Lokmat Sakhi >Beauty > महादेवाचे आवडते बेल पान, औषधीही आहेच!  केसांच्या  आणि त्वचेच्या तक्रारींवर तर हमखास गुणकारी

महादेवाचे आवडते बेल पान, औषधीही आहेच!  केसांच्या  आणि त्वचेच्या तक्रारींवर तर हमखास गुणकारी

श्रावणी सोमवार म्हणजे महादेवाच्या पिंडीला बिल्वपत्र म्हणजेच बेलाची पाने अर्पण करण्याच दिवस. पण बेलाच्या पानांचा फक्त तेवढाच उपयोग नाहीये बरं का.. बेलाची पाने तुमचे सौंदर्य खुलविण्यासाठीही निश्चितच उपयोगी ठरतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 05:53 PM2021-08-09T17:53:05+5:302021-08-09T17:54:03+5:30

श्रावणी सोमवार म्हणजे महादेवाच्या पिंडीला बिल्वपत्र म्हणजेच बेलाची पाने अर्पण करण्याच दिवस. पण बेलाच्या पानांचा फक्त तेवढाच उपयोग नाहीये बरं का.. बेलाची पाने तुमचे सौंदर्य खुलविण्यासाठीही निश्चितच उपयोगी ठरतात.

Beauty tips : Uses of bilva patra means Betel leaf | महादेवाचे आवडते बेल पान, औषधीही आहेच!  केसांच्या  आणि त्वचेच्या तक्रारींवर तर हमखास गुणकारी

महादेवाचे आवडते बेल पान, औषधीही आहेच!  केसांच्या  आणि त्वचेच्या तक्रारींवर तर हमखास गुणकारी

Highlightsॲण्टी ऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे सौंदर्य खुलविण्यासाठी आणि एजिंग इफेक्ट कमी करण्यासाठी बेलपत्र उपयोगी ठरते. 

बेल ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. आरोग्यासाठी बेलाची पाने खूपच उपयुक्त असतात. बेलाच्या पानांचा काढा विविध जुनाट आजारांवर अतिशय प्रभावी ठरतो. एवढेच नव्हे तर बेलाची पाने, फळ आणि खोड यांचे आरोग्यासाठी वेगवेगळे फायदेही आहेत. बिल्वपत्रांमध्ये खूप जास्त प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे कॅन्सरचा धोकाही बिल्वपत्रामुळे कमी होतो. तसेच ॲण्टी ऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे सौंदर्य खुलविण्यासाठी आणि एजिंग इफेक्ट कमी करण्यासाठी बेलपत्र उपयोगी ठरते. 

 

बेलाच्या पानांमुळे बहरते साैंदर्य
बेलाच्या पानांमध्ये प्रोटीन्स, केसांसाठी उपयुक्त ठरणारे बीटा कॅरेटीन व थायमीन यासोबतच कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन्स ए, बी आणि सी तसेच ॲण्टी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व घटक केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्वचेला तजेलदार करण्यासाठी उपयुक्त आहेत. 

त्वचेवर लावा बेलपत्रांचा लेप
त्वचेला मुलायम करून नितळ सौंदर्य मिळविण्यासाठी बेलपत्रांचा लेप अतिशय उपयुक्त ठरतो. हा लेप बनविण्यासाठी बेलाची पाने मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्याचा रस काढा. साधारण दोन चमचे बेलाच्या पानांचा रस असेल तर त्यामध्ये एक चमचा मध टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र  करा आणि  चेहऱ्यावर  त्याचा लेप लावा. साधारण १५ ते २० मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. या उपायामुळे त्वचा तजेलदार होते. फोड कमी होऊन चेहऱ्यावरील डाग देखील जातात.

 

केसांसाठीही होतो बेलाचा उपयोग
- तिळाच्या तेलात बेलफळाची साले आणि थोडा कापूर घालावा. हे तेल गरम करून घ्यावे. हे तेल केसांना लावल्यास केसांची वाढ चांगली होते.
- केस गळणे कमी होण्यासाठी बेलाचे एक पान दररोज खावे, असा सल्लाही दिला जातो.
- बेलपानांचा रस केसांना लावल्यास केसांचे आरोग्य सुधारते. केस धुण्याआधी २० ते २५ मिनिटे बेलपानांचा रस केसांना लावावा आणि त्यानंतर गरम पाण्याने केस धुवून टाकावेत. 

 

बेलाच्या पानांचा असाही उपयोग
- बेलाची पाने लिव्हरसाठी फायदेशीर असतात.
- पोटाचे दुखणे तसेच अपचनासंबंधी सर्वच तक्रारी बेलाच्या पानांचा रस प्यायल्याने कमी होतात.
- मधुमेहींना साखर नियंत्रित ठेवण्यासाठी बेलफळाचे चुर्ण खाण्याचा सल्ला दिला जातो.
- व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप आल्यास बेलाची पाने ग्लासभर पाण्यात उकळावीत. उकळून उकळून पाणी निम्मे झाले की, ते गाळून घ्यावे आणि गरमगरम पाणी प्यावे. या उपायामुळे शरीरातील उष्णताही कमी होते. 

 

Web Title: Beauty tips : Uses of bilva patra means Betel leaf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.