Lokmat Sakhi >Beauty > Beauty Tips: चेहऱ्यावर कधीच पिंपल्स येऊ नये असं वाटतं? मनुका- ग्लासभर पाण्याचा घ्या एक परफेक्ट उपाय

Beauty Tips: चेहऱ्यावर कधीच पिंपल्स येऊ नये असं वाटतं? मनुका- ग्लासभर पाण्याचा घ्या एक परफेक्ट उपाय

How To Reduce Pimples: चेहऱ्यावर वारंवार येणाऱ्या पिंपल्समुळे परेशान झालात? सगळे उपाय करून झाले? मग आता हा एकच उपाय करा (remedies for pimples)... काही दिवसांतच पिंपल्स जातील आणि चेहरा होईल स्वच्छ, सुंदर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 01:55 PM2022-04-14T13:55:17+5:302022-04-14T13:56:05+5:30

How To Reduce Pimples: चेहऱ्यावर वारंवार येणाऱ्या पिंपल्समुळे परेशान झालात? सगळे उपाय करून झाले? मग आता हा एकच उपाय करा (remedies for pimples)... काही दिवसांतच पिंपल्स जातील आणि चेहरा होईल स्वच्छ, सुंदर !

Beauty Tips: Pimples will never come again!! Try these simple home hacks for reducing pimples and rejuvenate your skin | Beauty Tips: चेहऱ्यावर कधीच पिंपल्स येऊ नये असं वाटतं? मनुका- ग्लासभर पाण्याचा घ्या एक परफेक्ट उपाय

Beauty Tips: चेहऱ्यावर कधीच पिंपल्स येऊ नये असं वाटतं? मनुका- ग्लासभर पाण्याचा घ्या एक परफेक्ट उपाय

Highlightsपिंपल्स येण्याचं कारण म्हणजे हार्मोनल बदल आणि रक्त अशुद्ध असणे.. या दोन्ही समस्यांवर एक सोपा उपाय करा

वयात आलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर पिंपल्स यायला सुरुवात होते... सुरुवातीला तारुण्यपिटिका म्हणत त्याचं कोडकौतूक केलं जातं.. पण वय वाढलं तरी हे पिंपल्स जेव्हा पाठ सोडत नाहीत, तेव्हा मात्र जाम वैताग येतो. एका नंतर एक चेहऱ्यावर पिंपल्स येतच जातात आणि सगळा चेहरा खराब करतात.. मग पिंपल्स येऊ नये म्हणून आपण काही उपाय (home hacks for reducing pimples) सुरु करतो.. वेगवेगळे क्रिम ट्राय करतो. पण यामुळे बऱ्याचदा होतं काय की पिंपल्स काही कमी होत नाहीत, पण चेहरा मात्र आणखीनच खराब दिसू लागतो..(how to get clear skin without pimples?)

 

असं होण्याचं कारण म्हणजे पिंपल्स घालविण्यासाठी तुम्हाला बाह्य उपचारांपेक्षा कधीकधी आहारातून काही बदल करण्याची गरज असते. पिंपल्स येण्याचं कारण म्हणजे हार्मोनल बदल आणि रक्त अशुद्ध असणे.. या दोन्ही समस्यांवर एक सोपा उपाय करा आणि पिंपल्स येण्याच्या मुळ कारणावरच प्रामुख्याने इलाज करा.. पिंपल्स येऊ नये किंवा चेहऱ्यावर आलेले पिंपल्स जावेत, यासाठी काय करावं याच्या ब्यूटी टिप्सइन्स्टाग्रामच्या daily__healthtips या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आल्या आहेत.

 

पिंपल्स येऊ नयेत म्हणून करा हा उपाय..
हा एक अगदी सोपा उपाय असून यासाठी तुम्हाला पाणी आणि काही मनुका लागणार आहेत. दररोज रात्री झोपताना एक ग्लास पाणी एका तांब्याच्या भांड्यात टाका. यामध्ये ६ ते ७ मनुका टाका. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी भिजलेले मनुका बारीक चावून खा आणि तांब्याच्या भांड्यातले पाणी पिऊन टाका. मनुका आणि तांब्याच्या भांड्यातले पाणी यामुळे रक्तशुद्धी होण्यास मदत होते. शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्यासाठी मनुका उपयुक्त ठरतात आणि त्यामुळे पिंपल्स येण्याची समस्या जवळपास थांबते. 

 

आलेले पिंपल्स घालविण्यासाठी उपाय..
वरील उपाय पिंपल्स येऊ नये म्हणून नियमित करावा.. पण सध्या जर चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर ते घालविण्यासाठी हा एक घरगुती उपाय करून बघा. यासाठी ३ थेंब ॲपलसाईड व्हिनेगर, २ टीस्पून मध आणि अर्धा टीस्पून पाणी एकत्र करा. हे मिश्रण फक्त चेहऱ्यावरील पिंपल्सवर लावा. १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाका. पिंपल्स कोरडे पडतील आणि एक- दोन दिवसांत निघून जातील. 

 

Web Title: Beauty Tips: Pimples will never come again!! Try these simple home hacks for reducing pimples and rejuvenate your skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.