Join us  

Beauty Tips : सौंदर्य खुलवण्यासाठी काजळ हवंच, पण ते पसरलं की....काजळ पसरू नये म्हणून 4 टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2022 3:32 PM

Beauty Tips काजळ लावणे ही एक कला आहे, केवळ डोळे उठावदार दिसावेत म्हणून नाही तर डोळ्यांचे सौंदर्य खुलावे यासाठी वापरले जाणारे काजळ लावताना कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी...

ठळक मुद्देसध्या मास्कमुळे ओठांचा मेकअप तर करता येत नाहीत मग सौंदर्य खुलवण्यासाठी डोळे तरी सुंदर दिसायला हवेत नाकाजळ लावताना काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमच्याही डोळ्यांना मिळू शकेल कातील लूक...

रोज ऑफीसला जाताना किंवा एखाद्या सणसमारंभाला जाताना आपल्याला आवरायचे असेल की काजळ how to use Kajal आणि लिपस्टीक या तर किमान गोष्टी आपण वापरतोच. काजळामुळे डोळे उठून दिसतात आणि आपल सौंदर्य खुलण्यास Beauty Tips मदत होते. हल्ली बाजारात वेगवेगळ्या रंगाची, शेडची काजळे मिळतात. पण अनेकदा काजळ लावायचं म्हटलं की आपल्याला टेन्शन येतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कोणत्याही कंपनीचे कितीही भारीचे काजळ लावले तरी थोड्या वेळानी ते पसरतं आणि आपल्या चेहऱ्याची पार रया होऊन जाते. आपल्याला डोळ्यांखाली आधीच काळी वर्तुळे असण्याचा त्रास असतो. त्यात हे काजळ खाली आले तर मग चेहऱ्याची पूर्णच वाट लागते. आपण आवरलेले दिसण्याऐवजी जास्त अवतारात आहोत असे दिसते. त्यामुळे मग आपण काजळ लावायचे टाळतो किंवा त्याला चांगले पर्याय शोधत राहतो. पण याचा आपल्या सौंदर्यावर परीणाम होत असतो. जास्त वेळ काजळ आहे तसेच छान डोळ्यांवर राहावे आणि ते चेहऱ्यावर उतरु नये असे वाटत असेल तर काही किमान गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. पाहूयात काजळ पसरु नयेत यासाठी काही सोप्या टिप्स...

१. काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांच्या खालचा भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करा. अनेकदा तेलकट त्वचा असेल तर त्वचेतून ठराविक वेळाने तेल बाहेर आल्यासारखे होते आणि त्यामुळे त्वचा तेलकट दिसते. असे होऊ नये यासाठी आवरण्यापूर्वी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर टॉवेलने तो व्यवस्थित कोरडा करुन मगच काजळ लावा. म्हणजे काही काळ तरी काजळ आहे तसे टिकून राहण्यास मदत होईल. 

२.  काजळ लावण्यापूर्वी पापण्यांवर  तसेच डोळ्यांच्या दोन्ही कडांना पावडर लावा. यामुळे त्याभागातील मॉईश्चर शोषले जाईल. त्वचेवर मॉइश्चर असेल तर काजळ पसरते, अशावेळी फाऊंडेशन, बीबी क्रिम यांसारख्या गोष्टींचा योग्य पद्धतीने वापर करा म्हणजे काजळ पसरण्यापासून तुमचा बचाव होईल. काजळ लावल्यानंतर अतिरिक्त पावडर ब्रशने पुसा.

३. डोळ्यांच्या आतील किंवा बाहेरील टोकांना काजळ लावणे टाळा. डोळ्याच्या खालच्या बाजूला एक सपाट भाग असतो, त्यावर काडळ लावा. कडांना काजळ लावल्याने ते डोळ्यांखाली पसरण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कितीही फॅशन असली किंवा तुम्ही घाईत असलात तरी डोळ्यांखालच्या स्कीनवर काजळ अजिबात लावू नका.

४. सध्या आपण सगळेच मास्क वापरतो. त्यामुळे आपल्याला ओठांचा मेकअप करता येत नाही. अशावेळी आपण डोळ्यांच्या मेकअपवर भर देतो. लिपस्टिक सेट व्हायला ज्याप्रमाणे वेळ लागतो त्याचप्रमाणे काजळ सेट व्हायलाही थोडा वेळ लागतो. त्यामुळे काजळ लावल्यानंतर लगेच आय मेकअप करू नका. पाच ते दहा मिनिटं थांबा आणि मग आय शॅ़डो, मस्कारा, आय लायनर या गोष्टी लावा.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सडोळ्यांची निगामेकअप टिप्स