Lokmat Sakhi >Beauty > थंडीमुळे हाताचे कोपरे कोरडे पडून जास्तच काळवंडले? ३ उपाय करा- टॅनिंग निघून कोपरे होतील स्वच्छ

थंडीमुळे हाताचे कोपरे कोरडे पडून जास्तच काळवंडले? ३ उपाय करा- टॅनिंग निघून कोपरे होतील स्वच्छ

Home Remedies For Cleaning Blackness Of Elbow: हाताच्या कोपऱ्यांचा काळेपणा घालविण्यासाठी हे काही उपाय करून पाहा... लगेचच फरक दिसून येईल.(How to clean black elbow)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2023 09:11 AM2023-12-02T09:11:27+5:302023-12-02T09:15:01+5:30

Home Remedies For Cleaning Blackness Of Elbow: हाताच्या कोपऱ्यांचा काळेपणा घालविण्यासाठी हे काही उपाय करून पाहा... लगेचच फरक दिसून येईल.(How to clean black elbow)

beauty tips for removing blackness of elbow, How to clean black elbow, How to get rid of blackness of elbow | थंडीमुळे हाताचे कोपरे कोरडे पडून जास्तच काळवंडले? ३ उपाय करा- टॅनिंग निघून कोपरे होतील स्वच्छ

थंडीमुळे हाताचे कोपरे कोरडे पडून जास्तच काळवंडले? ३ उपाय करा- टॅनिंग निघून कोपरे होतील स्वच्छ

Highlightsहाताच्या कोपऱ्यांचा काळेपणा घालविण्यासाठी हे काही उपाय नियमितपणे करून पाहा.

बाकी हात गोरे आणि हाताचे कोपरे मात्र काळवंडलेले असं अनेक जणींच्या बाबतीत होतं. काम करताना हाताच्या कोपऱ्यांचा भाग बऱ्याचदा घासला जातो. त्यामुळे वारंवार घर्षण होऊन हा भाग इतर हातापेक्षा जरा जास्त काळवंडलेला दिसतो. त्याची वेळीच स्वच्छता केली तर ठिक. नाहीतर मग कोपऱ्यांवरचा काळेपणा वाढत जातो (How to get rid of blackness of elbow). आता हिवाळ्यात तर हाताची कोपरं कोरडी पडतात आणि आणखीनच काळी दिसू लागतात (beauty tips for removing blackness of elbow). म्हणूनच हाताच्या कोपऱ्यांचा काळेपणा घालविण्यासाठी हे काही उपाय नियमितपणे करून पाहा. (How to get rid of blackness of elbow)

हाताच्या कोपऱ्यांचा काळेपणा घालविण्यासाठी उपाय

 

१. उरलेला भात

उरलेल्या भाताचा चांगला उपयोग हाताचे कोपरे स्वच्छ करण्यासाठी होतो. यासाठी भातात थोडं पाणी घाला आणि मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट करा.

थंडीत ओठ फुटतात- भेगा पडून रक्त येतं? ओठांना मऊ ठेवणारं ‘हे’ लिपबाम वापरून पाहा... 

या पेस्टमध्ये ४ ते ५ थेंब लिंबाचा रस आणि थोडी कॉफी घाला. हे मिश्रण आता कोपऱ्यांवर चोळून लावा. टॅनिंग घालविण्यासाठी हा राईस पॅक खूप उपयुक्त ठरेल.


२. बेसन

 

एका वाटीत २ टेबलस्पून बेसन म्हणजेच हरबरा डाळीचं पीठ घ्या. त्यात अर्धा टिस्पून हळद आणि २ टेबलस्पून दही टाका. हे मिश्रण थोडं घट्ट भिजवा. ते हाताच्या कोपऱ्यांवर लावा.

ठेवणीतल्या ब्लँकेट्स- चादरींना कुबट वास येतो? ३ उपाय करा- न धुता पांघरुणं होतील स्वच्छ- सुगंधी

२ ते ३ मिनिटांनी चाेळून चोळून ते काढून टाका. यानंतर कोपरं स्वच्छ धुवून टाका आणि त्यावर मॉईश्चरायझर लावा.

३. कोरफड

 

कोरफडीच्या गराचा वापर करूनही कोपऱ्यांना उजळवता येतं. यासाठी एका वाटीत कोरफडीचा गर काढून घ्या.

हिवाळ्यासाठी फॅशनेबल श्रग घ्यायचाय? ऑनलाईन खरेदीवर सध्या मिळतोय भरपूर डिस्काउंट- पाहा पर्याय

अर्धी वाटी गर असेल तर त्यात १ टेबलस्पून मध टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा आणि त्याने कोपऱ्यांवर मसाज करा. ५ ते ६ मिनिटांनी हात धुवून टाका. 

 

Web Title: beauty tips for removing blackness of elbow, How to clean black elbow, How to get rid of blackness of elbow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.