हा त्रास खूप जणींना अक्षरश: छळतो. अगदी सहज जरी आरशात डोकावलं तरी हनुवटीचा भाग गालांपेक्षा जास्त काळा आणि पिगमेंटेड दिसू लागतो. कुणाकुणाची त्या ठिकाणची त्वचाही जाडसर, खडबडीत असते.. हा त्रास कमी करण्यासाठी मग कुणी- कुणी वारंवार पार्लरमध्ये जातात. पण पुन्हा काही दिवसांनी हे डाग जसेच्या तसेच.. म्हणूनच तर या कारणासाठी पार्लरमध्ये जाऊन वारंवार पैसे खर्च करण्यापेक्षा हे काही घरगुती उपाय आधी करून बघा.
१. कोरफडहनुवटीजवळचे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी कोरफडीचा गर काढा. या गरामध्ये अर्धा चमचा हरबऱ्याच्या डाळीचे पीठ टाका आणि हे मिश्रण त्वचेवर चोळून लावा. १० ते १५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवून टाका आणि त्यानंतर मॉईश्चरायझर लावा.
२. कांद्याचा रसकांदा हा फक्त केसांसाठीच उपयुक्त आहे, असे नाही. कांद्याचा उपयोग त्वचेसाठीही खूप चांगल्या प्रकारे करता येताे. कांद्याचा रस एक चमचा घ्या आणि त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस टाका. हे दोन्ही मिश्रण एकत्र करा आणि हा लेप चेहऱ्याला लावा. १० मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवून टाका. पिगमेंटेशन कमी करण्यासाठी मदत होईल.
३. पपईचा गरपपईचे आरोग्याला जसे अनेक फायदे आहेत, तशीच ती आपल्या त्वचेसाठीही वरदान आहे. म्हणूनच पपईचा उपयोग करून त्वचेचा पोत एकसारखा करण्याचा प्रयत्न करा. यासाठी पपईचा गर काढा. त्यात थोडेसे गुलाब पाणी टाका. हा लेप चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने गोलाकार दिशेने मसाज करा.
४. कच्चे दूधकच्चे किंवा निरसे दूध त्वचेसाठी खूप पोषक असते. त्यामुळे त्वचेसाठी किंवा सौंदर्यासाठी जेव्हाही तुम्ही दूध वापराल, तेव्हा ते कच्चे म्हणजेच न तापवलेले असावे. कच्चे दूध चेहऱ्यावर नियमितपणे लावल्यानही त्वचेवरील पिगमेंटेशन कमी होते.