Join us  

ओठांचा काळपटपणा जाईल आणि ओठ होतील गुलाबी, करा १ सोपा उपाय- विकतचे लिपबाम विसराल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2023 2:23 PM

Beet Root Lip Balm For Dry Lips: ओठांना नॅचरल गुलाबी रंग मिळेल. कोणतीही लिपस्टिक, लिपबाम लावण्याची गरजच उरणार नाही (How to get rid of blackness of lips)..

ठळक मुद्देहा लिपबाम आता एखाद्या एअर टाईट डबीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवून द्या. ८- १० दिवस चांगला राहील. 

हिवाळ्यात थंडी पडायला सुरुवात झाली की त्वचा उलते तसेच ओठही फुटू लागतात. कोरडे पडून ओठांचे सालपटं जातात. कधी कधी तर त्यामुळे ओठांतून रक्तही येते. ओठ काळसर होऊ लागतात. हा त्रास कमी करण्यासाठी कोणतेही विकतचे लिपबाम लावण्यापेक्षा हा बीटरुट लिपबाम घरीच तयार करा (Beet root lip balm for dry lips) आणि दररोज सकाळी तसेच रात्री झोपण्याच्याआधी या लिपबामने ओठांना मालिश करा. यामुळे ओठांचा कोरडेपणा तर कमी होईलच, पण काळपटपणा जाऊन ओठ छान गुलाबी दिसू लागतील (How to get pink lips naturally?). नैसर्गिकपणे ओठांना इतका छान रंग येईल की मग ओठांचा काळेपणा झाकण्यासाठी कोणत्याही विकतच्या लिपबामची, लिपस्टिकची गरजच उरणार नाही (Home remedies for pink lips).

 

बीटरुट लिपबाम कसा तयार करायचा?

बीटचा वापर करून घरच्याघरी लिपबाम कसा तयार करायचा, याविषयीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या mydelishbowlankedisonexpellers या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

फराळाचं खाऊन कंटाळला असाल तर तोंडी लावायला करा गवारीच्या शेंगांचा झणझणीत ठेचा, तोंडाला चवच येईल...

साहित्य

अर्धे बीटरुट

१ टेबलस्पून व्हॅसलिन

१ टेबलस्पून खोबरेल तेल

व्हिटॅमिन ई कॅप्सून १ 

 

कृती

सगळ्यात आधी बीटरुटची साले काढून घ्या आणि ते किसून घ्या

यानंतर १ ते २ दिवस ते उन्हात वाळू द्या. चांगलं वाळल्यानंतर ते मिक्सरमधून फिरवून घ्या आणि त्याची पावडर करा.

ही पावडर एका वाटीत घ्या. पावडर जर २ टेबलस्पून असेल तर त्यात १ टेबलस्पून व्हॅसलिन आणि १ टेबलस्पून खोबरेल तेल टाका.

थंडी पडताच त्वचा ड्राय झाली? ४ स्टेप्समधे घरच्याघरी करा फ्रुट फेशियल, त्वचा होईल मऊ

त्यानंतर त्या १ व्हिटॅमिन ई कॅप्सून फोडून टाका.

एका मोठ्या भांड्यात कडक पाणी घ्या. त्यात एक वाटी ठेवा. त्या वाटीत आपण तयार केलेले वरील मिश्रण टाका. अशा प्रकारे डबल बॉईलिंग तंत्रज्ञानाचा वापर करून लिपबाम गरम करा आणि त्यातले सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या.

हा लिपबाम आता एखाद्या एअर टाईट डबीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवून द्या. ८- १० दिवस चांगला राहील. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीओठांची काळजीथंडीत त्वचेची काळजीहोम रेमेडी