सुंदर दिसण्याचा पहिला नियम म्हणजे त्वचेची काळजी घ्या. मेकअप करताना जितके कॉस्मेटिक्स लागतात त्यापेक्षा अधिक कमी आणि नैसर्गिक घटकांच्या सहाय्याने त्वचेची काळजी घेता येते. त्वचेची काळ्जी घेणार्या उत्पादनांमधे स्किन टोनरला अतिशय महत्त्व असतं. चेहेर्यावरील अतिरिक्त तेलामुळे मुरुम पुटकुळ्यांची समस्या निर्माण होते. या मुरुम पुटकुळ्या बर्या झाल्या की चेहेर्यावर जे डाग पडतात ते आणखीनच वाईट दिसतात. यावरचा उपाय म्हणजे चेहेर्यावर मुरुम पुटकुळ्या होवून न देण्यासाठी आवश्यक ते उपाय करणे. हे उपाय करण्यात स्कीन टोनरचा उपयोग करणं म्हणूनच महत्त्वाचं मानलं जातं. शिवाय टोनरमुळे मुरुम पुटकुळ्यांचे डागही निघून जातात. बाहेर बाजारात मिळत असणार्या टोनरपेक्षा घरच्या घरी तयार केलेले नैसर्गिक टोनर हे जास्त प्रभावी ठरतात. तीन प्रकारचे नैसर्गिक टोनर जे घरी तयार करुन वापरल्यास त्वचा तेलकट राहाण्याची समस्या अगदीच कमी होते. शिवाय या टोनरच्या उपयोगानं मुरुम पुटकुळ्यांचे डाग निघून जातात आणि चेहेरा स्वच्छ होतो.
छायाचित्र- गुगल
मुळात टोनरचा उपयोग हा त्वचा स्वच्छ करण्यासाठी होतो. शिवाय ज्यांच्या चेहेर्यावरील त्वचेची रंध्र मोठी असतात त्यांचा चेहेरा खडबडीत दिसतो. ही रंध्रं लहान करण्याचं कामही टोनर करतात. एकाचवेळी त्वचा सुंदर आणि स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक टोनर प्रभावी ठरतात. हे नैसर्गिक टोनर तीन प्रकारे करता येतात.
नैसर्गिक टोनर
छायाचित्र- गुगल
1. गुलाब पाणी टोनर- गुलाब पाण्यात अर्धा चमचा ग्लिसरीन घालावं. हे टोनर पंधरा वीस दिवस टिकवून ठेवण्यासाठी त्यात अर्धा चमचा अँपल सायडर विनेगर घालावं. ते चांगलं हलवून एकत्र करावं. एका बाटलीत भरावं. दिवसातून कमीत कमी तीन वेळा ते चेहेर्याला स्प्रेने किंवा कापसाच्या बोळ्यानं लावावं.
छायाचित्र- गुगल
2. कडुलिंबाचं टोनर- हे टोनर तयार करण्यासाठी कडुलिंबाची पानं पाण्यात उकळून घ्यावी. हे पाणी नंतर गाळून एका स्प्रे बाटलीत भरावी. हे टोनरही दहा पंधरा दिवस साठवून ठेवता येतं. यासाठी या पाण्यात अर्धा चमचा अँपल सायडर विनेगर घालावं. या कडुलिंबाच्या टोनरमुळे चेहेर्यावरील मुरुम पुटकुळ्या बर्या होतात.
छायाचित्र- गुगल
3. कोरफड जेल टोनर- कोरफड जेल टोनर तयार करण्यासाठी पिण्याच्या पाण्यात कोरफड जेल घालावं. त्वचा जर संवेदनशील असेल तर त्यात टी ट्री ऑइलचे 4-5 थेंब घालावेत. तसेच हे टोनर 10-15 दिवस साठवून ठेवण्यासाठी त्यात अर्धा चमचा अँपल सायडर विनेगर घालावं. हे टोनर दिवसातून कमीत कमी तीन वेळा तरी स्प्रे बॉटलनं किंवा कापसानं चेहेर्यास लावावं.