपे उपाय सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2023 01:15 PM2023-01-10T13:15:53+5:302023-01-10T13:23:18+5:30

Beauty Tips for Dark Hands : प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल हात काळवंडण्यामागची कारणं काही सोपे उपाय सांगतात...

Beauty Tips for Dark Hands : Only hands too dark? Causes of dark hands and 3 easy remedies | फक्त हातच खूप काळवंडले? हात काळे पडण्याची कारणं आणि ३ सोपे उपाय

फक्त हातच खूप काळवंडले? हात काळे पडण्याची कारणं आणि ३ सोपे उपाय

Highlightsचेहऱ्याची काळजी घेतो त्याचप्रमाणे हातांची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. हात काळवंडण्याची बरीच कारणं असून तसं होऊ नये म्हणून वेळीच काळजी घ्यायला हवी.

आपण साधारणपणे चेहऱ्याच्या सौंदर्याकडे लक्ष देतो. पण मान, हात, पाय यांच्याकडे म्हणावे तितके लक्ष देतोच असे नाही. अनेकदा आपला चेहरा, मान आणि इतर सगळी त्वचा चांगली दिसते. पण हात मात्र काळवंडलेले दिसतात. कोणतेही काम करताना सगळ्यात आधी आपले हात पुढे येतात. हेच हात जर खूप काळे असले तर नकळत त्याकडे लक्ष जाते आणि ते काळवंडलेले असल्याचे दिसते. आता असे हात काळवंडण्यामागे नेमकी काय कारणं असतात हे अनेकदा आपल्याला समजत नाही. प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आंचल अशाप्रकारे हात काळवंडण्यामागची कारणं सांगतात. इतकेच नाही तर हातांचा काळेपणा दूर होण्यासाठी काही सोपे उपायही त्या सांगतात. पाहूया हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे (Beauty Tips for Dark Hands). 

हात काळवंडण्याची कारणं...

१. प्रखर सूर्यप्रकाशाशी संपर्क

(Image : Google)
(Image : Google)

२. ओल्यामध्ये काम करणे

३. एक्झिमा किंवा सोरायसिस

४. व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता

उपाय काय?

१. सनस्क्रीनचा वापर 

घराच्या बाहेर पडताना सनस्क्रीन लोशनचा वापर करणे अतिशय आवश्यक असते. जर तुम्ही जास्त वेळासाठी बाहेर असाल तर दर २ तासांनी हे सनस्क्रीन हाताला लावायला हवे. गाडी चालवताना हात पातळ अशा ग्लोव्हजनी कव्हर करायला हवेत. तुमच्या त्वचेला सूट होणारे असे कोणतेही सनस्कीन तुम्ही वापरु शकता.

 

 

२. मॉईश्चरायजिंग 

ही अतिशय महत्त्वाची स्टेप असून त्वचा चांगली ठेवायची तर मॉईश्चराजरचा वापर अवश्य करायला हवा. शक्यतो थोडे जाडसर मॉईश्चरायजर निवडावे, म्हणजे ते जास्त काळ त्वचेवर राहण्यास मदत होते. यामध्ये शिया बटर, कोको बटर, युरीया, लॅक्टीक अॅसिड, ग्लिसरीन असे घटक असतील तर कोरड्या त्वचेसाठी ते फायदेशीर ठरते. 

३. क्रीम

त्वचा एक्सफॉलिएशन करणारी क्रिम्स वापरावीत. आठवड्यातून एकदा अशाप्रकारच्या क्रिम्सचा वापर करावा. एक्सफॉलिएशन केल्यानंतर २ ते ३ दिवस सूर्याच्या किरणांचा त्वचेशी थेट संबंध येणार नाही अशी काळजी घ्यावी. पण तुम्हाला एक्झिमा किंवा सोरायसिस असेल तर अशी क्रिम शक्यतो वापरु नयेत.

Web Title: Beauty Tips for Dark Hands : Only hands too dark? Causes of dark hands and 3 easy remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.