Lokmat Sakhi >Beauty > इन्स्टंट ग्लो मिळविण्यासाठी करा 'आइस फेशियल', स्किन टाईटनिंगसोबतच मिळेल तजेलदार त्वचा..

इन्स्टंट ग्लो मिळविण्यासाठी करा 'आइस फेशियल', स्किन टाईटनिंगसोबतच मिळेल तजेलदार त्वचा..

पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल, तर घरच्याघरी करा आइस फेशिअल आणि मिळवा इन्स्टंट ग्लो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 05:11 PM2021-09-14T17:11:42+5:302021-09-14T17:13:25+5:30

पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल, तर घरच्याघरी करा आइस फेशिअल आणि मिळवा इन्स्टंट ग्लो.

Beauty tips: Ice facial for glowing skin. Perfect anti aging skin care solution | इन्स्टंट ग्लो मिळविण्यासाठी करा 'आइस फेशियल', स्किन टाईटनिंगसोबतच मिळेल तजेलदार त्वचा..

इन्स्टंट ग्लो मिळविण्यासाठी करा 'आइस फेशियल', स्किन टाईटनिंगसोबतच मिळेल तजेलदार त्वचा..

Highlightsब्यूटी वर्ल्डमध्ये स्वस्तात मस्त उपाय म्हणून आइस फेशिअलकडे पाहिले जाते. 

नियमितपणे पार्लरमध्ये जाणे अनेक जणींना शक्य होत नाही. अशावेळी मग त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी घरच्याघरी काही उपाय करणे गरजेचे असते. अशा उपायांपैकीच एक छान आणि अतिशय उपयुक्त उपाय म्हणजे आइस फेशियल. अतिशय कमी वेळेत आपल्याला हे फेशियल करता येते. चमकदार त्वचा मिळविण्यासाठी तर हे फेशिअल उपयुक्त ठरतेच पण त्यासोबतच त्याचे अनेक भन्नाट उपयोग आहेत. ब्यूटी वर्ल्डमध्ये स्वस्तात मस्त उपाय म्हणून आइस फेशिअलकडे पाहिले जाते. 

 

कसे करायचे आइस फेशिअल?
- आइस फेशियल करण्यासाठी सगळ्यात आधी तर एक मोठे बाऊल घ्या. हे बाऊल एवढे मोठे असावे की त्यामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा टाकता येईल.
- या बाऊलमध्ये थंड पाणी टाका आणि त्यामध्ये १० ते १५ बर्फाचे तुकडे टाका.
- बर्फाचे तुकडे वितळायला सुरुवात झाली की मग त्या बाऊलमध्ये तुमचा चेहरा बुडवा आणि १० सेकंदांपर्यंत श्वास रोखून ठेवा.
- यानंतर चेहरा बाऊलमधून बाहेर काढा आणि चेहऱ्यावर सगळ्या बाजूने हाताच्या तळव्याने हलक्या हाताने थापटा.
- असा प्रयोग एका मिनिटात जेवढ्या वेळा करता येणे शक्य आहे, तेवढ्या वेळा करा. 
- यानंतर चेहरा अलगद पुसून घ्या. चेहरा अजिबात चोळून, रगडून पुसू नये. चेहऱ्यावरील ओलावा अलगद टिपून घेतला तरी चालेल. 
- तुम्ही नेहमी जे मॉईश्चरायझर लावता, ते लावून चेहऱ्याची मालिश करा. 

 

आइस फेशियल करण्याचे फायदे
१. स्किन टाईटनिंगसाठी सर्वोत्तम 
बर्फाचा थंडावा चेहऱ्याची स्किन टाईट करण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्वचा खूप सैल पडली असेल आणि निस्तेज झाली असेल, तर आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करावा. त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी हा उपाय अतिशय छान आहे. 

 

२. पिंपल्सचा त्रास होतो कमी
चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर आइस फेशिअल करून पहा. हा उपाय केल्याने त्वचेतून अतिप्रमाणात तेल सुटणे कमी होते. त्यामुळे आपोआपच पिंपल्सचा त्रास कमी होतो. पिंपल्स सोबतच व्हाईट हेड्स आणि ब्लॅकहेड्सची समस्या असणाऱ्यांसाठीही हा उपाय अतिशय फायदेशीर आहे. आठवड्यातून एकदा तरी हा उपाय करावा.

 

३. मेकअप टिकतो अधिकवेळ
मेकअप केल्यानंतर तास- दोन तासातच त्वचेतून तेल सुटू लागते आणि सगळा मेकअप खराब दिसू लागतो. असे टाळायचे असेल तर मेकअप करण्याच्या आधी अशा प्रकारचे आइस फेशिअल जरूर करावे. यामुळे ६ ते ७ तास आरामात मेकअप टिकतो आणि तुमचा चेहरा फ्रेश दिसताे. 

 

असा प्रयोगही करू शकता
- आइस फेशिअल करण्यासाठी जेव्हा बर्फ लावायला ठेवाल तेव्हा तो बर्फ नुसता पाण्याचाच करू नका. 
- आइस ट्रेमध्ये तुम्ही कॉफीचे पाणी, हळदीचे पाणी, गुलाबपाणी, ग्रीन टी, लिंबू  असे घालूनही बर्फ लावू शकता.
- अशा प्रकारच्या बर्फाने केलेले फेशिअल अधिक फायदेशीर ठरते. 

 

Web Title: Beauty tips: Ice facial for glowing skin. Perfect anti aging skin care solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.