Lokmat Sakhi >Beauty > Beauty Tips- मलायका अरोरा सांगतेय, दालचिनी लेप लावा! मुरुम-पुटकुळ्या पिंपल्स गायब

Beauty Tips- मलायका अरोरा सांगतेय, दालचिनी लेप लावा! मुरुम-पुटकुळ्या पिंपल्स गायब

 सततच्या मुरुम पुटकुळ्यांनी हैराण मुली आणि महिलांना मलायका अरोरा सांगते एक घरगुती इलाज जो ती स्वत: देखील करते. यासाठी घरात फक्त दालचिनी, मध आणि लिंबू हवं. मलायकनं सांगितलेला हा उपाय प्रभावी कसा वाचून पाहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 03:15 PM2021-08-07T15:15:45+5:302021-08-07T15:22:15+5:30

 सततच्या मुरुम पुटकुळ्यांनी हैराण मुली आणि महिलांना मलायका अरोरा सांगते एक घरगुती इलाज जो ती स्वत: देखील करते. यासाठी घरात फक्त दालचिनी, मध आणि लिंबू हवं. मलायकनं सांगितलेला हा उपाय प्रभावी कसा वाचून पाहा!

Beauty Tips- Malaika Arora tells apply cinnamon face pack for pimples and acne problem | Beauty Tips- मलायका अरोरा सांगतेय, दालचिनी लेप लावा! मुरुम-पुटकुळ्या पिंपल्स गायब

Beauty Tips- मलायका अरोरा सांगतेय, दालचिनी लेप लावा! मुरुम-पुटकुळ्या पिंपल्स गायब

Highlightsमलायका म्हणते की हा दालचिनीचा लेप तेलकट त्वचा असलेल्यांसाठी उपयुक्त आहे.आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यास तेलकट त्वचा असणार्‍यांना होणारा मुरुम पुटकुळ्यांचा त्रास कमी होवू शकतो.दालचिनी, मध आणि लिंबू या तिन्ही घटकातील गुणांचा समुच्चय मुरुम पुटकुळ्यांवा प्रभावी काम करतो.छायाचित्रं- गुगल

चेहेर्‍यावर सतत मुरुम पुटकुळ्या येणं ही खूप मोठी समस्या आहे. आपली त्वचा मुरुम पुटकुळ्यांच्या दृष्टीनं संवेदनशील असेल तर ही समस्या वारंवार डोकं वर काढते. यामुळै त्वचेचा पोत बिघडतो आणि चेहेरा खराब होतो. मुरुम पुटकुळ्या जाव्यात म्हणून अनेक उपाय आपण बाहेर शोधत फिरतो पण एक सोपा उपाय आपल्या घरातच आहे. या उपायाकडे अभिनेत्री मलायका अरोराने लक्ष वेधलं आहे.

फिटनेस फ्रिक असलेली मलायका त्वचेबाबतही खूप जागरुक आहे. फिटनेस विषयी इतरांना उपयोगी पडेल अशी माहिती ती पोस्ट किंवा व्हिडीओच्या स्वरुपात नेहेमी देत असते. त्वचेच्या काळजीबाबतची एक पोस्ट तिने समाजमाध्यमांवर टाकली. ही पोस्ट म्हणजे सततच्या मुरुम पुटकुळ्यांनी हैराण मुली आणि महिलांसाठी एक दिलासा आहे. या पोस्टमधे मलायकाने मुरुम पुटकुळ्यांवर एक घरगुती आणि प्रभावी इलाज सांगितला आहे. तो करण्यासाठी फक्त तीन गोष्टी लागतात.घरात दालचिनी, मध आणि लिंबू हवं की मुरुम पुटकुळ्या घालवणारा लेप आपण सहज तयार करु शकतो.
तेलकट त्वचा असलेल्यांन मुरुम पुटकुळ्यांची समस्या असतेच. या समस्येवर उपाय करण्यासाठी स्वत:च्याच मनानं किंवा जाहिरातींना भुलून अनेक क्रीम्स आणि लोशन्स वापरले जातात. पण यामुळे मुरुम पुटकुळ्या जात तर नाहीच पण त्वचेचा पोत मात्र बिघडतो. त्वचेचा पोत सांभाळून सौंदर्य समस्यांवर उपचार करण्यासाठी म्हणूनच घरगुती आणि नैसर्गिक उपाय प्रभावी ठरतात.

