Lokmat Sakhi >Beauty > साध्या बर्फाने कशाला हळद आइसक्यूबने करा चेहऱ्याला मसाज, निस्तेज चेहराही लख्खं उजळेल

साध्या बर्फाने कशाला हळद आइसक्यूबने करा चेहऱ्याला मसाज, निस्तेज चेहराही लख्खं उजळेल

Beauty Turmeric ice cubes: New trend for glowing skin ना फेसमास्क - ना फेशियल, ग्लोसाठी करा हा सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2023 08:50 PM2023-05-18T20:50:42+5:302023-05-18T20:51:16+5:30

Beauty Turmeric ice cubes: New trend for glowing skin ना फेसमास्क - ना फेशियल, ग्लोसाठी करा हा सोपा उपाय

Beauty Turmeric ice cubes: New trend for glowing skin | साध्या बर्फाने कशाला हळद आइसक्यूबने करा चेहऱ्याला मसाज, निस्तेज चेहराही लख्खं उजळेल

साध्या बर्फाने कशाला हळद आइसक्यूबने करा चेहऱ्याला मसाज, निस्तेज चेहराही लख्खं उजळेल

उन्हाळ्यात त्वचेच्या संबंधित समस्या वाढतात. त्वचेवर पिगमेंटेशन, टॅनिंग, कोरडेपणा आणि मुरुमांसारख्या समस्या वाढतात. मुख्य म्हणजे ओपन पोर्समुळे चेहरा अधिक खराब दिसतो. ज्यामुळे चेहरा अधिक ऑइली होतो. यासह स्किन इन्फेक्शनची समस्या वाढते. महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा हळदीचा आईसक्यूबचा वापर करून पाहा. यामुळे ओपन पोर्स यासह त्वचेच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत होईल.

हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीफंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेच्या समस्या कमी करतात. चेहऱ्यावर हळद लावल्याने त्वचा आणखी ग्लो करते. चला तर मग हा ब्युटी हॅक चेहऱ्यावर कसा काम करतो ते पाहूयात(Beauty Turmeric ice cubes: New trend for glowing skin).

हळदीचा आईसक्यूब करण्यासाठी लागणारं साहित्य

हळद

पाणी

२ चमचे सायीचा स्पेशल फेस पॅक, काही मिनिटांत नव्या नवरीसारखा ग्लो येईल चेहरा

एलोवेरा जेल

अशा पद्धतीने करा हळदीचा आईसक्यूब

सर्वप्रथम, एका वाटीत पाणी घ्या, त्यात चिमुटभर हळद घालून मिक्स करा. हळद पाण्यात मिक्स झाल्यानंतर त्यात एक चमचा एलोवेरा जेल घालून मिक्स करा. आता आईसक्यूब ट्रे मध्ये हे मिश्रण घालून फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा.

मान काळी दिसते, हाताचे कोपरे काळवंडले? ३ उपाय - काळेपणा होईल कमी झ्टपट

अशा पद्धतीने करा हळदीचा आईसक्यूबचा वापर

सर्वप्रथम, चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यानंतर, कमीतकमी 3 ते 4 मिनिटांसाठी चेहऱ्यावर हळदीचा आईसक्यूब चोळा. हळदीचा बर्फाचा तुकडा चेहऱ्यावर चोळल्यानंतर तीन मिनिटे चेहरा असाच राहू द्या. नंतर पाण्याने चेहरा धुवा. या उपायामुळे ओपन पोर्सच्या समस्येपासून सुटका मिळेल. 

Web Title: Beauty Turmeric ice cubes: New trend for glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.