आपला चेहऱा कायम चमकदार हवा, सकाळी उठल्यावर चेहरा निस्तेज न दिसता चेहऱ्यावर मस्त ग्लो (Beauty tips) हवा असे प्रत्येकीला वाटते. मग यासाठी कोणी आहारात काही बदल करते किंवा कोणी वेगवेगळ्या ब्यूटी ट्रिटमेंटस (Beauty Treatments) घेते. काही जणी व्यायाम आणि प्राणायाम यांसारख्या गोष्टींनी आपल्या आतल्या शांततेला जपतात आणि चेहऱ्यावरचे सौंदर्य (Beauty) टिकवून ठेवतात. इतकेच नाही तर घरच्या घरी करता येणारे काही सोपे उपायही (Home remedies ) यांसारख्या गोष्टींमध्ये आपली नक्कीच मदत करु शकतात. पण यासाठी आपल्याला नेमके उपाय माहित असणे गरजेचे आहे. थंडीच्या दिवसांत रात्री झोपताना किंवा आंघोळ झाल्यावर आपण ज्याप्रमाणे अंगाला मॉइश्चरायझर लावतो किंवा आपल्या डेली स्कीन रुटीनमध्ये जे काही फॉलो करतो त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसत असतो. यामध्ये आणखी एक गोष्ट केल्यास त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. आता ती गोष्ट नेमकी कोणती आणि ती कशी करायची हे समजून घेणे गरजेचे आहे. तर रात्री झोपताना रोज चेहऱ्याला ऑलिव्ह ऑईल (Olive oil) लावल्यास उठल्यावर तुमचा चेहरा एकदम ग्लो करतो. ऑलिव्ह ऑईल आरोग्यासाठी चांगले असते हे आपल्याला माहित आहे. पण सौंदर्य खुलवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. त्वचा, केस यांचा पोत सुधारण्यासाठी आपल्या डेली ब्यूटी रुटीनमध्ये ऑलिव्ह ऑईल आवर्जून वापरायला हवे. पाहूयात ऑलिव्ह ऑईल लावण्याची नेमकी पद्धत...
१. आपण झोपताना रात्री चेहऱ्याला कोणते ना कोणते क्रीम नक्की लावतो. थंडीच्या दिवसांत आपण मॉईश्चरायझर लावतो.
२. या क्रीममध्ये किंवा मॉईश्चरायझरमध्ये काही थेंब शुद्ध ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि ते मिश्रण चेहऱ्याला एकसारखे लावा.
३. सकाळी उठल्यावर हे मिश्रण चेहऱ्याच्या त्वचेत छान पद्धतीने मुरल्याने तुम्हाला चेहरा काहीसा तेलकट किंवा चिपचिपीत वाटेल. मात्र फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुतल्यावर हा तेलकटपणा निघून जाण्यास मदत होईल.
४. या उपायामुळे काही दिवसांतच तुमचा चेहरा एकदम सतेज दिसायला लागेल. त्वचेला कोरडेपणा, पुरेसे पोषण न मिळाल्याने त्याची झालेली हानी भरुन काढण्यासाठी ऑलिव्ह ऑईल अतिशय उपयुक्त ठरु शकते.
५. ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, लोह, ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंटस असतात, हे सर्व घटक आरोग्याबरोबरच सौंदर्य खुलवण्यासाठीही अतिशय उपयुक्त असतात.
६. ऑलिव्ह ऑईलच्या उपायाबरोबरच तुम्ही काही घरगुती फेसपॅकही चेहऱ्यावर लावू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा ग्लो करायला मदत होईल. यामध्ये हळद, बेसन आणि दुधाचा फेसपॅक, कोरफडीची जेल यांचा अतिशय चांगला फायदा होतो.