Join us  

बीट १ - फायदे २, जुही परमार सांगते ओठ आणि केस यासाठी बीट वापरण्याची खास युक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2022 5:35 PM

Beetroot Hacks Juhi Parmar नैसर्गिकरित्या त्वचेवर लीप अँड चिक टिंट्स हवे असतील. तर, जुही परमार हिने शेअर केलेला घरगुती उपाय करून पहा..

कुमकुम - एक प्यारा सा बंधन या सिरीयलमधून घराघरात पोहचणारी अभिनेत्री म्हणजेच जुही परमार. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. जुही नेहमी अनेक घरेलू आयडियाज आपल्या चाहत्यांसह शेअर करत असते. तिचे हे घरगुती नुस्खे खूप फायदेशीर ठरतात. या हिवाळ्यात जर आपल्याला नैसर्गिकरित्या त्वचेवर लीप अँड चिक टिंट्स हवे असतील. तर, जुही परमार हिने शेअर केलेला घरगुती उपाय आपण करून पाहू शकता. महागड्या प्रोडकट्स आणण्यापेक्षा घरगुती ट्रिक्सचा वापर करून लीप अँड चिक टिंट्ससह हेअर स्प्रे देखील बनवू शकता. ते कसे पहा..

लीप अँड चिक टिंट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य

बीटरूट

कोरफड जेल

व्हिटॅमिन ई

कृती

सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बीटरुट किसून घ्या. त्यानंतर त्याचा रस काढून घ्या. रस काढल्यानंतर त्यात कोरफड जेल आणि व्हिटॅमिन ई औषध मिसळा. हे मिश्रण चांगले मिक्स झाल्यानंतर एका छोटया डब्ब्यात भरून ठेवा. अशा प्रकारे आपण हे टिंट्स ब्लश म्हणून देखील वापरू शकता, यासह ओठांवर देखील लावू शकता.

हेअर स्प्रे बनवण्यासाठी लागणारं साहित्य

बीटरूट 

पाणी

कृती

सर्वप्रथम, बीटरूट चांगल्या पाण्यात उकळवत ठेवा. त्यांनतर बीटरूट बाजूला काढून ठेवा. जे पाणी उकळवून घेतलेलं आहे, ते पाणी थंड केल्यानंतर एका स्प्रेच्या बॉटलमध्ये भरून केसांवर डायरेक्ट लावा. अश्याने केसांमध्ये बीटरुटचे गुण उतरतील. आणि केसांमध्ये वाढ होईल.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी