काजळ जेवढ्या सहजपणे आपण घालतो, तेवढ्या सहजपणे आपल्या मैत्रिणी आय लायनर लावतात. मग आपणही त्यांच्या सारखंच आपल्या डोळ्यांवर ट्राय करायला जातो, पण मग सगळाच गोंधळ उडतो. त्यात जर लिक्विड आय लायनर असेल, तर मग होणारा गाेंधळ विचारायलाच नको. ब्रश हातात घेताच एक तर डोळे थरथरू लागतात नाही तर मग हातांना कापरं भरतं. मग वर- खाली असं होतं सगळं आय लायनर लागतं. आपल्या हातांची थरथर चक्क आयलायनरच्या रेषेतही दिसून येते.
आज काल ऑफिसला किंवा कुठे बाहेर जाताना पावडर, काजळ किंवा लिपस्टिक जेवढ्या सहजतेने लावली जाते, तेवढ्याच सहजतेने आता आय लायनरही लावलं जातं. केवळ लग्न, समारंभ, पार्टी यांच्या पुरताच आता आय लायनरचा वापर मर्यादित राहिलेला नाही. ती आता आपल्या मेकअप मधील एक डेली रूटीनची गोष्ट झाली आहे. आय लायनर लावल्यामुळे आपले डोळे अधिक मोठे आणि बोल्ड दिसतात. आपला लूक बदलून टाकायची किमया एका आय लायनरच्या रेषेत असते. सध्या तर आय लायनरचा एवढा ट्रेण्ड (beauty trends) आहे की काजळ (kajal) न लावता केवळ आय लायनरचा वापर सुरू झाला आहे. आता अशा जमान्यात जर मेकअपची आवड असेल तर मग आपल्याला आय लायनर लावता आलंच पाहिजे.. म्हणूनच तर सफाईदारपणे आय लायनर लावण्यासाठी या काही गोष्टी करा.....
आय लायनर लावताना अशी काळजी घ्याHow to apply eye liner perfectly- स्वत:च्या डोळ्यावर स्वत:च्याच हातांनी आय लायनर लावण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच करणार असाल तर सुरूवातीला काही दिवस पेन्सिल आय लायनर ट्राय करा. लिक्विड आय लायनरपेक्षा पेन्सिल आय लायनर लावणे अधिक सोपे जाते. पेन्सिलने आय लायनर लावणे जमू लागले की त्यानंतरच लिक्विड आय लायनर हातात घ्या.- लिक्विड आय लायनर लावताना एका हातात आय लायनरचा ब्रश धरा आणि दुसऱ्या हाताने ज्या डोळ्याला आय लायनर लावणार आहात, त्याचं शेवटचं टोक हलकासा ताण देऊन पकडा. असं केल्यामुळे डोळ्याच्या वरच्या भागावरच्या हलक्या लाईनही झाकल्या जातील आणि प्लेन सरफेस तयार होईल. त्यावर आय लायनर लावणं सोपं जातं.
Video Credit- Smitha Deepak
- आय लायनर लावताना सुरुवात नेहमी डोळ्याचे नाकाच्या बाजूचे जे टाेक असते, तिथूनच करा. - आय लायनर लावण्यासाठी जेव्हा तुम्ही लिक्विड आय लायनरचा ब्रश बाटलीतून बाहेर काढता, तेव्हा त्याच्या टोकावरचे सगळे अतिरिक्त आय लायनर काढून घ्या आणि ब्रश एकदम प्लेन, एकसमान करा. नाहीतर जास्तीचं आयलायनर सगळं पापण्यांवर ओघळतं आणि पसरत जातं. - आय लायनर लावताना ब्रश अगदी अलगदपणे हलक्या हाताने पकडावा. तसेच ब्रश तुमच्या डोळ्याच्या खालून किंवा वरून पकडू नका. डोळ्याच्या समान रेषेत ब्रश पकडा. - सगळ्यात मुख्य म्हणजे एक डोळा बंद केल्यानंतर त्याची होणारी थरथर कमी करा. अगदी सावकाशपणे डोळा मिटा. त्याची हालचाल झाली नाही, तर आय लायनर एकदम सफाईदारपणे लागेल. आय लायनर लावल्यानंतर लगेचच डोळा उघडू नका. १०- १५ सेकंद डोळा तसाच बंद राहू द्या आणि त्यानंतर हळूवारपणे उघडा.