Lokmat Sakhi >Beauty > थंडीमुळे त्वचा तडतडते, साबणाऐवजी वापरा ३ गोष्टी, त्वचा राहील कोमल-मुलायम

थंडीमुळे त्वचा तडतडते, साबणाऐवजी वापरा ३ गोष्टी, त्वचा राहील कोमल-मुलायम

Beauty Tips Skin Care in Winter Season : साबणामुळे थंडीच्या काळात त्वचेचा कोरडेपणा वाढतो. अशावेळी साबणाला काय पर्याय असू शकतात याविषयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2022 11:35 AM2022-11-11T11:35:19+5:302022-11-11T11:56:13+5:30

Beauty Tips Skin Care in Winter Season : साबणामुळे थंडीच्या काळात त्वचेचा कोरडेपणा वाढतो. अशावेळी साबणाला काय पर्याय असू शकतात याविषयी

Beauty Tips Skin Care in Winter Season : Cold makes the skin crack, use 3 things instead of soap, the skin will remain soft-soft | थंडीमुळे त्वचा तडतडते, साबणाऐवजी वापरा ३ गोष्टी, त्वचा राहील कोमल-मुलायम

थंडीमुळे त्वचा तडतडते, साबणाऐवजी वापरा ३ गोष्टी, त्वचा राहील कोमल-मुलायम

Highlightsथंडीच्या दिवसांत आपलीही त्वचा नाजूक होते, अशावेळी हे उपाय आपणही वापरु शकतो.  दिवाळीनंतरही थंडीचा पूर्ण कालावधी हे उटणे वापरल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

थंडीच्या दिवसांत आपली हवेत कोरडेपणा असल्याने आपली त्वचा खूप तडतडते. त्वचा कोरडी पडल्याने अंगाला खाज येणे, त्वचेच्या वरचा पांढरा भाग खाजवल्यावर बाहेर पडणे अशा समस्या निर्माण होतात. अनेकदा कोरड्या त्वचेवर मेकअपही नीट बसत नाही. त्यामुळे थंडीतही त्वचा ग्लोईंग आणि मुलायम दिसावी यासाठी आपण त्वचेला तेल किंवा मॉईश्चरायजर लावतो. मात्र आंघोळ करताना आपण साबण किंवा बॉडी वॉश वापरत असू तर त्यातील रासायनिक घटकांमुळे ही त्वचा पुन्हा कोरडी होते. आता शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा घामाचा वास जाण्यासाठी साबण तर लावायलाच हवा ना असा आपला समज असतो. पण साबणामुळे थंडीच्या काळात त्वचेचा कोरडेपणा वाढतो. अशावेळी साबणाला काय पर्याय असू शकतात याविषयी आपण फारसा विचार करत नाही. मात्र थंडीत साबण न वापरता आंघोळ करताना कोणत्या गोष्टी वापरल्यास त्वचा मुलायम राहू शकेल ते पाहूया (Beauty Tips Skin Care in Winter Season)...

(Image : Google)
(Image : Google)

१. साय किंवा दूध 

आंघोळीच्या वेळी साबण लावण्याऐवजी आपण साय किंवा दुध अंगाला लावू शकतो. त्यामुळे शरीराला कोरडेपणा न येता चांगले मॉईश्चर मिळण्यास मदत होते. सायीमध्ये असणारे स्निग्ध पदार्थ त्वचेला पोषण देणारे ठरत असल्याने थोडीशी साय आणि हळद, चंदन पावडर किंवा मुलतानी माती एकत्र करुन ती आंघोळीच्या वेळी साबणासारखी लावल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. 

२. उटणे 

उटणं म्हणजे दिवाळीच्या ४ दिवसांत वापरण्याची गोष्ट असा आपला समज असतो. त्यानुसार आपण दिवाळीच्या दिवसांत उटणं वापरतोही. पण नंतर मात्र आपण पुन्हा साबण वापरण्यास सुरुवात करतो. मात्र दिवाळीनंतरही थंडीचा पूर्ण कालावधी हे उटणे वापरल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते. उटण्यामध्ये बरेच आयुर्वेदीक घटक असतात, त्यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. यामध्ये दूध किंवा पाणी घालून त्याने त्वचेला मसाज केल्यास त्वचेवरची घाण आणि कोरडी त्वचा निघून जाण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. घरगुती पॅक

लहान बाळांना जन्मल्यानंतर मसूर डाळीचे पीठ - हळद किंवा बेसनाचे पीठ आणि दूध अशाप्रकारचा पॅक शरीर स्वच्छ करण्यासाठी लावतात. बाळांची त्वचा कोमल असल्याने त्यांच्या त्वचेला रासायनिक घटक लागू नयेत यासाठी हे उपाय केले जातात. थंडीच्या दिवसांत आपलीही त्वचा नाजूक होते, अशावेळी हे उपाय आपणही वापरु शकतो.  

Web Title: Beauty Tips Skin Care in Winter Season : Cold makes the skin crack, use 3 things instead of soap, the skin will remain soft-soft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.