Join us  

शहनाज गिलकडे लावा परफेक्ट मेकअपची शिकवणी; 7 धडे, मिळवा परफेक्ट लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 3:11 PM

Beauty Tips: शहनाज गिलच्या लोकप्रियतेच्या कारणांमधलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिचे इन्स्टाग्रामवरील मेकअप लूक्स. तिचे मेकअप लूक्स बघून इतरांनाही तो करुन पाहावासा वाटतो. ती केवळ तिचे मेकअप लूक्स शेअर करत नाही तर तिच्या खास मेकअप टिप्सही देत असते.

ठळक मुद्दे नॅचरल लूकसाठी मॅट फाउंडेशन परफेक्ट असल्याचं शहनाज म्हणते.चेहर्‍यावरचे विशिष्ट भाग उठून दिसण्यासाठी कॉन्टुरिंग हे मेकअप तंत्र वापरावं.घाईघाईनं मेकअप करताना न्यूड मेकअप हा सोपा पर्याय आहे. साधा मेकअप करुनही उठावदार लूक मिळवण्यासाठी न्यूड मेकअप करावा.

शहनाज गिल एक अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका आहे. पंजाबी चित्रपटात काम करत असली तरी हिंदी मालिकांमुळे आणि इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे कायम चर्चेत असते. बिग बॉसच्या 13व्या सिझनमधे ती सहभागी झाली होती तेव्हापासून तर शहनाज गिल खूपच प्रसिध्द झाली. तिच्या लोकप्रियतेच्या कारणांमधलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिचे इन्स्टाग्रामवरील मेकअप लूक्स. तिचे मेकअप लूक्स बघून इतरांनाही तो करुन पाहावासा वाटतो. ती केवळ तिचे मेकअप लूक्स शेअर करत नाही तर तिच्या खास मेकअप टिप्सही देत असते.

शहनाझ वेगवेगळ्या पध्दतीचा मेकअप करत असली तरी मेकअप करताना तिची स्वत:ची खास आवडही आहे. ती काय हे जाणून घेतल्यास आपल्याला शहनाज गिलकडून आणखी एक मेकअपचा धडा मिळेल.

शहनाझ गिलचे मेकअप लेसन्स

1. मॅट फाउंडेशन

शहनाझ गिलला मॅट फाउंडेशन वापरायला आवडतं. मॅट फाउंडेशमुळे चेहरा मऊ मुलायम दिसतो असं शहनाझचं मत आहे. एक नॅचरल लूकसाठी मॅट फाउंडेशन परफेक्ट असल्याचं ती म्हणते. मॅटचा अर्थच मुळी चमकणारे नसणे. मॅट फाउंडेशमुळे चेहरा चमकत नाही. पण या प्रकारच्या फाउंडेशनमुळे स्कीन टोन एकसारखा होतो. हे फाउंडेशन लावल्यानंतर काही तासांनी त्वचेतील नैसर्गिक तेलामुळे फाउंडेशन चमकतं. मॅट फाउंडेशन हे क्रीम, लिक्विड आणि पावडर स्वरुपातही उपलब्ध आहे.मॅट फाउंडेशन चेहर्‍यावर खूप वेळ टिकून राहतं. यात तेल नसल्यानं हे फाउंडेशन लवरक सेट होतं आणि दिवसभर टिकतं. प्रामुख्याने तेलकट त्वचा , मुरुम पुटकुळ्या येणार्‍या त्वचेसाठी मॅट फाउंडेशन खास तयार केलं आहे.

2. कॉन्टुरिंगचा उपयोग

शहनाज गिलचा चेहरा मोठा आहे. मोठ्या चेहर्‍यावर डेप्थ निर्माण होण्यासाठी ती कॉन्टुरिंगचा उपयोग करते. विशेषत: चेहर्‍यावरील चीक बोन्ससाठी ती कॉन्टुरिंग करते. कॉन्टुरिंग हे एक मेकअप तंत्र आहे. चेहर्‍यावर कोरीव काम करण्यासाठी, चेहर्‍यावरचे विशिष्ट भाग उठून दिसण्यासाठी हे तंत्र वापरलं जातं.