छायाचित्र- गुगल

दालचिनीचा लेप

मलायका म्हणते की हा दालचिनीचा लेप तेलकट त्वचा असलेल्यांसाठी उपयुक्त आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा लेप लावल्यास तेलकट त्वचा असणार्‍यांना होणारा मुरुम पुटकुळ्यांचा त्रास कमी होवू शकतो. दालचिनीचा लेप तयार करण्यासाठी छोटा अर्धा चमचा दालचिनी पावडर, एक ते दीड चमचा मध आणि थोडा लिंबाचा रस एवढंच साहित्य लागतं . या तिन्ही गोष्टी एका वाटीत एकत्र करुन घ्याव्यात. चेहेरा आधी धुवून घ्यावा. रुमालानं चेहेरा टिपून झाला की हा दालचिनीचा लेप लावावा. 15 -20 मिनिटांनी चेहेरा गार पाण्यानं धुवावा. नंतर चेहेर्‍याला मॉश्चरायझर आणि सनस्क्रीन लावावं.
मुरुम पुटकुळ्यांसाठी प्रभावी ठरणारा हा दालचिनीचा उपाय सांगताना मलायका एक महत्त्वाची गोष्टही सांगते. ती म्हणते की मुरुम पुटकुळ्या केवळ तेलकट त्वचा आहे म्हणूनच येतात असं नाही. शरीरात हार्मोन्समधे होणारे बदल, पीसीओडी यासारख्या समस्यांमुळेही चेहेर्‍यावर मुरुम पुटकुळ्या येतात. मुरुम पुटकुळ्यांचं प्रमाण सामान्यापेक्षा जास्त किंवा अति असेल तर आधी डॉक्टरांना भेटावं. अशा मुरुम पुटकुळ्यांसाठी आधी शरीराच्या आतील बदलांचं निदान होवून त्यावा उपचार होणं आवश्यक आहे.’

छायाचित्र- गुगल

दालचिनीचा लेप प्रभावी कसा?

मलायका हा दालचिनीचा लेप मुरुम पुटकुळ्या घालवण्यासाठी प्रभावी कसा हे देखील सांगते. मलायका म्हणते दालचिनी लेपातला प्रत्येक घटक मुरुमाशी निगडित वेगवेगळ्या गोष्टींवर काम करतो म्हणून हा लेप प्रभावी ठरतो.

1. दालचिनी:- दालचिनीत दाह आणि सूजविरोधी घटक असतात. मुरुम आल्यानं चेहेरा सूजल्यासारखा वाटतो, लाल दिसतो शिवाय त्यामुळे चेहेर्‍यावा डागही पडतात. या समस्यांवर दालचिनीतले गुणधर्म प्रभावीपणे काम करतात.

2.मध:- मध हे जीवाणूविरोधी गुणधर्माचं असतं. मधामुळे मुरुम पुटकुळ्यांनी त्वचेवर साचून राहणार्‍या मृत पेशीही निघून जातात. मध हे त्वचेचं पोषण करण्यास उपयुक्त आहे.

3. लिंबू:- लिंबात सायट्रिक अँसिड असतं. हे अँसिड त्वचेखालील सीबम ग्रंथींच्या अतिरिक्त तेल निर्मितीला नियंत्रित करतात. शिवाय त्वचेस घातक जीवाणूंना रोखण्याचं कामही लिंबातले गुणधर्म करतात.

या तिन्ही घटकांच्या गुणांचा समुच्चय या लेपात होत असल्यानं हा लेप मुरुम पुटकुळ्यांची समस्या घालवण्यास उपयुक्त ठरतो.

Web Title: Beauty Tips- Malaika Arora tells apply cinnamon face pack for pimples and acne problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.