Lokmat Sakhi >Beauty > DIY: केस वाढतच नाहीत? कॉफी हेअर मास्क ट्राय करा, केस वाढण्यासाठी घरच्याघरी बेस्ट सॉल्यूशन!

DIY: केस वाढतच नाहीत? कॉफी हेअर मास्क ट्राय करा, केस वाढण्यासाठी घरच्याघरी बेस्ट सॉल्यूशन!

Hair care tips: खूप जणींनी हा अनुभव घेतलेला असतो की केस वाढतंच नाहीत... केसांची ग्रोथ (growth of hair) वाढविण्यासाठी हा अतिशय सोपा, घरच्याघरी होणारा आणि नैसर्गिक उपाय करून बघा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 03:09 PM2022-01-27T15:09:12+5:302022-01-27T15:10:11+5:30

Hair care tips: खूप जणींनी हा अनुभव घेतलेला असतो की केस वाढतंच नाहीत... केसांची ग्रोथ (growth of hair) वाढविण्यासाठी हा अतिशय सोपा, घरच्याघरी होणारा आणि नैसर्गिक उपाय करून बघा...

Beauty tips: Home hacks for stimulating hair growth, use of coffee hair mask | DIY: केस वाढतच नाहीत? कॉफी हेअर मास्क ट्राय करा, केस वाढण्यासाठी घरच्याघरी बेस्ट सॉल्यूशन!

DIY: केस वाढतच नाहीत? कॉफी हेअर मास्क ट्राय करा, केस वाढण्यासाठी घरच्याघरी बेस्ट सॉल्यूशन!

Highlightsडोक्याची त्वचा नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स करण्यासाठी हा हेअरमास्क उपयुक्त ठरतो.

काही जणींचे केस खूप भराभर वाढतात. दर ३- ४ महिन्यांनी त्यांना त्यांचे केस कापून सेट करावे लागतात. पण याच्या नेमकं उलट काही जणींचं असतं. त्यांच्या केसांची वाढ जणू काही खुंटलेलीच असते. केस इतके हळूहळू वाढतात की केस कापण्यासाठी वर्ष- दिडवर्ष त्यांना पार्लरला जाण्याची गरजही नसते. शेवटी केसांची टोकं खराब होतात, दुभंगतात. म्हणून मग नाईलाजाने पुन्हा केस कापावे लागतात. त्यामुळे त्यांचे केस कधी छान लांबसडक होतच नाहीत.. हाच अनुभव तुम्हीही घेत असाल तर हा घरगुती उपाय करून बघा..

 

केसांसाठी घरच्या घरी कॉफी हेअर मास्क (coffee hair mask) कसा तयार करायचा, केसांना मास्क कसा लावायचा, किती वेळ ठेवायचा, त्याने केसांना नेमके कोणकोणते फायदे होतात, याविषयीची सविस्तर माहिती इन्स्टाग्रामच्या ruchita.ghag या पेजवर शेअर करण्यात आली आहे. सोपा, घरगुती आणि नैसर्गिक उपाय असल्याने हा उपाय अनेक जणांना आवडला आहे.

 

कसा बनवायचा कॉफी हेअर मास्क (How to make coffee hair mask)
- घरच्याघरी कॉफी हेअर मास्क बनविण्यासाठी आपल्याला फक्त ४ गोष्टी लागणार आहेत.
- एक मोठी वाटी भरून दही, २ ते ३ टेबलस्पून कॉफी पावडर, २ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल, १ ते २ टेबलस्पून मध हे सगळे साहित्य एका मोठ्या बाऊलमध्ये एकत्र करावेत. 
- सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून झाले की तयार झाला कॉफी हेअर मास्क...

 

कसा लावायचा कॉफी हेअरमास्क (How to apply coffee hair mask)
- कॉफी हेअरमास्क हाताच्या बोटांनी किंवा ब्रशच्या साहाय्याने तुमच्या केसांच्या मुळाशी किंवा डोक्याच्या त्वचेला म्हणजेच स्काल्पला लावा.
- केसांच्या टोकांना आणि केसांच्या लांबीवरही हा हेअरमास्क लावणं फायदेशीर ठरतं. 
- हेअर मास्क केसांना लावल्यानंतर शॉवर कॅप घाला. शॉवर कॅप नसल्यास तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापरही करू शकता. याचा उद्देश फक्त एवढाच आहे की हेअर मास्क तुमच्या केसांवर वाळू नये. 
- हेअर मास्क लावल्यानंतर अर्धा ते पाऊण तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू लावून तुम्ही केस धुवू शकता. 

 

केसांना कॉफी हेअर मास्क लावण्याचे फायदे (Benefits of coffee hair mask)
- कॉफीमध्ये कॅफेन असतं. त्यामुळे कॉफी प्यायल्यावर आपल्याला उत्साह येतो, एनर्जेटीक वाटतं.. तसंच काहीसं आपल्या केसांच्या बाबतीतही होतं. जेव्हा हा हेअरमास्क आपण केसांच्या मुळाशी लावतो, तेव्हा केसांची वाढ स्टिम्युलेट होते आणि ते वाढायला लागतात.
- हा हेअरमास्क केसांच्या मुळाशी लावल्यामुळे स्काल्पमध्ये होणारा रक्तप्रवाह वेगवान होतो. तेथील रक्ताभिसरण जलद होणे, केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतो. 


- हा हेअरमास्क केसांना लावल्यामुळे तुमच्या केसांचा जो नैसर्गिक रंग आहे, त्याला एक वेगळीच शेड मिळते. त्यामुळे ते जास्त छान दिसू लागतात. तसेच केस अधिक चमकदार आणि आकर्षकही होतात.
- डोक्याची त्वचा नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स करण्यासाठी हा हेअरमास्क उपयुक्त ठरतो. स्काल्प डिटॉक्स झाल्यास तेथील घाण निघून जाते, त्वचा स्वच्छ होते. अशी स्वच्छ त्वचा केसांच्या वाढीसाठी उत्तम असते.


 

Web Title: Beauty tips: Home hacks for stimulating hair growth, use of coffee hair mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.