मेकअप तर तुम्ही करता, पण तुमच्या मेकअपला कसा टोन द्यायचा आहे, हे भुवया आणि डोळ्यांच्या मेकअपवर खूप जास्त अवलंबून असतं. बोल्ड, सिंपल, स्मोकी किंवा आणखी काही वेगवेगळे मेकअप करायचे असतील, तर सगळ्यात आधी आय मेकअप बदलला जातो. आय मेकअपमध्ये डोळ्यांप्रमाणेच भुवयांवर देखील काम करण्याची गरज असते. म्हणूनच आयब्रो मेकअप झटपट आणि अतिशय आकर्षक पद्धतीने कसा करावा, हे जाणून घ्या. या काही सोप्या ट्रिक्स वापरा आणि तुमच्या भुवयांचे, डोळ्यांचे आणि एकंदरीतच तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य खुलवा.
असा करा आयब्रो मेकअप- जर भुवया खूप पातळ असतील तर अशा भुवयांवर खूप जास्त पण तेवढंच बारकाईने काम करावं लागतं.- सगळ्यात आधी मेकअप सुरु करण्यापुर्वी चेहऱ्याला प्रायमर लावून घ्या.- भुवयांवरही प्रायमर लावा. यामुळे भुवयांचा मेकअपही जास्त काळ टिकेल.- यानंतर डोळ्यांभोवतीची काळी वर्तूळे किंवा बारीक रेषा यांच्यावर कन्सिलर लावा, जेणेकरून त्या लगेचच दिसून येणार नाहीत.
- यानंतर आता ब्रश वापरून भुवया सेट करुन घ्या.- आता तुमच्या भुवयांवर आयशॅडोच्या काळ्या किंवा ब्राऊन रंगाने एक शेड द्या. - यानंतर भुवयांच्या अगदी लगत खालच्या बाजूने हलकेसे फाऊंडेशन आणि वरच्या बाजूने हायलायटर लावा. यामुळे भुवयांचा कोरीवपणा आणखी उठून दिसेल. वरच्या बाजूने हायलाईट केले नाही तर चालते. पण फाउंडेशनची स्टेप चुकवू नये. - भुवयांचा हा मेकअप झाला की काजळ, आयलायनर, मस्कारा लावून डोळ्यांचा मेकअप करा.