Lokmat Sakhi >Beauty > बॉडी पॉलिशिंग करायचं आहे, महागडे पार्लर परवडत नाही? घरच्याघरी 5 गोष्टी करा, मिळवा पॉलिशिंग इफेक्ट

बॉडी पॉलिशिंग करायचं आहे, महागडे पार्लर परवडत नाही? घरच्याघरी 5 गोष्टी करा, मिळवा पॉलिशिंग इफेक्ट

Skin care: बॉडी पाॅलिशिंगसारखी महागडी ट्रिटमेंट पार्लरमध्ये (beauty treatment) जाऊन करायची असेल, तर त्यासाठी हजारो रूपये मोजावे लागतात.. पण हेच काम जर घरच्याघरी आणि फक्त ५० रूपयांत झालं तर.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2022 03:35 PM2022-02-25T15:35:37+5:302022-02-25T15:57:16+5:30

Skin care: बॉडी पाॅलिशिंगसारखी महागडी ट्रिटमेंट पार्लरमध्ये (beauty treatment) जाऊन करायची असेल, तर त्यासाठी हजारो रूपये मोजावे लागतात.. पण हेच काम जर घरच्याघरी आणि फक्त ५० रूपयांत झालं तर.. 

Beauty tips: How to do body polishing beauty treatment at home, simple home remedies for glowing skin | बॉडी पॉलिशिंग करायचं आहे, महागडे पार्लर परवडत नाही? घरच्याघरी 5 गोष्टी करा, मिळवा पॉलिशिंग इफेक्ट

बॉडी पॉलिशिंग करायचं आहे, महागडे पार्लर परवडत नाही? घरच्याघरी 5 गोष्टी करा, मिळवा पॉलिशिंग इफेक्ट

Highlightsआपण ही ट्रिटमेंट घरीच करतो आहे. त्यामुळे सुरुवातीला चेहरा- मान- गळा, त्यानंतर हात, मग पाय अशा पद्धतीने एकेका भागाचे पॉलिशिंग केले तरी चालेल.

शरीरावरचं टॅनिंग काढून टाकण्यासाठी, डेड स्किन निघून जाऊन त्वचेला चमक येण्यासाठी आणि फेशिअल व ब्लीच (facial and bleech) केल्यानंतर चेहऱ्याला जसा ग्लो येतो, तसा ग्लो संपूर्ण शरीराला यावा, यासाठी बॉडी पाॅलिशिंग केलं जातं. चेहऱ्यासोबतच हात, पाय, मान, पाठ अशा भागांवरही ही ट्रिटमेंट (skin care treatment) केली जाते. अतिशय महागड्या ब्यूटी ट्रिटमेंट्सपैकी एक म्हणजे बॉडी पॉलिशिंग (body polishing).

 

ही ट्रिटमेंट करून घ्यायची असेल तर त्यासाठी कमीत कमी ५ हजार रूपये तरी मोजावे लागतात. ज्या मुलींची लग्न ठरली आहेत त्या लग्नाच्या काही दिवस आधी हौसेपोटी ही ट्रिटमेंट करून घेतात. पण वारंवार एवढे पैसे मोजणं आपल्या जीवावर येतं. म्हणूनच तर अगदी पार्लरसारख्या बॉडी पॉलिशिंगचा इफेक्ट घरबसल्या आणि स्वस्तात मिळावा असं वाटत असेल तर त्यासाठी हा सोपा उपाय करून बघा. ही ट्रिटमेंट इन्स्टाग्रामच्या beautysecretsreveal या पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

 

घरच्याघरी असे करा बॉडी पॉलिशिंग...
How to do body polishing beauty treatment at home?

- ही ट्रिटमेंट करण्यासाठी आपल्याला फक्त ५ गोष्टी लागणार आहेत.
- आपण ही ट्रिटमेंट घरीच करतो आहे. त्यामुळे सुरुवातीला चेहरा- मान- गळा, त्यानंतर हात, मग पाय अशा पद्धतीने एकेका भागाचे पॉलिशिंग केले तरी चालेल.
- सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये एकेक टेबलस्पून चंदन पावडर, तांदळाचं पीठ आणि मध घ्या. त्यामध्ये अर्धा टेबलस्पून हळद टाका. हे मिश्रणाची पेस्ट तयार करण्यासाठी त्यात गरजेनुसार कच्चं दूध टाका.


- सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. ज्या भागाचं पॉलिशिंग करायचं आहे, तो भाग थोडासा ओलसर करून घ्या आणि त्यावर हा लेप लावा. 
- हलक्या हाताने ५ ते ७ मिनिटे मसाज करा. त्यानंतर १० मिनिटांनी धुवून टाका. 
- चमकदार त्वचेसाठी महिन्यातून दोन वेळा हा उपचार करावा..

 

Web Title: Beauty tips: How to do body polishing beauty treatment at home, simple home remedies for glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.