Lokmat Sakhi >Beauty > त्वचा उजळेल, केसही होतील मुलायम; ब्युटी रुटीनमध्ये वापरा अॅपल साइडर व्हिनेगर, ५ फायदे

त्वचा उजळेल, केसही होतील मुलायम; ब्युटी रुटीनमध्ये वापरा अॅपल साइडर व्हिनेगर, ५ फायदे

Benefit Of Apple Cider Vinegar for Skin and Hair Care : सफरचंदापासून तयार होणाऱ्या व्हिनेगरचा सौंदर्यासाठी कसा वापर होतो, याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2022 09:00 AM2022-07-26T09:00:58+5:302022-07-26T09:05:01+5:30

Benefit Of Apple Cider Vinegar for Skin and Hair Care : सफरचंदापासून तयार होणाऱ्या व्हिनेगरचा सौंदर्यासाठी कसा वापर होतो, याविषयी...

Benefit Of Apple Cider Vinegar for Skin and Hair Care : The skin will be bright, the hair will also be soft; Use Apple Cider Vinegar in Your Beauty Routine, 5 Benefits | त्वचा उजळेल, केसही होतील मुलायम; ब्युटी रुटीनमध्ये वापरा अॅपल साइडर व्हिनेगर, ५ फायदे

त्वचा उजळेल, केसही होतील मुलायम; ब्युटी रुटीनमध्ये वापरा अॅपल साइडर व्हिनेगर, ५ फायदे

Highlightsकेस लांब, दाट, सिल्की दिसावेत यासाठी हे व्हिनेगर पाण्यात मिसळून केसांना लावणे उपयुक्त ठरते. केमिकल उत्पादनांपेक्षा नैसर्गिक उत्पादने केव्हाही चांगली

अॅपल साइडर व्हिनेगर हे नाव आपण अलिकडे अनेकदा ऐकतो. कधी त्वचेच्या संदर्भात तर कधी केसांच्या संदर्भात या पदार्थाचे आवर्जून नाव घेतले जाते. सफरचंद ज्याप्रमाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते त्याचप्रमाणे आपल्या सौंदर्यासाठीही त्याचा वापर केला जातो. आहारातून आपण सफरचंद घेत असलो तरी बाह्य सौंदर्य खुलण्यासाठी त्यापासून तयार केलेल्या व्हिनेगरचा ब्यूटी रुटीनमध्ये आवर्जून वापर करायला हवा असे सौंदर्यतज्ज्ञ सांगतात (Skin Care and Hair Care Tips). आता सफरचंदापासून व्हिनेगर कसे तयार करतात असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडला असेल तर सफरचंदाचा रस काढून त्यामध्ये बॅक्टेरीया आणि यीस्ट एकत्र करुन हा रस फरमेंट केला जातो. यामुळे सफरचंदामध्ये असलेल्या साखरेचे अल्कोहोलमध्ये रुपांतर होते. शेवटी त्याचे रुपांतर व्हिनेगरमध्ये होते आणि एकप्रकारचा अॅसिडीक द्रव तयार होतो. आता याचे सौंदर्यासाठी काय फायदे आहेत ते पाहूया (Benefit Of Apple Cider Vinegar)...

(Image : Google)
(Image : Google)

१. चेहरा उजळण्यास मदत 

अनेकदा उन्हामध्ये फिरल्याने किंवा आणखी काही कारणांनी आपला चेहरा काळा पडतो. तसेच काही कारणाने आपली त्वचा निस्तेज होते आणि आपण विनाकारण उदास किंवा निराश दिसतो. मात्र ब्यूटी रुटीनमध्ये या व्हिनेगरचा वापर केल्यास चेहरा उजळण्यास मदत होते. हे व्हिनेगर वापरताना ते कायम तिप्पट पाण्यात एकत्र करुन मग वापरायला हवे. 

२. पुरळ किंवा पिंपल्सवर फायदेशीर

बऱ्याच तरुणींना चेहऱ्यावर पिंपल्स किंवा पुरळ येण्याची समस्या असते. पिंपल्स फुटल्यावर त्याठिकाणी अनेकदा काळे डागही येतात. हे डाग बराच काळ तसेच राहतात आणि आपला चेहरा खराब दिसतो. मात्र अशावेळी अॅपल साइडर व्हिनेगर वापरल्यास हे डाग लवकर जाण्यास मदत होते. यामध्ये पीएचचे प्रमाण कमी असल्याने त्वचा चांगली राहण्यास मदत होते. 

३. टोनर म्हणून वापर

चेहऱ्यातील ओलावा टिकून राहावा. चेहरा कायम ग्लोइंग आणि सतेज दिसावा यासाठी आपण बाजारात मिळणारे विविध प्रकारचे टोनर वापरत असतो. मात्र त्यापेक्षा नैसर्गिक घटकापासून तयार केलेला अॅपल साइडर व्हिनेगर टोनर म्हणून नक्कीच उत्तम पर्याय आहे. पाण्यात एकत्र करुन इतर टोनर प्रमाणेच त्याचा वापर करता येऊ शकतो. 

(Image : Google)
(Image : Google)

४. कोंड्यावर फायदेशीर 

कोंडा ही महिलांमधील एक अतिशय सामान्य समस्या आहे. प्रदूषण, केमिकल उत्पादने, कोरडेपणा यांसारख्या कारणांमुळे डोक्यात कोंडा होतो. एकदा कोंडा झाला की तो कमी होण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. मात्र अॅपल व्हिनेगरमध्ये असणारे अँटीबॅक्टेरीयल आणि अँटीफंगल गुणधर्म कोंडा कमी करण्यास उपयुक्त ठरतात. 

५. केसांचा कोरडेपणा कमी करण्यास उपयुक्त 

केसांचा कोरडेपणा ही एक सामान्य समस्या आहे. केस मुलायम किंवा दाट असावेत असे आपल्याला वाटते. मात्र ते धुतल्यावर मुलायम न राहता खूप फुगतात आणि कोरडे असल्याने रखरखीत दिसतात. पण केसांच्या मूळांना पोषण मिळण्यासाठी आणि केस लांब, दाट, सिल्की दिसावेत यासाठी हे व्हिनेगर पाण्यात मिसळून केसांना लावणे उपयुक्त ठरते. 

Web Title: Benefit Of Apple Cider Vinegar for Skin and Hair Care : The skin will be bright, the hair will also be soft; Use Apple Cider Vinegar in Your Beauty Routine, 5 Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.