कोरियन तरूण-तरूणी कायम यंग दिसण्यासाठी वर्कआऊट आणि डाएटची मदत घेतात. कोरियन लोक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहाराचे सेवन करतात. (Health Tips) रेग्युलर फिजिकल एक्टिव्हिटीज आणि पोषक घटकांचा आहारात समावेश करून तुम्ही स्वत:चा फिटनेस मेंटेन ठेवू शकता. (Beauty Tips Know What Diet To Follow To Get Glowing Skin Like Korean)
१) ग्रीन टी
ग्रीन टी कोरियाई संस्कृतीचा एक भाग आहे. याचे अनेक फायेद आहेत. ग्रीन टी मध्ये पॉलिफेनॉल्स आणि एंटी ऑक्सिडेंटस असतात ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो आणि वजनही नियंत्रणात राहतं.
२) हळद
कोरियाई लोक हळदीचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात. यात करक्यूमिन नावाचे एंटी इंफ्लेमेटरी गुण आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. जे तब्येतीसाठी फायदेशीर ठरतात. ज्यामुळे सूज कमी होते.
३) व्हिटामीन सी
चेहऱ्यासाठी व्हिटामीन सी परिणामकारक ठरते. यात एंटी ऑक्सिडेंट गुण असतात. इम्यून सिस्टीम मजबूत होते. कोरियन आहारात व्हिटामीन सी युक्त आंबट फळं, हिरव्या भाज्या, जांभूळ हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. व्हिटामीन सी युक्त सप्लिमेंट्सचा आहारात समावेश करा.
हाडांना भरपूर फॉस्फरस देणारे ५ पदार्थ खा; कॅल्शियमही मिळेल-शरीर पोलादी, हाडं मजबूत होतील
४) कोलोजन
त्वचा तरूण दिसण्यासाठी कोलोजन फार महत्वाचे असते. हे एक प्रोटीन असते. त्वचा केस आणि नखं चांगली राहतात. कोरियन लोक आपल्या ब्युटी डाएट कोलेजनयुक्त पदार्थांचा समावेश करतात. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात.
५) ओमेगा-३
ओमेगा ३ फॅटी एसिड तब्येतीसाठी फायदेशीर ठरते. फॅट्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. ज्यामुळे हृदयाच्या समस्या उद्भवत नाही. फिटनेस मेटेंन राहतो.
व्यायामासाठी वेळ नाहीये? फक्त १० मिनिटं उलटं चाला; भराभर वजन घटेल-रेट्रो वॉकिंगचं सोपं सिक्रेट
६) प्रोबायोटिक्स
प्रोबायोटिक्सचे सेवन साऊथ कोरियानचे लोक करतात फर्मेंडेट फूड किमची, दही आणि अन्य पारंपारीक कोरियाई पदार्थ गुड बॅक्टेरिया वाढतात. काही सप्लिमेंट्सचे सेवनही तुम्ही करू शकता. ज्यामुळे पचनक्रिया आणि इम्यूनिटी वाढवते.
७) रेड जिनसेंग
रेड जिनसेंग कोरियामध्ये पारंपारीक आणि पॉप्युलर आहे. यात एडाप्टोजेनिक गुण असतात. याच्या सेवनाने ताण-तणाव दूर होतो आणि उर्जेचा स्तर टिकून राहतो. रेंड जिनसेंनचे सेवन कोरियाई कॅप्सूल अर्क, चहा किंवा टॉनिक कंपोनेंटच्या माध्यमात करता येतो.