हात आणि पायांवर वाढलेले केस अगदीच नकोसे वाटतात. वॅक्स केलेले नसताना स्लिव्हलेस, शॉर्ट्स, स्कर्ट असे कपडे तर घालताच येत नाहीत. त्यामुळे मग आजकाल अगदी शाळकरी मुलीही बिनधास्तपणे पार्लर गाठत आहेत आणि वॅक्स, थ्रेडिंग, अप्परलिप्स अशा अनेक ब्युटी ट्रिटमेंट्स करून घेत आहेत. पण असे करणे कितपत सुरक्षित आहे, याविषयी् किशोरवयीन मुलींनी आणि त्यांच्या आईने थोडा विचार करण्याची गरज आहे.
दहावीमध्ये असणारी विद्यार्थिनी साधारणपणे १५- १६ वर्षांची असते. यावयात त्वचेचा पुर्णपणे विकास झालेला नसतो. शिवाय वयात आल्यामुळे शरीराच्या ज्या भागांवर केस येतात, त्यांची वाढही पुर्णपणे झालेली नसते. त्यामुळे केसांची अर्धवट वाढ झालेल्या अवस्थेत जर वॅक्स करून केस मुळासकट उपटण्याचा प्रयत्न केला, तर ते त्वचेसाठी अपायकारक ठरते. त्यामुळे वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत तरी वॅक्स किंवा शरीरावरचे केस मुळासकट उपटून काढण्याच्या कोणत्याही ब्युटी ट्रिटमेंट्स टाळायला हव्यात.
जर खूपच आवश्यकता असेल, तर सहा महिन्यातून एकदा अशा ट्रिटमेंट्स करायला हरकत नाही. पण वारंवार वॅक्स केले, तर मात्र त्वचा सैल पडू शकते. काही वेळेस तर त्वचेतला ओलावा संपून ती सुरकुतल्यासारखीही वाटू शकते.
हेअर रिमुव्हल क्रिमही नकोयोग्य वय झाल्याशिवाय हेअर रिमुव्हल क्रिमही वापरायला नकाे. नुकत्याच ११ वी मध्ये गेलेल्या किशोरवयीन मुलींची त्वचा खूप संवेदनशील असते. हेअर रिमुव्हल क्रिमचा वारंवार वापर केल्याने त्वचेवर रॅशही येऊ शकते किंवा त्वचा काळवंडली जाऊ शकते.
ही काळजी पण घ्याअनेकदा मुली मोठ्या बहिणींच्या किंवा मैत्रिणींच्या सांगण्यावरून घरीच रेझरच्या साहाय्याने त्वचेवरील केस काढण्याचा प्रयोग करतात. अर्धवट वाढ झालेल्या अवस्थेत असणारे केस काढल्यामुळे केसतोडा नावाचा आजारही होऊ शकतो. यामध्ये त्वचेच्या आतील भागातच केस वेड्यावाकड्या अवस्थेत वाढतात आणि त्यामुळे खूप वेदना होतात. शिवाय रेझरमुळे जखमाही होऊ शकतात. रेझरच्या अतिवापरानेही त्वचा काळवंडते किंवा रखरखीत होऊ शकते.
वॅक्सिंग करताना काळजी घ्या१. जेव्हा पहिल्यांदाच वॅक्स करणार आहात, तेव्हा वॅक्सची थोडी ट्रायल घ्या. त्वचेच्या एखाद्या भागात वॅक्स लावून पहा. अनेकदा वॅक्सची ॲलर्जी येण्याची शक्यता असते. हेअर रिमुव्हर क्रिम वापरणार असाल, तर ते ही आधी थोड्या जागेवर लावून ट्राय करून पहावे.
२. पहिल्यांदाच वॅक्स करण्याचा प्रयोग घरी चुकूनही करू नका. एखाद्या चांगल्या पार्लरमध्ये जाऊनच एक्सपर्टच्या मदतीने वॅक्स करावे.
३. तुम्ही पहिल्यांदाच वॅक्स करणार आहात, हे ब्युटीशियनला आधी सांगा. जेणेकरून त्यांच्याकडूनही याबाबत काळजी घेतली जाईल.