Lokmat Sakhi >Beauty > DIY: डार्क सर्कल्स आणि चेहऱ्यावरचे काळे डाग छळतात? हळद- कॉफी- दही फक्त ३ गोष्टी; उत्तम फेसपॅक

DIY: डार्क सर्कल्स आणि चेहऱ्यावरचे काळे डाग छळतात? हळद- कॉफी- दही फक्त ३ गोष्टी; उत्तम फेसपॅक

Skin care tips: हा सोपा उपाय करून बघा.. डोळ्यांखालची काळी वर्तूळे आणि चेहऱ्यावरचे काळे डाग लवकरच होतील गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 05:34 PM2022-01-31T17:34:16+5:302022-01-31T17:43:48+5:30

Skin care tips: हा सोपा उपाय करून बघा.. डोळ्यांखालची काळी वर्तूळे आणि चेहऱ्यावरचे काळे डाग लवकरच होतील गायब

Beauty tips: How to reduce dark circles and pigmentation on skin, home remedies | DIY: डार्क सर्कल्स आणि चेहऱ्यावरचे काळे डाग छळतात? हळद- कॉफी- दही फक्त ३ गोष्टी; उत्तम फेसपॅक

DIY: डार्क सर्कल्स आणि चेहऱ्यावरचे काळे डाग छळतात? हळद- कॉफी- दही फक्त ३ गोष्टी; उत्तम फेसपॅक

Highlights हळद, कॉफी आणि दही या तिन्ही पदार्थांमध्ये ॲण्टी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे या तिन्ही गोष्टी चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

आपल्या चेहऱ्याचं बारकाईने निरिक्षण केलं तर असं लक्षात येतं की त्वचेच्या वेगवेगळ्या भागांचा रंग वेगवेगळा आहे. म्हणजेच कपाळाची त्वचा ज्या रंगाची असते, त्या रंगाची त्वचा गालावर नसते. किंवा हनुवटी आणि डोळ्यांच्या बाजूच्या भागातली त्वचा ही देखील वेगवेगळ्या रंगाची असते. चेहऱ्याच्या अनेक भागांवर टॅनिंग (tanning) झालेलं असतं त्यामुळे तिथली त्वचा काळवंडल्यासारखी दिसते.. तसेच डोळ्यांखाली देखील काळी वर्तूळे (dark circles) झालेली असतात. 

 

चेहऱ्यावरचं हे पिगमेंटेशन, डोळ्यांखालची काळी वर्तूळे काढून टाकण्यासाठी हा एक घरगुती उपाय तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतो. हा उपाय ruchita.ghag यांनी इन्स्टाग्रामच्या beauty.expertt या पेजवर शेअर केला आहे. कॉफी, हळद आणि दही केवळ या ३ गोष्टी आपल्यााला त्यासाठी लागणार आहेत. हा उपाय नियमितपणे केल्यास डोळ्यांखालची काळी वर्तूळे तर जातीलच पण चेहऱ्याचाही स्किन टोन इव्हन म्हणजे एकसारखा होईल. 

 

कसा तयार करायचा फेसपॅक 
- हा फेसपॅक तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये अर्धा टीस्पून हळद, १ टीस्पून कॉफी पावडर आणि १ टेबलस्पून दही घ्यायचं आहे. हे सगळं साहित्य व्यवस्थित हलवून त्याची पेस्ट तयार करा. हा फेसपॅक डोळ्यांखालची काळी वर्तूळे, हनुवटी आणि चेहऱ्याचा जो भाग काळवंडलेला आहे, त्या ठिकाणी लावा. दोन ते तीन मिनिटे हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. चेहरा धुतल्यानंतर आठवणीने मॉईश्चरायझर लावा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय नियमितपणे केल्यास काळी वर्तूळे आणि चेहऱ्यावरचे पिंगमेंटेशन कमी होऊ शकते.

 

हा उपाय करण्याचे फायदे
- हळद, कॉफी आणि दही या तिन्ही पदार्थांमध्ये ॲण्टी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे या तिन्ही गोष्टी चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी आणि त्वचेचा पोत सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात. 
- टॅनिंग किंवा उन्हामुळे चेहरा काळवंडला असेल तरी हा उपाय करावा. टॅनिंग निघून जाण्यास मदत होते.
- पिगमेंटेशन कमी होऊन त्वचेचा रंग एकसारखा होतो. 


 

Web Title: Beauty tips: How to reduce dark circles and pigmentation on skin, home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.