त्वचेची काळजी घेण्यासाठी किंवा त्वचेला चमकदार, फ्रेश करण्यासाठी नेहमीच काही महागड्या ब्यूटी ट्रिटमेंट्स घेण्याची गरज नसते. कधी कधी अगदी साधे- सोपे आणि घरगुती उपाय (Home Remedies for glowing skin) करूनही चेहरा खूप छान दिसू शकतो. असाच हा एक उपाय आहे. लग्नसराईसाठीच नाही तर एरवीही तुम्ही त्वचेची काळजी म्हणून हा उपाय करून बघू शकता. त्वचेवर इन्स्टंट ग्लो मिळविण्यासाठी हा उपाय तर चांगला आहेच. पण आठवड्यातून २ वेळा नियमितपणे हा उपाय केल्यास त्वचा नेहमीच फ्रेश आणि चमकदार दिसेल (Beet root facial for instant glow). हा उपाय इन्स्टाग्रामच्या akansharaj30 या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
कसं करायचं बीटरूट फेशियल?
१. पहिली स्टेप
यामध्ये आपल्याला त्वचेचं स्क्रबिंग करायचं आहे. यासाठी २ टेबलस्पून बीटचा किस, २ टेबलस्पून तांदळाचं पीठ आणि अर्धा टेबलस्पून खोबरेल तेल घ्या.
ढाबा स्टाईल वांग्याचं भरीत, बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची झणझणीत भरीत रेसिपी
हे सगळं साहित्य एकत्र करून त्याने चेहऱ्याला १ ते २ मिनिटे स्क्रबिंग करा. त्यानंतर चेहरा धुवून टाका. यामुळे त्वचेवरील डेडस्किन निघून जाईल.
२. दुसरी स्टेप
स्क्रबिंग झाल्यानंतर आपल्याला चेहऱ्यावर बीट रूट फेसपॅक लावायचा आहे. यासाठी एका वाटीमध्ये १ टेबलस्पून हरबरा डाळीचं पीठ, १ टेबलस्पून दही आणि २ टेबलस्पून बीटचा रस घ्या.
गार्डनिंगसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या ५ वस्तू तुमच्याकडे असायलाच पाहिजेत- काम होईल सोपं..
हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटे तसाच राहू द्या. फेसपॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.
३. तिसरी स्टेप
यामध्ये बीटरूट जेलने चेहऱ्याला मसाज करायचं आहे. यासाठी एका वाटीमध्ये १ टीस्पून ॲलोव्हेरा जेल आणि १ टीस्पून बीटचा रस घ्या. त्याने चेहऱ्याला मसाज करा.