Join us  

Beauty Tips: वरचा ओठ जास्त काळा पडलाय? हे घरगुती उपाय करा, काळपटपणा कमी होतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 1:45 PM

वरच्या ओठाचा रंग खालच्या ओठापेक्षा काळा वाटतो आहे का, मग हे काही सोपे उपाय करून पहा...दोन्ही ओठांची त्वचा अगदी सारखी आणि गुलाबी होईल. 

ठळक मुद्देॲनिमिया किंवा प्रचंड अशक्तपणा हे देखील ओठ काळे पडण्याचे एक कारण असू शकते.

आरशात बघताना आपल्याला बऱ्याचदा एक गोष्ट जाणवते. ती म्हणजे आपल्या वरच्या ओठाचा आणि खालच्या ओठाचा रंग वेगवेगळा होतो आहे. वरच्या ओठाची जी वरची बाजू आहे किंवा ओठाची जी बाहेरची आऊटलाईन आहे, तिचा रंग तर आणखी वेगळा आणि अधिक डार्क झालेला जाणवतो. यालाचा डिस्कलरेशन असे म्हणतात. अशी समस्या निर्माण झाली तर आपले ओठ खरोखरच खूप विजोड दिसू लागतात आणि सौंदर्याला मारक ठरतात. म्हणूनच अशी समस्या निर्माण झाली असल्यास, घरच्याघरी काही सोपे उपाय करून पहा. यामुळे तुमच्या दोन्ही ओठांचा रंग गुलाबी होईल आणि ओठ मृदू, मुलायम होतील. 

 

ओठ काळे का होतात?- सिगारेट आणि दारूचे सेवन- लिपस्टिक सुट न होणे किंवा एक्स्पायरी झालेली लिपस्टिक वापरणे.- पाणी कमी पिणे- उन्हात जास्त वेळ काम असणे.- ॲनिमिया किंवा अशक्तपणा

कसा घालवायचा ओठांचा काळेपणा?

१. डाळिंबाचा रसओठांना एकसारखा रंग येण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. १ टेबलस्पून डाळिंबाचा रस घ्या. त्यामध्ये १ टी स्पून गुलाबपाणी आणि एक टीस्पून साय टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यानंतर ओठांना लावा. हळूवार हाताने ओठांना २ ते ३ मिनिट मसाज करा. त्यानंतर १५ ते २० मिनिटे ते तसंच राहू द्या आणि त्यानंतर कोमट पाण्याने ओठ धुवून टाका. आठवड्यातून दोनदा हा उपाय करून पहावा. लवकरच परिणाम दिसू लागेल.

 

२. लिंबाचा रसत्वचेचे टॅनिंग दूर करण्यासाठी देखील लिंबाचा रस अतिशय उपयुक्त ठरतो. ओठांना जेव्हा लिंबू लावायचे असेल तेव्हा त्यात साखर टाकायला विसरू नका. १ टेबलस्पून लिंबाचा रस घेतला तर त्यात १ टीस्पून पिठीसाखर टाकावी. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे आणि त्यानंतर ओठांना लावावे. काही मिनिटांसाठी ओठांची मसाज केल्यावर कोमट पाण्याने ओठ धुवून टाकावे. ॲलर्जीमुळे किंवा उन्हात गेल्यामुळे ओठ काळे पडले असतील, तर लगेच चांगला परिणाम दिसून येईल.

 

३. स्ट्रॉबेरीचा रसआंबटगोड चवीची स्ट्रॉबेरी त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे. याच स्ट्रॉबेरीचा उपयोग ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी करता येतो. एक टेबलस्पून स्ट्रॉबेरीचा गर घ्या आणि त्यामध्ये अगदी चिमुटभर खाण्याचा सोडा टाका. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि त्यानंतर ओठांना चोळून चोळून लावा. १० ते १५ मिनिटांनी ओठ धुवून टाका. 

 

४. भरपूर पाणी प्यापाणी कमी प्रमाणात प्यायले तरीही ओठ काळवंडण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी आधी वरील उपाय तर करून बघाच पण त्यासोबतच पाणी पिण्याचे प्रमाण देखील वाढवा. पाणी योग्य प्रमाणात घेतल्यास त्वचेचे डिहाड्रेशन होणार नाही आणि ओठांची त्वचा काळी पडणार नाही.

 

५. व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घ्याॲनिमिया किंवा प्रचंड अशक्तपणा हे देखील ओठ काळे पडण्याचे एक कारण असू शकते. त्यामुळे ओठ जर काळे पडले असतील तर तुमची रक्त्ततपासणी करून घ्या आणि हिमोग्लोबिन किती आहे, ते तपासून घ्या. शरीराला जर योग्य प्रमाणात पोषण मिळाले नाही, तर त्याचा परिणाम ओठांवर दिसून येतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेण्याचा उपायही करता येतो.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी