Lokmat Sakhi >Beauty > विंचरताना केस तुटून हातात येतात? बिटरूट हेअर टॉनिकचा जादूई फॉर्म्यूला; भराभर वाढतील केस

विंचरताना केस तुटून हातात येतात? बिटरूट हेअर टॉनिकचा जादूई फॉर्म्यूला; भराभर वाढतील केस

Beetroot juice for hair growth : हेअर स्पा ट्रिटमेंट केल्यानंतर काहीवेळासाठी केस चांगले दिसतात नंतर पुन्हा केस गळणं सुरू होतं.  पोषक तत्वांनी परिपूर्ण असं बीटरूट तुमची ही समस्या सोडवू शकते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 03:18 PM2023-04-21T15:18:50+5:302023-04-21T16:53:29+5:30

Beetroot juice for hair growth : हेअर स्पा ट्रिटमेंट केल्यानंतर काहीवेळासाठी केस चांगले दिसतात नंतर पुन्हा केस गळणं सुरू होतं.  पोषक तत्वांनी परिपूर्ण असं बीटरूट तुमची ही समस्या सोडवू शकते. 

Beetroot juice for hair growth : How To Use Beetroot & Beetroot Juice For Hair | विंचरताना केस तुटून हातात येतात? बिटरूट हेअर टॉनिकचा जादूई फॉर्म्यूला; भराभर वाढतील केस

विंचरताना केस तुटून हातात येतात? बिटरूट हेअर टॉनिकचा जादूई फॉर्म्यूला; भराभर वाढतील केस

आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच केस गळण्याच्या समस्येतून जावं लागतंय. लहानपणापासून केस गळायला सुरूवात झाली तर मुलामुलींचा आत्मविश्वासही कमी होतो. (Hair  Growth Tips) आजकाल तरूण मुली स्ट्रेटनिंग, स्मूदनिंगसारख्या ट्रिटमेंट करतात, परिणामी वारंवार हिटींग टुल्सच्या वापरानं केस खराब होत जातात.  जेव्हा बाहेर जाताना आपण केस विंचरतो तेव्हा किंगव्यात अडकून केस गळतात तर कधी केस धुतानाही बरेच गळतात. (Beetroot juice for hair growth)

घरात असल्यानंतर बऱ्याचजणी केस विंचरणं टाळतात फक्त बाहेर जाण्याच्या वेळेला केस बांधतात. त्यामुळे केस गळणं अधिकच वाढतं. शॅम्पू, तेल बदलूनही हवातसा परिणाम दिसत नाही. (How To Use Beetroot & Beetroot Juice For Hair) हेअर स्पा ट्रिटमेंट केल्यानंतर काहीवेळासाठी केस चांगले दिसतात नंतर पुन्हा केस गळणं सुरू होतं.  केस गळू नयेत म्हणून काही सोपे उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.  पोषक तत्वांनी परिपूर्ण असं बीटरूट तुमची ही समस्या सोडवू शकते. 

बीटरूट हेअर ग्रोथ ड्रिंक

केस वाढण्यासाठी बीटरूट ज्यूस बनवण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात बीटाचे काप, आवळ्याचे काप घाला. त्यात सोललेल्या आल्याचे काप, कढीपत्ता घाला. पाणी घालून हे मिश्रण मिक्सरला फिरवून घ्या. तयार आहे हेअर ग्रोथ ड्रिंक. याच्या सेवनानं केसांची वाढ चांगली होण्यास मदत होईल. याशिवाय रक्ताची कमतरता भासणार नाही आणि रोगप्रतिकराकशक्तीही वाढेल. 

चेहरा अजिबात काळा पडणार नाही; आंघोळीनंतर १ काम करा, दिवसभर फ्रेश दिसेल त्वचा

- बीटरूटच्या रसाने डोक्याला मसाज करणे देखील चांगले आहे. यामुळे टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारते. केसांना रंग देण्यासाठी तुम्ही बीटरूट देखील वापरू शकता. हे  केसांवर नैसर्गिक रंगाप्रमाणे काम करते.

- बीटरूट खाल्ल्याने केसांमधील कोंडा देखील दूर होईल. थंडीच्या मोसमात ही भाजी जरूर खावी. यामुळे केस पांढरे होण्यास प्रतिबंध होतो. यामध्ये कॅरोटीनोईड्स आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात.

केस बरेच पिकलेत, पण डाय करायचा नाहीये? कांद्याच्या सालीचा डाय बनवा, केस होतील काळेभोर

- हा रस प्यायल्याने दात आणि हाडे मजबूत होतात. यामध्ये असलेले सिलिका कॅल्शियमचे शोषण सुधारते. यामध्ये आढळणारे फॉलिक अॅसिड गर्भवती महिलांसाठी चांगले असते.

- बीटरूट खाल्ल्याने केसांमधील कोंडा देखील दूर होतो. थंडीच्या मोसमात ही भाजी जरूर खावी. यामुळे केस पांढरे होण्यास प्रतिबंध होते. यामध्ये कॅरोटीनोईड्स आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात.
 

Web Title: Beetroot juice for hair growth : How To Use Beetroot & Beetroot Juice For Hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.