Lokmat Sakhi >Beauty > Beauty Tips : ऑइली स्किन असेल तर फाउंडेशन कसं निवडाल? 5 परफेक्ट फाउंडेशन, लूक मस्त

Beauty Tips : ऑइली स्किन असेल तर फाउंडेशन कसं निवडाल? 5 परफेक्ट फाउंडेशन, लूक मस्त

Beauty Tips : आपल्या त्वचेचा पोत, प्रकार लक्षात घेऊन आपण सौंदर्यप्रसाधने वापरलेली केव्हाही चांगली. फाऊंडेशनची निवड करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2022 01:11 PM2022-04-17T13:11:30+5:302022-04-17T13:19:54+5:30

Beauty Tips : आपल्या त्वचेचा पोत, प्रकार लक्षात घेऊन आपण सौंदर्यप्रसाधने वापरलेली केव्हाही चांगली. फाऊंडेशनची निवड करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी...

Beauty Tips: If you have oily skin, how do you choose a foundation? 5 Perfect Foundation, nice look | Beauty Tips : ऑइली स्किन असेल तर फाउंडेशन कसं निवडाल? 5 परफेक्ट फाउंडेशन, लूक मस्त

Beauty Tips : ऑइली स्किन असेल तर फाउंडेशन कसं निवडाल? 5 परफेक्ट फाउंडेशन, लूक मस्त

Highlightsज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी वॉटरप्रूफ उत्पादने वापरणे केव्हाही चांगले. फाऊंडेशनचा खूप जाड थर लावण्यापेक्षा हलका थर लावल्यास हे फाऊंडेशन जास्त काळ टिकण्यास मदत होते.

उन्हाळ्यात एखाद्या कार्यक्रमाला जायचं म्हटलं की काय आणि कसा मेकअप करायचा असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो. घामामुळे होणारी चिकचिक आणि लाहीलाही यामुळे मेकअपची तर पार वाट लागून जाते. चेहऱ्यावर लावलेले फाऊंडेशन पसरले तर सगळ्या मेकअपचीच वाट लागून जाते. ज्यांची स्कीन ऑयली आहे अशांना तर या दिवसांत मेकअप करताना खूप अडचणी येतात. अशावेळी कोणत्या प्रकारचे फाऊंडेशन वापरले तर तुमची त्वचा तेलकट दिसणार नाही, भर उन्हातही तुमचा मेकअप बराच काळ टिकू शकेल(Beauty Tips). आधीच ऑयली स्कीन असणाऱ्यांना सगळी उत्पादने खुलून येत नाहीत. त्यामुळे आपल्या त्वचेचा पोत, प्रकार लक्षात घेऊन आपण सौंदर्यप्रसाधने वापरलेली केव्हाही चांगली. ऑयली स्कीन असेल तर आपल्याला सतत ब्लॅकहेडस आणि व्हाईटहेडस होण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून कोणत्या प्रकारचे फाऊंडेशन ऑयली त्वचेसाठी चालतात याविषयी...

(Image : Google)
(Image : Google)

१. मॅट फिनीश लिक्वीड फाऊंडेशन

ऑयली स्कीन असणाऱ्यांसाठी साध्या फाऊंडेशनपेक्षा मॅट फिनीश लिक्वीड फाऊंडेशन हा उत्तम पर्याय ठरु शकतो. आधीच त्वचेतून तेलाची निर्मिती होत असेल तर लिक्वीड फाऊंडेशन वापरल्यामुळे आपली त्वचा आहे त्यापेक्षा आणखी चमकदार दिसेल. पावडर फाऊंडेशनपेक्षआ या फाऊंडेशनमुळे चेहरा जास्त एकसारखा दिसण्यास मदत होते. चेहऱ्यावरील डाग, फोड झाकले जावेत यासाठी हे फाऊंडेशन उपयुक्त ठरते. 

२. ऑईल फ्री फाऊंडेशन

तुमची स्कीन प्रमाणापेक्षा जास्त ऑयली असेल तर तर ऑईल फ्री फाऊंडेशन हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. हे फाऊंडेशन अँटी शाईन असल्याने आपल्या चेहऱ्याला मॅट लूक देण्यासाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. या फाऊंडेशनमुळे आपला चेहरा एकदम नॅचरल दिसतो. त्यामुळे आपण खूप मेकअप केला आहे असेही वाटत नाही. 

३. यलो बेस्ड फाऊंडेशन

आपली त्वचा आणि आपण वापरत असलेले फाऊंडेशन एकमेकांना मॅच होणारे असले तर आपला लूक फार खराब दिसत नाही. मात्र हे दोन्ही खूप वेगळे असले तर आपण खूप मेकअप केला आहे असे दिसते. त्यामुळे आपल्या त्वचेला सूट होईल असा जवळपासच्या शेडचे फाऊंडेशन घ्यायला हवे. त्यामुळे आपला मेकअप खुलून दिसायला मदत होते. 

४. स्कीनटोनच्या खालची एक शेड निवडावी 

अनेकदा तेलकटपणामुळे आपल्या त्वचेला काळेपणा आल्यासारखे दिसते. पण आपल्या चेहरऱ्यापेक्षा थोड्या फिकट रंगाचे फाऊंडेशन घेतले तर आपला चेहरा आहे त्यापेक्षा उजळ दिसण्यास मदत होते. तसेच फाऊंडेशनचा खूप जाड थर लावण्यापेक्षा हलका थर लावल्यास हे फाऊंडेशन जास्त काळ टिकण्यास मदत होते. म्हणून फाऊंडेशनची शेड निवडताना योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली.

(Image : Google)
(Image : Google)

५. अल्कोहोल असलेल्या फाऊंडेशनपासून सावध राहा

अनेकदा विविध प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये अल्कोहोल वापरलेले असते. याचे कारण म्हणजे आपल्या त्वचेतील तेल कमी करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. मात्र अशाप्रकारे तेल कमी केल्यास शरीरात तेलाची आणखी जास्त निर्मिती होण्यास सुरुवात होते. यामुळे आपली त्वचा पहिल्यापेक्षा जास्त ऑयली दिसायला लागते. यामुळे ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी वॉटरप्रूफ उत्पादने वापरणे केव्हाही चांगले. 

Web Title: Beauty Tips: If you have oily skin, how do you choose a foundation? 5 Perfect Foundation, nice look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.