आपला चेहरा, त्वचा नितळ असावी असं प्रत्येकीला वाटतं. मात्र काही ना काही कारणांनी चेहऱ्यावर पुटकुळ्या येणे, चेहऱ्यावर काळे ड़ाग पडणे, पिंपल्स, सुरकुत्या अशा समस्या निर्माण होतात. मग कधी आपण घरगुती उपाय करतो तर कधी महागडी सौंदर्यप्रसाधने वापरतो. मात्र यानेही काही उपयोग झाला नाही तर आपण पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंटसही करतो. या सगळ्याचा आपल्या त्वचेवर परीणाम होतो आणि त्वचेच्या तक्रारी आणखी वाढतात (Beauty Tips Home Remedy For Dark Circle and Wrinkles).
डोळ्यांखाली काळे डाग येणे किंवा डोळ्यांखाली सुरकुत्या येणे या सौंदऱ्याच्यादृष्टीने अतिशय सामान्य तक्रारी असतात. त्यावर अगदी झटपट आणि सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत. इन्स्टाग्रामवर ब्युटी सिक्रेटस विथ शालिनी या पेजवर एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. अगदी झटपट होणारा हा उपाय केल्यास डार्क सर्कल आणि सुरकुत्या कमी होण्यास निश्चितच मदत होते. पाहूयात हा उपाय कसा करायचा.
साहित्य -
१. कॉफी पावडर
२. दही
३. कोरफड गर
४. बदाम तेल
५. व्हिटॅमिन इ गोळ्या
उपाय नेमका कसा करायचा
१. अर्धा चमचा इंस्टंट कॉफी पावडर आणि दही एकत्र करावे.
२. ही पेस्ट डोळ्यांच्या बाजुने गोलाकार लावावी.
३. थोडा मसाज करुन १५ मिनीटे हा पॅक ड़ोळ्यांच्या बाजूला तसाच ठेवावा.
४. त्यानंतर चेहरा गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकावा.
५. एका बाऊलमध्ये कोरफडीचा गर, बदाम तेल आणि इ व्हिटॅमिनची गोळी एकत्र करावे
६. या पेस्टने डोळ्यांच्या बाजुला नीट चांगला मसाज करावा. १० ते १५ मिनीटांनी डोळे धुवून टाकावेत.
७. हे करताना पेस्ट डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. महिनाभर सलग हा उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल.
८. यासोबतच ८ तास झोप घेणे, भरपूर पाणी पिणे, स्क्रिन टाईम कमी करणे, हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा आहारात समावेश करणे गरजेचे असते.