बऱ्याचदा आपल्या तब्येतीकडे, सौंदर्याकडे लक्ष द्यायला आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे मग आरोग्याच्या आणि त्वचेच्या, केसांच्या अनेक तक्रारी सुरू होतात. यातली एक प्रमुख समस्या म्हणजे डोळ्यांखाली काळी वर्तुळं (How to get rid of dark circles?) दिसायला लागणं आणि बारीकशा सुरकुत्या डोकवायला सुरुवात होणं. आता तिशीनंतर डोळ्यांभोवती फाईन लाईन्स (fine lines or wrinkles around eyes) यायला सुरुवात होते. पण त्यावर लगेच काही उपाय (home remedies and exercises) केले तर त्या सुरकुत्या आपण बऱ्याच काळपर्यंत लांबवू शकतो.
डोळ्यांभोवती काळी वर्तुळं आली असतील तर त्याची अनेक कारणं आहेत. यापैकी सगळ्यात पहिलं कारण म्हणजे तुम्हाला आहारातून योग्य पोषणमुल्ये पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत.
सानिया मिर्झाचा नवाबी थाट! परिणितीचा लग्नात घातलेल्या घागऱ्याची किंमत तब्बल ४.५ लाख...
यामुळे अशक्तपणा येतो आणि तो डोळ्यांभोवतीच्या काळ्या वर्तुळातून दिसू लागतो. आणखी दुसरं कारण म्हणजे रात्रीची जागरण आणि सतत कोणती ना कोणती स्क्रिन बघणं. अंधारात मोबाईल बघण्याची सवय असेल तर त्यामुळेही डोळ्यांभोवती काळी वर्तूळे दिसू लागतात आण कमी वयातच डोळ्यांभोवती सुरकुत्या येऊ लागतात. त्यामुळे डोळ्यांभोवती सुरकुत्या दिसत असतील तर आहारात बदल करा, स्क्रिन टाईम शक्य तेवढा कमी करा आणि त्याच बरोबर खाली सांगितलेला एक सोपा उपाय करा. यामुळे डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स कमी होऊन डोळ्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी निश्चितच मदत होईल.
डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स कमी करण्याचे उपाय
हे उपाय इन्स्टाग्रामच्या fit_with_priya_ या पेजवर शेअर करण्यात आले आहेत. हे उपाय तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बसल्या बसल्या कुठेही करू शकता.
तुम्ही खाता ते तूप शुद्ध आहे की भेसळ? कसं ओळखायचं? ४ टिप्स- घरीच करा तुपाची चाचणी
यातला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे तुमच्या हाताच्या पहिल्या दोन बोटांच्या टोकांनी डोळ्यांच्या खालच्या भागात डोळ्याच्या एका कडेपासून ते दुसऱ्या कडेपर्यंत हलक्या हाताने टॅपिंग करा. असे ५ वेळा करा.
यानंतर हाताचे पहिले बोट आणि मधले बोट दोन्ही डोळ्यांच्या नाकाजवळच्या टोकाजवळ आणि बाहेरच्या टोकावर ठेवा. आता हलक्या हाताने त्या दोन्ही पॉईंटला प्रेस करा.
पहिले बोट दुमडून घ्या. त्यानंतर या टोकाने डोळ्यांच्या खालच्या भागात ५ वेळा मसाज करा. मसाज करताना हात आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूकडे फिरवावा.