3. रेड लिपस्टिक

शहनाज गिल वेगवेगळे मेकअप लूक्स कॅरी करते. त्यामुळे चेहर्‍यासाठी ती वापरत असलेल्या रंगात बदल होणे साहजिकच आहे. पण शहनाजला रेड लिपस्टिक लावायला आवडते. बोल्ड लूक दिसण्यासाठी रेड लिपस्टिक लावली जाते. आपलं अस्तित्त्व अधिक ठळक करण्यासाठी , शक्तीशाली करण्यासाठी रेड लिपस्टिक लावण्यावर भर दिला जातो. रेड लिपस्टिक ही एक प्रकारे महिलांमधील ताकदीचं प्रतीक आहे.

Image: Google

4. बोल्ड ब्ल्यू आयशॅडो

मेकअप केल्यानंतर आपले डोळे अधिक आकर्षक दिसण्यासाठी शहनाज बोल्ड ब्ल्यू आयशॅडो वापरते. बोल्ड ब्ल्यू आयशॅडोमुळे डोळ्यांना आणि एकूणच लूकला ड्रॅमॅटिक लूक मिळतो. ब्ल्यू आयशॅडो हा ठसठशीत,स्पष्ट असा उर्जा देणारा रंग आहे. यामुळे चेहर्‍यावरही एक चैतन्य निर्माण होतं. बोल्ड ब्ल्यू आयशॅडो ही मुळातच गडद असल्याने ती लावताना जपून लावावी लागते, नाहीतरी चेहरा विदूषकासारखाही दिसण्याची शक्यता असते. बोल्ड ब्ल्यू आयशॅडोमुळे पाहाणारे मोहून जातात, संमोहित होतात.

5. न्यूड मेकअप

न्यूड मेकअपमुळेही छान लूक मिळतो. नैसर्गिक सौंदर्याकडे झुकणारा मेकअप होय. न्यूड मेकअप म्हणजे कॉस्मेटिक्सचा वापर अजिबात करायचा नाही असं मात्र नाही. हा मेकअप करताना आयशॅडो, लिपस्टिकचे रंग, साधे वाटतील असे निवडले जातात. मेकअप करतना चेहर्‍यावरील दोष झाकले जातील याची काळजी घेतली जाते. न्यूड मेकअप करतांना क्लिन्जिंग, टोनिंग आणि मॉश्चरायझिंग अर्थात सीटीएम रुटीन पाळणं महत्त्वाचं असतं. या बेसिक पायर्‍या करुन झाल्यावर चेहर्‍यावरचा न्यूड मेकअप उठून दिसतो. न्यूड मेकअप करताना सीटएम रुटीन पाळलं की, नंतर फक्त फाउंडेशन आणि कन्सिलर वापरावं. घाईघाईनं मेकअप करताना न्यूड मेकअपची संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणणे सोपं आहे.

Image: Google

6. टोकदार भुवया

भुवया आपल्या चेहर्‍याला कलात्मक सौंदर्य प्राप्त करुन देतात. त्यामुळे भुवयांमधे थोडीही गडबड शहनाजला चालत नाही. प्रत्येक वेळी आपल्या आयब्रोज नीट आहे ना भ्रीव आहे ना हे बघावं लागतं. यासाठी रोज पेन्सिल फिरवून भुवया उठावदार कराव्या लागतात.

7. हायलायटर लावायला विसरु नका

संपूर्ण चेहरा मेकअपमुळे चमकायला लागला तर आपल्या चेहर्‍यातील विशेष बाबी दिसणार नाही. म्हणूनच हायलायटर वापरायला कधीही विसरु नये. शहनाज गिल आपल्या चेहर्‍यावरचे विशिष्ट स्पॉटस जे मेकअपमुळे झाकले जातात ते उठून दिसावेत यासाठी हायलायटर हे काम करतात. हे हायलायटर आपल्या स्किन टोनच्या तुलनेत थोडे जास्त गडद असतात. 

टॅग्स :मेकअप टिप्सब्यूटी टिप्स