Lokmat Sakhi >Beauty > कितीही प्रयत्न करा, केस वाढतच नाहीत? लांबसडक केस हवेत तर करा हे उपाय

कितीही प्रयत्न करा, केस वाढतच नाहीत? लांबसडक केस हवेत तर करा हे उपाय

काहीही केलं तरी काही जणींचे केसंच वाढत नाहीत. असं का होतं बरं? कोणती आहेत कारणे आणि काय उपाय करायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 07:46 PM2021-08-13T19:46:38+5:302021-08-13T20:00:11+5:30

काहीही केलं तरी काही जणींचे केसंच वाढत नाहीत. असं का होतं बरं? कोणती आहेत कारणे आणि काय उपाय करायचे?

Beauty tips: Home remedies for long and strong hair | कितीही प्रयत्न करा, केस वाढतच नाहीत? लांबसडक केस हवेत तर करा हे उपाय

कितीही प्रयत्न करा, केस वाढतच नाहीत? लांबसडक केस हवेत तर करा हे उपाय

Highlightsकाहीही केलं तरी केस वाढत नाही, केसांची वाढ जवळपास खुंटली आहे, अशी तक्रार अनेक जणींची असते.

केस हा प्रत्येकीचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. लांबसडक, काळेभोर, दाट केस म्हणजे सौंदर्याचं एक लेणं. पण आजकाल केसांचं सौंदर्य टिकवून ठेवणं हे एक महाकठीण काम झालं आहे. काहीही केलं तरी केस वाढत नाही, केसांची वाढ जवळपास खुंटली आहे, अशी तक्रार अनेक जणींची असते. खाण्यापिण्यात झालेले बदल आणि प्रदुषण ही केसांची वाढ खुंटण्याची कारणे असू शकतात. पण याव्यतिरिक्त आणखी काही कारणे आहेत का ?

 

केसांची वाढ न होण्याची कारणे
- वाढलेले वय
-प्रतिकारशक्ती कमी असणे
-कॅल्शियम आणि लोहाची कमतरता
-ॲनिमिया
-सकस अन्नाचा अभाव
-हिरव्या पालेभाज्या आणि फळे कमी प्रमाणात खाणे
-हार्मोनल बदल
-धुळ, धुर, उन आणि खूप वाऱ्यामध्ये काम करावे लागणे
-केस सतत ताणून बांधणे
-केसांच्या वारंवार वेगवेगळ्या हेअरस्टाईल करणे
-स्ट्रेटनिंग किंवा कर्ल्स वारंवार करणे
-पीसीओएस

 

केसांची वाढ होण्यासाठी हे उपाय करून पहा
१. बायोटिन्सच्या गोळ्या
बायोटिन्स हे एकप्रकारचे व्हिटॅमिन आहे. केसांच्या वाढीसाठी ते फायदेशीर ठरते. बायोटिन्सच्या दोन ते तीन गोळ्यांची पावडर करा आणि ती खोबरेल तेलात मिसळून घ्या. रात्री झोपताना हे तेल केसांच्या मुळांशी हळूवार हाताने चोळून लावा. सकाळी शाम्पू करून केस धुवून टाका. दोन- तीन महिने सतत उपाय केला तर चांगला फरक पडतो. केसगळती थांबते आणि केसांची वाढही चांगली होते.

२. व्हिटॅमिन सी आणि ई
व्हिटॅमिन सी आणि ई हे दोन्हीही केसांसाठी खूप फायदेशीर असते. या दोन्ही व्हिटॅमिन्सचे सेवन योग्य प्रमाणात केले तर केसांची वाढ चांगली होते. व्हिटॅमिन सी च्या गोळ्या घेतल्यानेही केसगळती थांबते आणि केसांची वाढ उत्तमप्रकारे होते. केसांच्या मुळांशी जमा होणारी मृत त्वचा थांबविण्याचे काम तसेच बुरशी, कोंडा दूर करण्याचे काम व्हिटॅमिन सी करते. परिणामी केसांच्या मुळाशी असणारी त्वचा निरोग राहते आणि केसांची चांगली वाढ होते. 

 

३. व्हिटॅमिन ई च्या गोळ्या
व्हिटॅमिन ई च्या ५ ते ६ गोळ्या फोडा आणि त्यातले तेल एका वाटीत काढून घ्या. यामध्ये एक चमचा खोबरेल तेल टाका आणि या तेलाने केसांच्या मुळाशी हळूवार हाताने मालिश करा. सकाळी केस धुवून टाका. या उपायाने केस वाढीस फायदा होताे. 

४. जोजोबा ऑईल
१ टेबलस्पून जोजोबा ऑईल एका वाटीत घ्या. यामध्ये दोन टेबलस्पून खोबरेल तेल टाका. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करा आणि रात्री झोपताना केसांना लावा. सकाळी शाम्पू करून केस धुवून टाका. निरोगी केसांसाठी हा एक उत्तम उपाय आहे. 

 

Web Title: Beauty tips: Home remedies for long and strong hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.