Benefits Of Sugar For Skin : जसजसा उन्हाचा पारा वाढतो त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढू लागतात. जळजळ, टॅनिंग, चिकटपणा अशा वेगवेगळ्या समस्या होतात. ज्यामुळे त्वचेची सुंदरता कमी होते. त्वचेचा नॅचरल लूक उन्हामुळे दूर होतो. अशात महिला त्वचेसाठी वेगवेगळी केमिकल उत्पादनं वापरतात. ज्यामुळे त्वचेचं आणखी नुकसान होतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, ही महागडी केमिकलयुक्त उत्पादनं वापरण्याऐवजी किचनमधील साखर तुम्ही त्वचेवर नॅचरल ग्लो कायम ठेवण्यासाठी वापरू शकता. साखर वापराल तर तुम्हाला अधिकचा खर्चही करावा लागणार नाही. अशात त्वचेला साखरेचे होणारे फायदे आणि ती कशी वापरावी याबाबत जाणून घेऊया.
नॅचरल ग्लो
अनेक ब्युटी एक्सपर्ट साखरेला स्कीन व्हायटनिंग एजंट मानतात. साखरेचा वापर करून त्वचेवरील डाग, मळ दूर करण्यास मदत मिळते. जर आठवड्यातून एक किंवा दोनदा जरी तुम्ही त्वचेवर साखर लावली तर त्वचेला नॅचरल ग्लो मिळतो. शिवाय कोणतेही साइड इफेक्ट्सही नाहीत.
इतरही अनेक फायदे
त्वचेवर साखरेचा वापर केल्यानं नॅचरल ग्लो तर मिळतोच, सोबतच यातील अॅंटी-एजंट तत्व त्वचा तरूण ठेवण्यास मदत करतात. म्हणजे त्वचेवरील सुरकुत्या, लाइन्स दूर होतात आणि त्वचा तरूण दिसते.
कसा कराल वापर?
त्वचेसाठी साखर वापरण्याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे यासाठी तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही आणि जास्त मेहनतही घ्यावी लागणार नाही. यासाठी तुम्ही जाड साखरेचा वापर करावा. जर साखर जास्तच जाड असेल हलकी बारीक करून घ्या. एक चमचा साखरेमध्ये एक चमचा कोरफडीचा गर आणि अर्धा चमचा गुलाब जल टाकून मिक्स करा. तयार झालेलं स्क्रब चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटं चेहऱ्यावर हलक्या हातानं स्क्रबिंग करा. नंतर चेहरा कोमट पाण्यानं धुवा. तुम्हाला चेहऱ्यात फरक दिसून येईल.