काही केल्या त्वचेवरचे पिंपल्स, ॲक्ने कमी होत नसतील तर आता हा एक खास उपाय करून पाहा. हा उपाय केल्याने तुमच्या त्वचेला ५ जबरदस्त फायदे होतील. एखादं गोल्डन किंवा डायमंड फेशियल करून जेवढा फरक त्वचेवर दिसून येईल, तेवढाच फरक तुम्हाला हा ५ रुपयांचा उपायही नक्कीच देऊन जाईल (best home remedies for radiant glow). हा उपाय आपल्या आजी, आई, मावशी, काकू यांनीही कधी ना कधी केला असेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुरटीचा वापर करायचा आहे (beauty tips using phitkari). पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटी वापरतात हे आपल्याला माहिती आहेच. तसंच आता आपली त्वचाही स्वच्छ, नितळ, चमकदार करण्यासाठी तुरटी कशी वापरायची ते पाहूया. (how to use phitkari for removing tanning)
पिंपल्स, टॅनिंग कमी करण्यासाठी तुरटीचा उपयोग
त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या कमी करण्यासाठी तुरटीचा उपाय कसा करावा, याविषयीचा व्हिडिओ its.maryyyam_ या इन्स्टाग्राम पेजवर सुचविण्यात आलेला आहे. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी चेहरा ओला करून घ्या.
एका घोटातच डोकं मोकळं करून रिफ्रेश करणारा फक्कड चहा! पाहा चहा मसाल्याची खास रेसिपी
आता ओल्या चेहऱ्यावर एक मिनिटासाठी तुरटीचा खडा फिरवा. त्यानंतर साधारण ५ ते १० मिनिटांनी चेहरा धुवून घ्या आणि त्यानंतर चेहऱ्यावरून बर्फ फिरवा. हा उपाय कॉम्बिनेशन किंवा तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी उत्तम आहे. कोरडी त्वचा असणाऱ्यांनी हा उपाय करू नये. तसेच हा उपाय आठवड्यातून एकदाच करावा.
चेहऱ्यासाठी तुरटीचा वापर करण्याचे फायदे
१. चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होतात.
२. त्वचेवरचं टॅनिंग कमी होऊन ती चमकदार होते.
ओपन पोर्समुळे चेहरा खूपच रापलेला दिसतो? ५ सोपे उपाय, ओपन पोर्स जाऊन त्वचा दिसेल तरुण
३. डार्क सर्कल्स कमी करण्याचा हा एक उत्तम उपाय आहे.
४. त्वचेवरच्या फाईन लाईन्स, सुरकुत्या कमी होतात.
५. सैलसर झालेली त्वचा टाईट होण्यास मदत होते. त्यामुळे वय वाढलं तरी त्वचा तरुण दिसते.