Join us

केस काळे, मजबूत आणि चमकदार करणारं नॅचरल हेअर डाय, एकदा लावून बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 11:45 IST

Natural Hair dye : केस काळे करण्यासाठी नॅचरल उपाय कधीही फायदेशीर ठरतात. असेच काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Natural Hair dye : पोषणाची कमतरता, काही आजार, प्रदूषण अशा वेगवेगळ्या कारणांनी आजकाल कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या खूप वाढली आहे. त्यामुळे केस काळे करण्यासाठी लोक केमिकलयुक्त वेगवेगळ्या हेअर डायचा वापर करतात. या हेअर डायनं केस लगेच काळे होतात. पण यातील केमिकलच्या साइड इफेक्ट्समुळं केसांचं नुकसानही होतं. अशात केस काळे करण्यासाठी नॅचरल उपाय कधीही फायदेशीर ठरतात. असेच काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बीट आणि मेहंदीचा हेअर मास्क

केस नॅचरल पद्धतीनं काळे, मजबूत, चमकदार आणि मुलायम करण्यासाठी बीट आणि मेहंदी खास हेअर मास्क लावू शकता. या हेअर मास्कनं केसांचं नुकसानही होणार नाही. केसांना या हेअर मास्क खूप पोषण मिळतं, ज्यामुळे केसांची वाढही होते.

मेथी आणि कलौंजीचं मिश्रणही तुमचे पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी फायदेशीर ठरतं. यानं केस चमकदार होतील आणि मजबूत होतील. केसगळतीची समस्या देखील या उपायानं दूर होईल.

कसा बनवाल हेअर मास्क?

हा खास हेअर मास्क बनवण्यासाठी २ मोठे चमचे बिटाचं पावडर, मेहंदी पावडर, मेथी पावडर, कलौंजी पावडर आणि चहा पावडर घ्या. या सगळ्यात गोष्टींमुळे केसांना नॅचरल काळा रंग मिळेल आणि भरपूर दिवस टिकेल.

या सगळ्या गोष्टी एकत्र करून २४ तासांसाठी ठेवून द्या. असं केल्यानं या सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स होतील आणि त्यातील पोषण हेअर मास्कमध्ये उतरेल.

२४ तासांनंतर हा हेअर मास्क तुम्ही केसांना २ तासांसाठी लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्यानं केस धुवून घ्या. केसांना नॅचरल काळा रंग मिळेल आणि केस चमकदार व मुलायम देखील होतील. या हेअर मास्कनं डोक्याच्या त्वचेमध्ये इन्फेक्शनचा धोका कमी होईल. तसेच डोकं खाजवणं आणि जळजळही दूर होईल.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स