Lokmat Sakhi >Beauty > Beauty Tips : डोळ्याखालची काळी वर्तुळं लपवा बेमालूम, फक्त 3 उपाय-साधा सोपा मेकअप

Beauty Tips : डोळ्याखालची काळी वर्तुळं लपवा बेमालूम, फक्त 3 उपाय-साधा सोपा मेकअप

मेकअप करताना डार्क सर्कल झाकण्यासाठी काय करायला हवे याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2022 12:58 PM2022-06-03T12:58:35+5:302022-06-03T13:01:40+5:30

मेकअप करताना डार्क सर्कल झाकण्यासाठी काय करायला हवे याविषयी...

Beauty Tips : Hide dark circles under the eyes unknowingly, just 3 remedies-simple makeup | Beauty Tips : डोळ्याखालची काळी वर्तुळं लपवा बेमालूम, फक्त 3 उपाय-साधा सोपा मेकअप

Beauty Tips : डोळ्याखालची काळी वर्तुळं लपवा बेमालूम, फक्त 3 उपाय-साधा सोपा मेकअप

Highlightsकाजळाच्या ऐवजी डोळ्यांखाली जेल लायनर किंवा वॉटरप्रूफ लायनर लावल्यास त्याचा चांगला इफेक्ट होतो. मेकअपने डार्क सर्कल झाकण्यासाठी करा हे उपाय...

डार्क सर्कल ही तमाम तरुणींना आणि महिलांना भेडसावणारी एक महत्त्वाची समस्या आहे. यामुळे आपला रंग उजळ असला तरी आपण सावळे दिसतो. इतकेच नाही तर डार्क सर्कलमुळे आपल्याकडे पाहणाऱ्याला आपण आजारी असल्यासारखे किंवा खूप थकल्यासारखे दिसतो. डार्क सर्कलसाठी आरोग्याच्या तक्रारी, कामाचा ताण, जागरण, आनुवंशिकता, त्वचेच्या तक्रारी किंवा इतरही अनेक कारणं असतात. पण याचा परिणाम म्हणजे आपल्या सौंदर्यात त्यामुळे बाधा येते. योग्य आहार, झोप, व्यायाम आणि ताणविरहीत संतुलित जीवनशैली हे त्यावरील उपाय नक्कीच असू शकतात. एरवी आपल्याला याचे फारसे काही वाटत नसले तरी एखाद्या समारंभाला जाताना मात्र हे डार्क सर्कल झाकावेच लागतात. आता त्यासाठी मेकअप करताना कोणते उपाय करायचे (Beauty Tips) याविषयी...

(Image : Google)
(Image : Google)

१. डोळ्याखालची काळी वर्तुळे झाकण्यासाठी कन्सिलर हा उत्तम उपाय असतो. तो खरेदी करताना जास्त ऑयली किंवा क्रिमी नाही ना हे तपासा. कारण तसा कन्सिलर जास्त वेळ राहत नाही. त्यामुळे मॅट फिनीशचा कन्सिलर खरेदी करणे केव्हाही जास्त चांगले. केक किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असा कन्सिलर आपल्याला सहज मिळेल.

२. सगळ्यात आधी डोळे स्वच्छ धुवून त्यावर प्रायमर लावावा. त्यानंतर आपल्या डार्क सर्कल किती, कसे आहेत त्यानुसार कन्सिलरची निवड करा.  लावताना तो ब्लेंडरच्या साह्याने नीट सेट करायला हवा. कन्सिलर नीट लागला नाही तर बेस करताना तो पसरू शकतो. त्यावर नॅचरल कलरचा लिक्विड कन्सिलर लावला तर डार्क सर्कल अजिबात दिसून येणार नाहीत. त्यानंतर फाऊंडेशन लावा. तसेच कन्सिलर चांगल्या ब्रँडचा आणि लाइट वेट असेल याची काळजी घ्या. 

(Image : Google)
(Image : Google)

३. आपण कसाही मेकअप केला तरी आपण लावलेले काजळ जर पसरणारे असेल तर डोळ्याखालचे काळे डाग जास्त काळे दिसतात. इतकेच नाही तर कितीही चांगला मेकअप केला आणि काजळ पसरणारे असेल डोळ्यांखाली काळे दिसते. यापेक्षा काजळाच्या ऐवजी डोळ्यांखाली जेल लायनर किंवा वॉटरप्रूफ लायनर लावल्यास त्याचा चांगला इफेक्ट होतो. 
 

Web Title: Beauty Tips : Hide dark circles under the eyes unknowingly, just 3 remedies-simple makeup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.